लेखांक १०७
१५८६ वैशाख वद्य १
शनिवार
राजश्री सदानद गुरुराज मठ नीब
कलमनयन गोसावी
०॥ सौजनसागर इस्टजन मनोहर श्री मोकदमानि मौजे अबवडे का। बालाघाट किले पनाला सु॥सन अर्बा सितैन अलफ प्रती नरसो रामाजी देसकुलकर्णी किले पनाळे आसीर्वाद उपरी आमचे हक मोजे मजकुरी असे त्यापैकी बदल नदादीप व भडारा राजाधिराज माहाराज पा। वाई स्वामीयासि होन २
दोनी देविले असेती ते राजाधिराज श्री यापासी हर साला देत गेले पाहिजे दुसरे उजूर न कीजे साल दर साल कागदाचे उजूर न कीजे औलियाद व अफवाद देविले असे गोसावियासि देणे काही अनमान न करणे हे विनती या कामासि जो कोणी इसिकील करील त्यासि श्री स्वामीची आण असे तालीक लिहून घेऊन असल परतून देणे जाणिजे हे मो।
तेरीख १४ माहे सौवाल क्रोधीनाम सवछरे
वैशाख *शुधी प्रतिपदा शनिवार
विनती