श्री
शके १६७३ वैशाख वद्य १३
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोधर महादेव गोसावी यासि :-
सेवक बाळाजी बाजीराउ प्रधान नमस्कार उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्माकडे मौजे मुगसेर, पो। दिंडोरी, येथील साल मजकूरचा ऐवज येणें. त्यापैकीं बद्दल देणें रा। बहिरजी बाळकवडे नामजाद यास बेगमी बदल रुपये ६४२। साशे सवाबेतालीस देविले असेत. पावते करून पावलियाचे कबज घेणें. तेणेंप्रमाणें मजुरा असेत. जाणिजे. छ. २६ जमादिलाखर, सु॥ इहिदेखमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.