Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री
शक १६७३ चैत्र वद्य १
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बापूजी बाजीराव स्वामी गोसावी यासी :-
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जाणें. विशेष. तुह्मी व चिरंजीव राजश्री नाना-बराबरील फौज सारे एकदिल होऊन छ २७ रबिलाखरीं गायकवाडाशीं युद्ध केलें, गेंड्यापावेतों मोडून ताराज केलें, ह्मणोन विस्तारें चिरंजीव राजश्री नानांनीं सांडणी स्वारावर लिहून पाठविलें, तें पत्र आजी छ १२ जमादिलोवलीं पावलें. संतोष जाहाला. शाबास लोकांची व तुमची .. गाइकवाड वेणेवर आहे, तुह्मी कृष्णेवर आहां, ह्मणोन सांडणी स्वारांनी जबानीं सांगितले. ऐशास, राजश्री मानाजी पायगुडे व तात्याही तुम्हांजवळ येऊन पावलेच असतील. तुमची इबारत गाइकवाडावरी चढली. अतःपर गाइकवाडांस थोपून राखणें. आह्मी मजलदरमजल येत आहों. इकडील सर्व गुंते उरकले. मोगलाचा उत्तम प्रकारें सलुख जाहाला. आजी छ. १२ जमादिलोवली निजामकोंड्यावर मुकाम जोहाला. उदैक पुढें येतों. जोपर्यंत गाइकवाड वारापाणी जाहाला नाही, तों तुह्मी सारे गटून राहाणें. जोर पोहचल्या ताराज करणें. वर्तमान वरच्यावरी लिहित जाणें. * आह्मांस अलीकडे भरंवसा नव्हता. तथापि, तुह्मी, चिरंजीव नानांनीं हिमत बांधोन फिरोन त्याजवर सलाबत बसिविली, हे गोष्ट फार केली ! तुमचा वेढा पडलाच आहे, फिरोनहि जरबा द्याल, तेव्हां त्यास भारी पडेल, पळून जाईल, अगर लटकीफुटकी बोली तुह्मांसी लावील. त्यास तुह्मीं, चिरंजीव, मिळोन, नेट धरून, उत्तम प्रकारें कार्य करणें. आह्मीं लवकर येऊन पोहचतों. छ. १४ जमादिलोवल. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २६५
श्री
महाराज राजश्री आनंदगिरी बावा महंत मु॥ का। निंब
स्वामीचे सेवेसी
सेवेसी सेवक सुर्याराउ पिसाळ देशमुख पा। वाई चरणावरी मस्तक ठेऊन दंडवत विनंती उपरी गोसावी धरून नेले ह्मणौन गाउकरानी लिहिले होते त्यावरून रदबदल केली यासी हरदोजणापासून मातबर जमान घ्यावे आणि दसनामात पाठऊन द्यावे तेथे जो इनसाप होईल त्याप्रा। जमानाने आणून हजीर करून द्यावे ऐसा तह केला आहे तरी स्वामीनी भोइज अगर हवेली मध्ये कोणी एके जागा गावीचा पाटील जामीन करून पाठऊन देणे व घासदाणाही मागतात तरी याचा कैसा विचार तो लेहून पाठवणे व जमानकतबाही पाठवणे अतीत मोईन पाठऊन हालीं दिसगत न लावणे आह्मासही धंदा उदंड आहे त्वरेने कार्य करून पाठवणे बहुत ल्याहावे तरी स्वामी देव आहेत हे विनंती
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २६४
श्री
(शिक्का) सदानंद
अज सुभा प्रा। वाई ता। मो। मौजे सिधनाथवाडी सु॥ सा अलफ मौजे मजकुरी पेशजी श्री स्वामीचे इनाम दिल्हा होता गोसावी मठी होता तो किर्दी करीत होता ऐसीयासी गोसावी तीर्थे करावयासी गेला मठी श्रीची पूजा करावेयासी बाइको निस्पृही राहिली आहे तरी इनाम ठिकाण आहे त्यापैकी श्रीस जमीन २ दोन बिघे देविली आहे ते देणे ह्मणजे बाइकोचा योगक्षेम चालेल आणि श्रीची पूजा होईल जाणिजे छ १६ रबिलाखर मोर्तबसुद (शिक्का)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २६३
