Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री शके १६७३ श्रावण वद्य ३

नकल.

राजश्री गोविंदराऊ चिटणवीस गोसावी यांसी.

छ सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य

स्नो। दमाजीराऊ गायकवाड सेनाखासखले रामराम विनंति उपरि येथील कुशल ता। छ १७ रमजान पावेतो जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे विशेष. आह्मी आपला निरोप घेऊन आल्यानंतर माहाराजांनी त्रिवर्ग मुलांस वाड्यांत नेऊन ऐवज मागितला. न मिळे तरी धनी देऊन मुदत करून जाणे. नाहीं तरी किल्याखालीं उतरावयाची रजा होणार नाहीं अशी आज्ञा जाहली. तेसमंई कोणी कामदार जिमा न घेत. हे आपण पाहून मुलें स्वाधीन घेऊन घरी आणलीं. बरदास्त फार ठेविली. ह्मणून मुलांनी लिहिल्यावरून कळलें. रावसाहेब मी तुमचा उपकार विसरणार नाहीं व ऐवजही सोईसोईनें पाठवीन. परंतु प्रसंगी माझी अब्रू अपण राखली त्यास मी शपथेप्रमाणें आपले नेमणुकीप्रमाणें चालवीन. यास अंतर करणार नाहीं. फार काय लि॥ बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे हे विनंति.

मोर्तब सुद.

श्रीमार्तंड
चरणी तप्तर
पिलाजीसूतद.
माजी गायक
वाड मरतंड.

पो। छ ९ माहे सवाल सन इसन्ने खमसेन.

सन १८०८

श्री शके १६७३ श्रावण शुद्ध १३

नकलेची नकल.

राजश्री गोविंदराव चिटणीस गोसावी यांसी.

छ सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य

स्नो। दमाजीराव गायकवाड सेनाखासखेल रामराम विनंति उपरि येथील कुशल ता। छ ११ रमजान पावेतों मुकाम नवसरी येथें जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. आपणाकडून पत्र येऊन साकल्य श्रुत जालें. रावसाहेब आपण आमचेविसीं श्रीमंत छत्रपतीजवळ बहुत श्रम करून महाराज वर्तमान असतां, आमची रवानगी गुजराथ प्रांतीं आपण केली ह्मणून आलों. मागें महाराजांनी कैलासवास केला चिरंजीव राजश्री फत्तेसिंगराव व मानाजीराव व गोविंदराव यांस आपले घरी ठेवून बरदास्त करून सर्व प्रकारें सांभाळ केला, आणि सरकारचे देण्याचा हवाला घेतला. प्रतिबंधापासून मुक्त करविलें. ते रुपये आपल्यास पाठविण्याविसी चिरंजिवाकडून लिहिलें आलें. त्यासी तजवीज करून मागाहून पाठवूं. रावसाहेब चिरंजीवास मोकळे केले हा उपकार विसरणार नाही. आपली चिटणिसीची आसामी सरदारीबराबर वस्त्रें
आपले चिरंजीवाचे नांवे करून घेतली. त्याची तैनात सालीना रुपये २५,००० घरबैठे दरसाल पाववीत जाऊं आणि आपलेकडील कारकून दरखाचे कामावर येईल त्यास दरसाल रुपये ५,००० पांच हजार व पनास घोडीं पागेची त्यास वेतन दरसाल रुपये २१००० येकवीस हजार येकूण सालीना येकावन हजार देत जाऊं याशिवाय फंडफरमासजी मजकडून होईल त्यास अंतर करणार नाही. यास श्री कुळस्वामीवी शफत असे. आपण घरावू रीतीनें मुलाचा सांभाळ करिता. आमचे सरदारीची चिंता आपल्यास. हा सरदारी आपली जाणून तेथील बंदोबस्त ठेऊन वरचेवरी पत्रीं सांभाळीत जावें. विस्तारें काय लिहूं बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंति. मोर्तब.

पौ। छ १९ सवाल सु॥ इसजे खमसेन्न मया व अलफ. शके १६७३ १८०८
शिक्का.

