श्री शके १६७३ श्रावण शुद्ध १
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री पुरुषोत्तम महादेव व राजेश्री देवराव महादेव स्वामीचे सो। :-
सेवक महादाजी केशव दिंमत राजश्री विठ्ठल सिवदेव सा। नमस्कार विनंति उपरि. श्रीमंत राजेश्री पंत प्रधान स्वामींहीं गुजरातचे रसदेचे ऐवजी रुपये ५०,००० पनास हजार मुकाम नासिक येथें भरून पावलों सदरहू पनास हजार रुपये देविले ते भरून पावलों. मिति सके १६७३, प्रजापति नाम संवत्सरे, माहे श्रावण सुध प्रतिपदा १ हे विनंतिं.