Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २६७ ]
श्रीमार्तंड. शके १६७४ आश्विन शुद्ध १२.
राजश्री दामोधर महादेव गोसावी यांसिः--
अखंडितलक्ष्मी अलंकृतराजमान्य स्ने॥
मल्हारजी होळकर दंडवत विनंती सु॥ सलास खमसैन मया अलफ. तुह्माकडे सरकारचा ऐवज ते ऐवजी बा। देणें राहुजी पें॥ यांसी समजाविसपैकीं रु॥ ४००० च्यार हजार देविले असेत. सदरहू ऐवज मा।रनिलेनीं मुरार नाईक यांसी कर्जाच्या ऐवजी देविले असेत. सदरहू पावते करून कबन घेणें. सदरहू ऐवजाची वरात पेशजी दिल्ही होती ते हरपली. आजी सबब हे वरात दिल्ही असे. छ. १२ जिल्हेज. हे विनंति.
मोर्तब
सुद.
बार. रुजू.
श्रीह्माळसाकां-
तचरणीं तत्पर खं-
डोजीसुत मल्हार-
जी होळकर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २६६ ]
श्री. शके १६७४ आश्विन शुद्ध ११.
राजश्री दामोदर माहादेव गोसावी यांसिः--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। मलारजी होळकरे दंडवत विनंति सु॥ सलास खमसैन मया अलफ. सरकारचा ऐवज तुह्मांकडे; ते ऐवजी दा। राहूजी थोरात समजाविसमुळें रुपये १००० एक हजार देविले असेत. सदरहू ऐवज मारनिलेनें रदकर्जमुळें दादोबा मिसाळास देविले असेत. पावते करून कबज घेणें. जाणिजे. छ. १० जिल्हेज. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तबसुद.
बार.
श्रीह्माळसाकांतचरणीं तत्पर
खंडोजीसुत मल्हारजी होळकर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २६५ ]
श्री. शके १६७४ आश्विन शुद्ध ८.
राजश्री दामोधर महादेव गोसावी यांसिः-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्ने॥ मल्हारजी होळकर दंडवत सु॥ सलास खमसैन मया व अलफ. तुह्मांकडे सरकारचा ऐवज, ते ऐवजी बा। देणें राहोजी थोरात समजाविस पैकी रुपये १०२५ एक हजार पंचवीस देविले असेत. सदरहू ऐवज मशारनिलेनीं बाबूराव राम याजला कर्जामुळे देविले असेत. सदरहू ऐवज नख्त पावता करून कबज घेणें. छ. ७ जिल्हेज. हे विनंति.
मोर्तब
सुद.
श्रीह्माळसाकांत
चरणीं तत्पर खंडोजी
सुत मल्हारजी हो-
ळकर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २६४ ]
श्रीमार्तंड, शके १६७४ आश्विन शुद्ध ७.
राजेश्री दामोधर महादेव गोसावी यांसिः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राज्यमान्य स्ने॥
मल्हारजी होळकर दंडवत सु॥ सलास खमसैन मया व अलफ. सरकारचा ऐवज तुह्माकडे ते ऐवजी बा। देणें बाळाजी + + यासी सममजाविसबा। रुपये २६०० सवीससे देविले असेत. ते पावते करून कबज घेणें. जाणिजे. छ. ६ जिल्हेज. हे विनंति.
मोर्तब बार. रु.
सुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २६३ ]
श्री शके १६७४ आश्विन शुद्ध ५.
छ राजश्री दामोधर माहादेव गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने॥
मल्हारजी होळकर दंडवत विनंती सु॥. सलास खमसैन मया अलफ. सरकारचा ऐवज तुह्मांकडे. त्यापैकीं बा। देणें, गंगाजी सितोळे यांसी, रुपये
३५६४ समजाविस.
२४३६ नालबंदी.
----------
६०००
२५० पडली घोडीबा।.
-----------
६२५०
सवासाहा हजार देविले असेत. पावते करून कबज घेणें. छ. ४ जिल्हेज. हे विनंति. मोर्तब सूद.
श्रीह्माळसाकां-
तचरणीं तत्पर खं-
डोजीसुत मल्हार-
जी होळकर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २६२ ]
श्रीमार्तंड शके १६७४ आश्विन शुद्ध ४.
श्रीह्माळसा
कांतचरणीं तत्पर खं-
डोजीसुत मल्हारजी
होळकर.