श्री
तीर्थरूप महाराज राजश्री आनंदगिरी गोसावी महंत मठ श्री मु॥ निंब स्वामीचे सेवेसी विनंती गुरूचे बालक हरी देवगीर गोसावी नमो नारायण ओनमो नारायण विनंती आह्मी आपले आज्ञा घेऊन सुखरूप लष्करास छ ५ रजबीं पावलो आमचे कार्य पैकीयाकरिता अटकोन राहिले मग सूर्याराऊ देसमुख यासी विनंती करून बोलिले की जो टका पडेल तो कर्ज काढून देणे कर्ज समेत पैकी देऊनु ऐसे बोलोन मुचलका दिल्हा मग त्यानी कार्याचे मागती मनी धरून कामे चाली लाविले कळले पाहिजे आमचे घोडी आहेत तरी हरएक धामधुमे हलाली हरामी येतात बहुत सावध असणे मठास माणूस पाठऊन सेताभाताचे समाचार घेत जाणे आह्मी तो लौकर येत नाही जधी देसमुख देशपांडे येतील तधीं येऊनु तुह्मी आमचे वाडी करणे काम जाले तरी हे तोंड दाखउनु नाही दंश लघून फकीर होउनु जाउनु काहीं हजार दोनीशे रुपये पाठवणे ह्मणबजबे काम सरभरा होईल घरी मुलामाणसाचे परामर्ष करीत जाणे वाकोजी पाटील येथे आहे हरकोणी माणूस येईल तेव्हा स्मरण करून रामजी पाटील नादवाबालकर याचा कागद पाठवीत जाणे बहुत काय लिहणे कृपा असो दिजे नारायण
(निशाणी त्रिशूळ)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २६२
श्री
तीर्थरूप राजमान्य देवमान्य श्री महंत आनंदगिरी गोसावी मठ
श्री सदानंद मो। निंब याप्रती
पूर्वक सूर्याराउ देशमुख व गंगाजी शंकर व गिरमाजी झुंगो देशपांडे पा। वाई कृतानेक विज्ञापना नमो नारायण ता। छ २४ जमादिलावल मो। बीदरी सुखे असो महाराजाचे गोसावी रा। हरी देवगीर सनद बदल आह्मारोबर आले आहेत त्यास धर्मादायाचे पत्र दुरूस कयास करून दिल्हे इनामतीचे सनदपरवाना दिवाणी करून घेवा आहे त्यास फुरसती आहे गोसावी बहुत श्रम करितो विदित असावे हरी देवगीर श्री महादेवाचे यात्रेस जावया बहुत उत कठित जाले आहेत रुणानुबांधे यात्रेस रवाना करून सेवेसी श्रुत असावे कृपा असो दीजे हे विनंती राजगडतरफेस आपले धर्मादाउ आपले नावे करून घेतला त्यास वीस पंचवीस सुभ्रे खर्च जाले ते हरदेवगिरीस ठावके त्याचेच हाते जाले विदित असावे हे विनंती
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २६१
श्री कृष्ण केशव
मोकदमानि मौजे निंब व मौजे गोवे बेसमी दताजी नाइक देसाई पा। वाई निंब सु॥ समान मौजे मा। चे मठ आहे तो मठ आमचा असे तेथे हर कोण्ही तसवीस देईल त्यास ताकीद करणे तेथे आह्मी जोगिंद्रगिरी गोसावी ठेविले असेत हरएक बाबे त्याची पाठी राखणे यास कोणाचे तसवीस न लाविजे व गोसावीयाचे इनामास वेचिये देऊन मालिस्त करिता तैसेच करीत जाणे उजूर न कीजे हरएक बाबे त्याचे पाठी राखत जाणे मोर्तब
छ २ रमजान
एसजी दुरठा करवे सेत नागरविणे नव खले माहामूरी करविजे नाही तरी + + + +
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २६० सकल गुणसंपन गुभसेवनीं तत्पर सदाचार श्री कमलनयन गोसावी मठाधिपती मुकाम मौजे निंब पो। वाई गोसावी याप्रती प्रीती पूर्वद्यक बाजी राजे घोरपडे दंडवत विनंती उपरी गोसावी कृपा करून पत्रिका पाठविली पावोन परम विश्रांती जाहली उडतरेच्या इनामाचे विशी लिहिले तरी रा। गंगाजीराम पंडितास व मेलगिरी हुदेदारास ताकीद लेहून पाठविली असे गला व नख्त घेऊन येऊन अतीतमुखे सार्थक करणे बहुत लिहिणे तरी तुह्मी निरापेक्षित असा कृपा दुणाविजे हे विनंती (शिक्का)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २५९