                                                                   रोहिडखोरें - गुप्ते देशपांडे

                                                                                  लेखांक २६६ 

                                                                                                                                                           १५६४ ज्येष्ठ शुध्द ७ 
                                                                                                                                                            (नकल)

5 मा। इनाज दादाजी नरस प्रभु देशपांडे व गावकुलकर्णी ता। रोहिडखोरे (सिका)     यास किले रोहिडे सु॥ सलास रऐन अलफ रोहिरेश्वरचे गाव साडेतीन से टके मलकबरी आहद पुर्वकडील कडा तहद कोकण सरहद शेहद्रीचा कडा दक्षण जोरखोरे कडा उत्तर हिरडसमावळ कडा या बमोजीब तिन सरहदीस तुझे खारीतील गाव श्रीस इनामती अज रख्तखाने वजारत सीवाजीराजे याणी दिल्हा देवाचे पुजेस तुमचे व देशमुखाचे वडिली वेका व नावरटा कोळी ठेविला त्यास हाली राजे मा।रनिल्हे व तुह्मी सिवा जगम नोकरीस ठेविला तो ही खबर कालि मा।र किला येऊन मालूम केले या बाबे तू देशमुख जाब देणेस सिताब येणे छ ५ रबिलावल                 (मोर्तब पारसी)

                  

श्री शके १६७३ भाद्रपद शुद्ध १२

नकल

राजश्री गोविंदराव चिटणीवीस गोसावी यासी :-

 सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य

स्ने॥ दमाजीराव गाइकवाड सेनाखासखेल रामराम विनंति उपरि येथील कुशल ता। छ ११ सवाल पावेतों जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. रावसाहेब आपणाकडून पत्र येत नाही असें नसावें. श्रीमंत छत्रपतीस विनंति करून आमची रवानगी केली. नंतर महाराजांनी मुलास ऐवजाचा तगादा केला. तेव्हां पाहार्यांतून सोडणें कोणाचे वस्तु न जालें. आपण जिमा घेऊन, त्रिवर्ग चिरंजिवास आपले घरीं आणून बारदास्त ठेविली हें. वर्तमान मुलांनी लिहिल्यावरून कळेलें. तो ऐवज येथून पाठविण्यास तजवीज करीत आहों. मागाहून पाठवितों. चिरंजीवाची हुरमत आपण बचाविली. हा उपकार विसरणार नाहीं. आपला धंदा वगैरे बंदोबस्त यादीप्रमाणें मजकडून केल्यांत अंतर होणार नाहीं. आपले चिरंजीवास चिटणीसी दरक पंचवीस हजार नेमणूक सरकारी पागा व कारकुनाचा बंदोबस्त शिवाय एकूण एकावन हजार रुपये पावत जातील. परंतु खासे न आले, तरी पंचवीस हजार रुपये घरीं मिळतील. हरतर्हेनीं पोहोचते करीत जाईन. व पागा व कारकून राहिल्यास शिरस्त्याप्रमाणें पावत जातील. येविसी समक्ष बोललोच आहे व शफत केला. बहुत काय लिहूं. हे विनंति.

मोर्तबसुद्र.

श्री मार्तड
चरणीं तत्पर
पिलाजी सूत द-
माजी गायक
वाड मारतंड

पौ। छ १९ सवाल सन इसन्ने खमसेन. शके ६७१.
सा। १८०६.

श्री. शके १६७३ श्रावण शु॥ ११

पो। छ १६ सवाल.

श्रीमंत राजश्री दादा व तथा तात्या. स्वामीचे सेवेसी.