राजश्री दामोदर महादेव गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥
मलारजी होळकर दंडवत विनंती सुहुरसन सलास खमसैन मयाअलफ. तुह्माकडे सरकारचा ऐवज. ते ऐवजी बा। देणें राहोजी थोरात यासी समजाविसमुळे रुपये ५०० पाचसें देविले आहेत. सदरहू पावते करून कबज घेणें. छ ३ जिल्हेज. हे विनंती.
मोर्तब
सुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २६१ ]
श्रीमार्तंड शके १६७४ आश्विन शुद्ध २.
राजश्री दामोधर महादेव गोसावी यांसि :-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्रो
मल्हारजी होळकर दंडवत विनंती. सु॥ सलास खमसैन मया अलफ. तुह्मांकडे सरकारचा ऐवज. ते ऐवजीं बा। देणें, राणोजी थोरात, समजाविस, रुपये ५,५०० साडेपांच हजार देविले असेत. सदरहू ऐवज पावता करून कबज घेणें. छ. १ जिल्हेज. हे विनंति.
मोर्तब
सुद.
श्रीह्माळसाकांत
चरणीं तत्पर खंडो-
जीसुत मल्हारजी
होळकर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २६० ]
श्रीमार्तड शके १६७४ आश्विन शुद्ध २.
राजश्री दामोधर महादेव गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
मल्हारजी होळकर दंडवत विनंती सु॥ सलास खमसैन मया अलफ . तुह्माकडे सरकारचा ऐवज ते ऐवजी बा। देणें दिनानाथपंत सारोळकर यासी समजाविसमुळें रुपये १८०० आठरासे देविले असेत. सदरहू पावते करून कबज घेणें. छ. १ जिल्हेज. हे विनंति. मोर्तबसुद. बार. रु.
श्रीह्माळसाकांत
चरणीं तत्पर खंडो
जीसुत मल्हारजी
होळकर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २५९ ]
श्रीमार्तंड शके १६७४ आश्विन शुद्ध २.
राजश्री दामोधर महादेव गोसावी यांसी :-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। मलारजी होळकर दंडवत विनंति. सु॥ सलास खमसैन मया अलफ. सरकारचा ऐवज तुह्मांकडे ते ऐवजी बा। देणें दादजी सरवदे समजाविस ------- रुपये
१४४८ खासी दादजी सरवदे.
३४६ होनाजी सरवदे.
---------
१७९४
सत्रासें चौर्याणव देविले असेत. पावते करून कबज घेणें. छ. १ जिल्हेज हे विनंती.
मोर्तब
सुद.
बार. रु.
श्रीह्माळसाकांत
चरणी तत्पर खंडोजी
सुत मल्हारजी होळकर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २७०
श्री १५७४ मार्गशीर्ष वद्य ६
तालिक असली बमोजीब
सिका राजमुद्रा
अज रख्तखाने राजश्री सीवाजीराजे साहेब दामदौलतहू बजानेबु कारकुनानी हाल व इस्तकबाल व सरदेशमुख व देशमुख व देशकुलकर्णीयानि व मोकदमानी व खोतानि व देसकानी व समस्त मिरासदारानी ता। मोसेखोरे बिदानद सु॥ सलास खमसैन अलफ बो। आमराजी निलकठ करजकर सेकीन हिवरे नागेश हुजूर येउनु मामूल केले की ता। मजकुरीचे देहे ७ बि॥
किता एक देहे ६ बि॥ रगो त्रिमल वाकडा गावकुलकर्णी दे॥ मजरे देहे ६
मौजे मोसे बु॥ देखील मजरे ३ न मौजे मोसे खु॥ देह १
१ मौजा मौजे वरसगौ देह १
२ मजरे मौजे सिरकोली देह १
१ साडवघर मौजे साइवे बु॥ देह १
१ पाखरसेत मौजे साइवे खु॥ देह १
-----
२
-------
३ ए॥ देह १