श्री
राजश्री निळोपंत स्वामी यासि
विनंती उपरी तुह्मी पत्र पाठविले ते पावले श्री सदानंद स्वामी यास गावगनापैकी देशमुखानी वर्षासन करून दिल्हे आहे त्याविशी त्याजकडील
गोसावी कोरेगावी वर्षीका बा। आले आहेत त्यास काय सांगावे ह्मणून लि॥ त्यास आह्मी कोरेगावी आलीयावर जे करणे ते करावयास येईल तूर्त गोसावी यास जावयासी सांगणे छ ३० मोहरम हे विनंती
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २५८
तेथे सदानंद पादुका मठ आहे दस नामकि छाप
श्री त्र्यंबकराव नीळपर्वनिवासी दस नाम सन्यासी लेहावया कारण ऐसा जे देसाई व देशकुळकरणी व मोकादम व समस्त ग्रहस्त मौजे निंब पा। वाई समस्तास आसीर्वाद उपरी तेथे मठाची व पादुका आहे त्याची लजा तुह्मास आहे ते स्थली तुह्मी भले आहा तरी पाच जण मिळोनु त्याचा प्रतिपाळ करणे जो कोण्ही जो वैरागी मठात राहेत त्यास मठांत ठेवणे जो संयोगी होय त्यास मठात राहो नेदणें मठाचे बाहे राहेल व मठासी दावा न करे वैरागी कोई न हो व जगनाथ बालक आहे हा भला आहे तरी तुमचा चित्तास मानत असेल तरी याचे संस्थापन करणे याचा साभाळ कराल तो आह्मास पावेल कमळनयन तुमचे वडिली बैसविला हा कालपर्यंत तुह्मीं चालविलें पुढें ही याचा प्रतिपाळ करणे हे तुमचे यश आहे बहुत लेहणे नलगे तुह्मी भले आहा या कारणे तुह्मास लिहिले आहे जागाची प्रतिष्ठा राहेल ते करणे व दताजी नाइक देशमुख ॥ आशीर्वाद तेथे मठात जगनाथ बरवा आपले स्वधर्म रक्षून असेल तरी याचे बरवे चालवणे याची कोण्ही खास्ती करील त्यास तुह्मी ताकीद करणे मठ तुमचा आहे याची पाठी राखोनु मठाचे संरक्षण करणे तुह्मी देसाई आहेस व मिरासी आहे व भला आहेस याजकारणे मागुत्याने दुबारा तुह्मास लेहिले आहे जगनाथगिरीचा बहुत सांभाळ करणे याची खास्ती करील त्यास ताकीद करणे येविशी आमची आज्ञा आहे यास जतन करणे हे आशीर्वाद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २५७
श्रीसंकरप्रसन
तीर्थस्वरूपमुहुर्ती महामेरू देवमाने याविराजित राजमान्या राजश्री कमलनयन गोसावी मोकाम निंब स्वामी गोसावी याचे सेवेसी
.॥ विनंती विद्यार्थी शंकराजी राजे मोहिते देशमुख का। बालाघाट सास्टागी दडवत विनती उपरी स्वामी यानी आशीर्वादपत्र केशवगिरी गोसावी हाती पाठविले ते उत्तम समई पावोन परम संतोष पावलो कितेक वर्तमान इनामाचे विसी लिहिले तरी आह्मी राजश्री सुभेदार साहेबास लिहिले असे तेही भले धर्मप्रायन आहेती त्यापासून धर्मकार्यास अंतर पडणार नाही व आह्मीही जैसा प्रयत्न करू ए तैसा करून देवाचे कार्यास अंतर न पडे व नंदादीपाविशी लिहिले तरी तो विवेक बरे च होईल कितेक वर्तमान केशवगिरी गोसावी सांगता सेवेसी विदित होईल आह्मी विद्यार्थी असतोत घडीघडी निरोप जो असेल तो लिहित गेले पाहिजे आह्मी सेवक असो सेवेसी अंतर पडणार नाही सेवकासी आशीर्वादपत्र पाठवीत गेले पाहिजे