सेवक बाळाजी शामराज. साष्टांग नमस्कार. विनंति उपर. येथील कुशल ता। श्रावण शुध ११ मु॥ पुणें यथास्थित जाणोन स्वकुशल लिहितीं आज्ञा केली पाहिजे. विशेष. स्वामींनी पत्रें दिल्लीचे कासादा बराबर पाठविलीं, तें शुध १० दशमीस पावलीं. लिहिलें वर्तमान सविस्तर विदित जालें. त्यास, श्रीमंतांची पत्रें श्रीमंतांस दिल्हीं. त्यांस या पत्राअगोधर अंताजीपंताचीं पत्रें आली होतीं. हेंहि दिल्हें. अजुरियाची वाट युक्तीयुक्तीनें करून घेऊं. दुसरें:- आपलीं पत्रें व श्रीमंत रघुनाथरायाचें पत्र बजिनस श्रीमंतबावास दाखविलीं. त्यांणीं अक्षरशाहा वाचून उत्तर दिल्हे की, ते हे कांहीं दोन नाहींत. धणी आहेत. बोलाविलें आहे तर पत्रदर्शनी स्वार होऊन जाणें. जाबसाल तिकडेच आहे. ऐसें उत्तर दिलें. त्यास, स्वामींनी पत्रदर्शनी तिकडे स्वार होऊन जावें. तिकडेच मामलतीचे वगैरे जाबसाल आहेत. बहुधा किल्याचाहि जाबसाल तिकडेच होईल. आह्मीही आठीचौ दिवसांनी रंग पाहून आज्ञा घेऊन येतों. त्यांसच तेथें आर्जवून आपली कामेंकाजें करून घ्यावी. दुसरे : श्रीमंतबाबा आशाड वद्य १३ आले. त्याउपर आह्मी येथून दोन तीन पत्रें पाठविलीं की, तुह्मीं स्वार होऊन जाणें. त्यास, पावलीं न पावलीं ईश्वर जाणें. तेथें प्रसंगी स्वामी आहेत. त्यास, चिरंजीब नारोबाचें साहित्य करून त्याजबराबर राऊत देवावे. त्याच्या कामकाजाची सोई तो करावी. बहुत काय लिहिणें ? हे विज्ञप्ति.

राजमान्य राजश्री त्रिंबकपंतबाबा स्वामीचे सो।. साष्टांग नमस्कार विनंति उपर. आह्मी तो येथें येऊन फसलों आहों. विना आज्ञा जालियावाचून येतां येत नाही. त्यास, आपण तेथें प्रसंगी आहां. तर, चिरंजीव नारोबाचे कामाकाजाविशयीं हइगइ न करावी. बहुत काय लि॥? लोभ असो दीजे. हे विनंति.

सो। विनंति सेवक राघो हरी सा। नमस्कार.

श्री शके १६७३ श्रावण शुद्ध १

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री पुरुषोत्तम महादेव व राजेश्री देवराव महादेव स्वामीचे सो। :-

सेवक महादाजी केशव दिंमत राजश्री विठ्ठल सिवदेव सा। नमस्कार विनंति उपरि. श्रीमंत राजेश्री पंत प्रधान स्वामींहीं गुजरातचे रसदेचे ऐवजी रुपये ५०,००० पनास हजार मुकाम नासिक येथें भरून पावलों सदरहू पनास हजार रुपये देविले ते भरून पावलों. मिति सके १६७३, प्रजापति नाम संवत्सरे, माहे श्रावण सुध प्रतिपदा १ हे विनंतिं.

श्री

शके १६७३ ज्येष्ठ वद्य ५

राजश्री दामोदर माहादेव व पुरुशोत्तम माहादेव गोसांवी यांसि :-

 अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। मलारजी होळकर व जयाजी शिंदे दंडवत विनंति. सु॥ इसन्ने खमसैन मया अलफ. + + + + + जाणून तुह्मांस कमाविशीस महाल सालमजकूर बि॥ महाल.

१ पा। अकबराबाद
१ पा। बिलराम
३ पा। तीन
           १ पा। सोरवा
           १ पा। खेकडी
            १ पा। बाचलाना
          --------
             ३

             १ पा। मारीहेडी
             १ पा। सिधपूर
             १ पा। सिकंदरा
             १ पा। नकली
             १ पा। कनोजहवेली
           -----
            १०

येकूण दाहा महाल प्रांत अंतरवेदीं सांगितले असेत. इमानेंइत. बारें वर्तोन सरकार किफायत करणें. छ १९ रजब, * बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

( लेखनसीमा )

श्री
राजा शाहू नर-
पति हर्षनिधान
बाळाजी बाजीरा-
व प्रधान.

