लेखांक १०६
१५८५ ज्येष्ठ वद्य ३
श्रीसदानंद गोसावियाचे मठ
अज रखतखाने मा। अनाम राजश्री अबाजी राजे घाटे साहेब दामदौलतहू ता। हुदेदारानि हाल व इस्तकबाल व मोकदमानि मौजे निगडी किले सातारे सु॥ अर्बा सितैन व अलफ दरीविला जोगीद्रगिरी सन्यासी नि॥ हुजूर मालूम केले आपणास मौजे मजकुरी इनाम बिघे
१५ आहे अनछेत्र चालीस पनास सन्यासी जेविताती त्यास पटेल व कुलकरणी इस्केल करिताती सुरलीत चालवीत नाही त्यास साहेबी ताकीद देविले पाहिजे ह्मणौनु तरी याचे इनामास खलल करणे तुमचे काय अदाजा आहे आता त्याचे इनाम जैसे सालाबाद भोगवटा चालते तेणेप्रमाणे चालवणे इस्कील व खलल न करणे सदरहू जमीन हद महदूद घालून दुमाला करणे त्यानी च लावणी करून घेतील दुसरेयानी फिर्यादी येऊ न दणे तालीक लेहून घेउनु असल खुर्दखत परतोन देणे मोर्तब (शिक्का)
तेरीख १९ माहे जिलकाद