येणेप्रमाणे पेशजी रगोबा मजकूर देहाये मजकूरचे गावकुलकर्णे चालउनु आपला हकलाजिमा व मुशाहिरा व इनाम सेत व आबे पडे व फणस व चिचा व बाजे उत्पन्न जे जे होत होते ते खाउनु सदरहू देहाये मजकुरीचे गावकुलकर्ण चालवीत होता यावरी हावाई ब्राह्मणी राडकी ता। मजकुरी होती तिसी त्याणे सिदलकीचा अमल केला ते खबर जाहिरा होउनु दिवाणात खबर जाहीर जालियावरी यास दिवाणे दस्त करावे तो इतकियामध्ये रगोबा मजकूर अगोधर च पळाला तो जाउनु जावलीस चदररायाच्या आसरियाने तेथे राहिला त्यावरी तो तेथे च देवकरणीने मयत जाला तो निपुत्रिक च होता व भाऊबद हि कोण्ही होते ते कालेदुकाले करून मेले यावरी त्याचे बुडाले दुसरे देहाये मजकुरीची कुलकर्णे चालवावयास कोण्ही नाही ऐसे जाले सदरहू देहाये मजकुरीच्या गावकुलकर्णाचे फार बरे चालिले पाहिजे याबदल सावाजी यशवतराऊ देशमुख व माल प्रभु व गोज प्रभु व जान प्रभु व भान प्रभु देशकुलकरणी ता। मजकूर व देहाये मजकूरचे मोकदम आपणास ह्मणो लागले जे सदरहू देहाये मजकुरीचा गावकुलकर्णी रगोबामजकूर होता त्याचे कुल बुडाले आहे भाऊबद हि कोण्ही नाही ह्मणौनु त्या गावीची गावकुलकर्णे तुह्मासी मिरासी करुनु देतो ते तुह्मी मिरासी करुनु सुखे लेकराचे लेकरी खाणे आणि सदरहू गावीचे गावकुलकर्णाचे काम चालवीत जाणे एकूण देहे ६
किता एक मौजे तोव देह १ या गावास कुलकर्णी मिरासीदार अजबाद नाही तरी ते हि गावीचे कुलकर्ण तुह्मास मिरासी करुनु हि दिले असे हे हि लेकराचे लेकरी सुखे खाणे एकूण देहे १ सदरहू साता गावीची कुलकर्णे तुह्मासि मिरासी करून देतो ते तुह्मी मिरासी करुनु घेउनु सुखे लेकाचे लेकरी खाणे ह्मणौनु ता। मा।रीचे देशमुख व देशकुलकरणी व देहाये मजकुरीचे मोकदम ऐसे बोलिले आणि आपणास सदरहू सात गावच्या गावकुलकर्णाची मिरासीचा कागद शफतपूर्व करुनु दिल्हा आहे त्यावरून सदरहू देहाचे मजकुरीची गावकुलकर्णे आपण चालवितो ऐसियास ता। मजकुरीचे हवलदार ह्मणताती जे आता गावीची कुलकर्णे देशमुखी व देशकुलकरणी यास व देहाये मजकुरीच्या मोकदमानी जे मिरासी करुनु दिली आहे ते तुह्मी सुखे खाणे परतु दिवाणामध्ये सेरणी कबूल करुनु देउनु माहालास खुर्दखत घेऊन येणे ऐसे ह्मणताती तरी साहेब सेरणी जीवानासारिखी आपले माथा ठेउनु ता। मजकुरीच्या कारकुनास खुर्दखत हि आले पाहिजे ह्मणौनु नफरमजकुर हुजूर येउनु मामूल केले व ता। मजकुरीच्या देशमुख व देशकुलकर्णी यास देहाये मजकुरीचे मोकदमी सदरहू साता गावीच्या मिरासीचा सदरहू लिहिलेप्रमाणे कागद करुनु दिल्हा आहे तो हुजूर दाखविला त्यावरून नफर मजकुरास सेरणी होनु ५० पनास बाधौनु यास उगवणी हुजूर घेतली असे तरी तुह्मी यास माहाली ठाणाहून महजर करुनु देणे आणि सदरहू साता गावीच्या गावकुलकरणाचे काम यापासुनु घेत जाणे आणि याचा हक व मुशाहिरा व लाजिमा व मौजे मोसे बु॥ येथे इनाम सेत व आबे पडे ६ व चिच पडे १ एक व फणस पडे १ एक आहेत दुमाले करणे व याची अजाबाद गावगना जो हक असेल तो दुमाले करणे व साता गावकुलकरणाचे मिरासी घरे असतील ते घरवाडे याचे दुमाले करणे तेथे घरवाडा बाधोनु सुखे नादणे खुर्दखताची तालिका तुह्मी लेहुनु असल खुर्दखत नफर मजकुरासी फिराउनु देणे मोर्तब सुद
तेरीख १९ मोहरम