श्री

शके १६७३ वैशाख वद्य १३

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोधर महादेव गोसावी यासि :-
सेवक बाळाजी बाजीराउ प्रधान नमस्कार उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्माकडे मौजे मुगसेर, पो। दिंडोरी, येथील साल मजकूरचा ऐवज येणें. त्यापैकीं बद्दल देणें रा। बहिरजी बाळकवडे नामजाद यास बेगमी बदल रुपये ६४२। साशे सवाबेतालीस देविले असेत. पावते करून पावलियाचे कबज घेणें. तेणेंप्रमाणें मजुरा असेत. जाणिजे. छ. २६ जमादिलाखर, सु॥ इहिदेखमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ?

लेखन
सीमा.

श्री

शके १६७३ चैत्र

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोदरपंत दाजी स्वामीचे सेवेसीः--

पो। नारो शंकर सा। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल मु॥ दर्यावगंज जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. आह्मी आगरेयापासून पंधरा पंधरा कोसाच्या मजली लांब लांब करून येथपावेतों आलों. अद्यपि राजश्री मल्हाररायाचे लस्कराचा सुमार कळेना. त्यांचा मुकाम कोठें आहे ? पुढें कोणत्या रोकें जाणार ? त्यांच्या व तुमच्या लस्करास तफावत किती कोसाचा आहे ? हेंही कांहींच कळेना. सुभेदाराचे व वजिराचे लस्करास वीस पंचवीस कोसाचा तफावत ह्मणून ऐकितों. तथाप वर्तमान कांहीं आलें नाहीं. यास्तव स्वामीकडे राऊत रो। गुणाजी करकरे वगैरे पाठविले असत; तरी सविस्तर लिहिणें. उदईक वजिराचा मुकाम कोठे होईल हेंही लिहिणें. पठाणाकडील बातमी ठीक असेल तेंही लिहिणें. सुरजमल जाटाचा मुकाम पठारीचा आहे. स्वामीस कळावें, याकरितां लिहिलें. आपणाकडील वर्तमान सविस्तर लिहोन पाठवावें. बहूत काय लिहिणें ? कृपा असो दीजे. हे विनंति.

श्री

शके १६७३ चैत्र वद्य ४

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बापूजी बाजीराव गोसावी यांसीः-

पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहित जाणें. विशेष. चिरंजीव राजश्री नानांनीं पत्रें छ. ६ जमादिलावलचीं सांडणीस्वारबा। पाठविलीं तीं छ. १६ मिनहूस पावली. गाईकवाड महारदर्यांत गेला. शाहारांत चौकीबंदी केली. बोलीचालीसहि रा। मल्हार गोविंद पाठविले. इकडून तुह्मी --- राजश्री गोविंदराव गेलेस तो कोंडल्यादाखल आहे. परंतु, तुमचे लोक युद्धास मन घालीत नाहींत या विचारें तुह्मी तहरहाचा निकाल काढाल, व तो कोंडला या अर्थे तोहि निकाल काढून जाईलसें वाटतें. परंतु तिकडे गाइकवाडांनीं सोखी केली; आपण मोंगलासी बिघाड न करावा, या विचारें सलुख केला; तिकडे येतो; गुंता नाहीं; ह्मणोन तुह्मांस लिहिलें. तीं पत्रें पावलीं नाहींत तों गाइकवाडास निरोप दिल्हा असाल तर दिल्ही. जरी पत्रें पावली असतील, तुह्मी निरोप दिल्हा नसेल; तर याउपरि निरोप न द्याल. दम धरून, त्याचें कबिलाबाड बंद करून, सिर्मिदा करणें; तों आह्मी येऊन पावतों. त्याजपासून दोनच गोष्टींचा निकाल करून घेणें आहे. तो विस्तार चिरंजीव नानाचे पत्रीं लिहिला आहे, त्याप्रमाणें तुह्मी करालच कराल. करणें. वर्तमान लिहित जाणें. चिरंजीव नानास विस्तारें लिहिलें आहे. तें, तुह्मी विचार करून कर्तव्य तें करीत जाणें. हे विनंति.