श्री. शके १६७३ श्रावण शु॥ ११
पो। छ १६ सवाल.
श्रीमंत राजश्री दादा व तथा तात्या. स्वामीचे सेवेसी.
सेवक बाळाजी शामराज. साष्टांग नमस्कार. विनंति उपर. येथील कुशल ता। श्रावण शुध ११ मु॥ पुणें यथास्थित जाणोन स्वकुशल लिहितीं आज्ञा केली पाहिजे. विशेष. स्वामींनी पत्रें दिल्लीचे कासादा बराबर पाठविलीं, तें शुध १० दशमीस पावलीं. लिहिलें वर्तमान सविस्तर विदित जालें. त्यास, श्रीमंतांची पत्रें श्रीमंतांस दिल्हीं. त्यांस या पत्राअगोधर अंताजीपंताचीं पत्रें आली होतीं. हेंहि दिल्हें. अजुरियाची वाट युक्तीयुक्तीनें करून घेऊं. दुसरें:- आपलीं पत्रें व श्रीमंत रघुनाथरायाचें पत्र बजिनस श्रीमंतबावास दाखविलीं. त्यांणीं अक्षरशाहा वाचून उत्तर दिल्हे की, ते हे कांहीं दोन नाहींत. धणी आहेत. बोलाविलें आहे तर पत्रदर्शनी स्वार होऊन जाणें. जाबसाल तिकडेच आहे. ऐसें उत्तर दिलें. त्यास, स्वामींनी पत्रदर्शनी तिकडे स्वार होऊन जावें. तिकडेच मामलतीचे वगैरे जाबसाल आहेत. बहुधा किल्याचाहि जाबसाल तिकडेच होईल. आह्मीही आठीचौ दिवसांनी रंग पाहून आज्ञा घेऊन येतों. त्यांसच तेथें आर्जवून आपली कामेंकाजें करून घ्यावी. दुसरे : श्रीमंतबाबा आशाड वद्य १३ आले. त्याउपर आह्मी येथून दोन तीन पत्रें पाठविलीं की, तुह्मीं स्वार होऊन जाणें. त्यास, पावलीं न पावलीं ईश्वर जाणें. तेथें प्रसंगी स्वामी आहेत. त्यास, चिरंजीब नारोबाचें साहित्य करून त्याजबराबर राऊत देवावे. त्याच्या कामकाजाची सोई तो करावी. बहुत काय लिहिणें ? हे विज्ञप्ति.
राजमान्य राजश्री त्रिंबकपंतबाबा स्वामीचे सो।. साष्टांग नमस्कार विनंति उपर. आह्मी तो येथें येऊन फसलों आहों. विना आज्ञा जालियावाचून येतां येत नाही. त्यास, आपण तेथें प्रसंगी आहां. तर, चिरंजीव नारोबाचे कामाकाजाविशयीं हइगइ न करावी. बहुत काय लि॥? लोभ असो दीजे. हे विनंति.
सो। विनंति सेवक राघो हरी सा। नमस्कार.