Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

                                                                                   लेखांक २५३

                                                                                                 श्री गणपती

नकल

तपोनिधी राजश्री दौलतगीर बावा मठ निंब गोसावी यासी

स्नो। विसाजी राम नमो नारायण विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जावे विशेष तुह्मीं पत्र पाठविले ते पावले ता। जोरखोरे व जाबुलखोरे सुभा जावली येथील अन्नछत्राकडे सालाबाद गला आहे ह्मणोन लि॥ त्यावरून जांबुळखोरे आह्माकडे नाही जोरखोरे येथील अमलावर कारकून आहे त्यास सालाबादप्रो। वर्षासन गला आहे तो देणेविशी रुबरू ताकीद करून येथील कारकुनास पत्र देविले आहे सालाबदप्रा। वर्षासन चालवणे वरकड मजकूर विठलगीर यासि बोलण्यास आला आहे ते सांगतील त्यावरून सर्व कळेल रा। छ ५ सफर हे विनंती


 

                                                                                      

श्रीवरद शके १६७२ कार्तिक वद्य ८

श्रीमंत राजश्री दामोदर महादेव स्वामीचे सेवेसीः-
पोष्य शामराव गौतम दि॥ राजश्री जिवाजीपंत अण्णा कृतानेक साष्टांग नमस्कार विनांत उपरी. तुह्माकडून ऐवज श्रीमंत पंतप्रधान यांणी रुपये १००००० एक लक्ष देविले ते आपण भरून पावलो असे. मिती कार्तीक वद्य ८ अष्टमी शके १६७२ प्रमोदनाम संवत्सरे दस्तुर खासा. बहुत काय लिहिणे ? हे विनंती.

॥ श्री ॥ शके १६७२ कार्तिक शुद्ध १३

नकल

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री दामोदरपंत स्वामीचे सेवेसीः-

पोष्य जिवाजी गणेश कृतानेक नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहित असिलें पाहिजे. विशेष. खासगी खर्चास आह्मांकडे तुह्मांकडून सरकारांतून गुजराथच्या महालच्या रसदाचे ऐवजीं श्रीमंतांनीं एक लक्ष रुपये देविले आहेत. बजिन्नस सरकारची वरात आहे तेच तुह्मांकडे पाठविली आहे. शहरीं ऐवज द्यावयाचा तुह्मी करार केला त्याप्रमाणेंच वरातींत लिहिलें आहे. तरी पत्र पावतांच शहरची हुंडी करून देऊन रोकडा ऐवज मुदतीप्रमाणे शहरीं प्रविष्ट होये ते केले पाहिजे. आळंदीच्या यात्रेतील जिनसांचे खरेदीस हा ऐवज आह्मांस आपणाकडून देविला आहे. याजकरिता, ऐवज लौकर पावता होये तो अर्थ करावा. सदर्हू ऐवज आणावयासि रो। रामराव गौतम यांस पाठविले आहे. याची रवानगी शहरास सत्वर करून शहरी बाबूजीनाईक भिडे यांचे दुकानीं ऐवज जमा करावा. कळलें पाहिजे. मित्ति कार्तीक शु॥ १३, शके १६७२, प्रमोदनामसंवछरे. बहुकाय लिहिणे ? लोभ असोदीजे हे विनंती.

                                                                                   लेखांक २५२

                                                                                                       श्री

तपोनिधी आनंदगिरी महंत यास प्रति राजश्री राजा शिव छत्रपती उपरी तुह्मी पत्र पाठविले ते प्रविष्ट जाले भवानगिरी याणी मौजे इडमिडे येथे बाकीचा तगादा लाविला आहे परतु बाकीचा बयान पाहाता गयाल मयत जलीत आहे याकरिता स्वामीनी गावास कौल देऊन रयत सुखरूप राहे उपसर्ग न लागे ऐसे केले पाहिजे ह्मणून लिहिले ते विदित जाले ऐसीयास भवानगिरी याचे मते गांवाकडे बाकी आहे आणि तुमचे मते त्याणी बाकी काहाडिली आहे गलतथ आहे ऐसे तुमच्या लिहिल्यावरून कळो आले याकरिता ये गोष्टीचे वर्तमान मनास आणायानिमित्य भवानगिरी याचा शिष्य हुजूर आणविला आहे तुह्मी आपला शिष्य पाठऊन देणे स्वामी मनास आणून जे आज्ञा करणे ते करितील हाली तुमच्या लिहिल्यावरून गावास कौल सादर केला आहे तो देऊन कीर्द करवणे बहुत काय लिहिणे


 

                                                                                      14

॥ श्री ॥ शके १६७२ कार्तिक शुद्ध १२

श्रीमंत राजश्री देवरावजी तात्या स्वामीचे सेवसी:-

पोष्य शामजी गोविंद. साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशळ ता छ ११ माहे जिल्हेज पर्यंत शहरीं यथास्थित जाणून स्वकीय कुशळ लेखन करावें. विशेष. स्वामींनी पत्र पाठविले ते पावले. लि॥ वर्तमान कळों आलें. ऐसेंच निरंतर पत्र पाठवून संतोषवीत जावें. * हिंदुस्थानचें वर्तमान लिहिलें तें कळों आलें. इकडील वर्तमान नबाबाचे दिवाणाचे पेशकार जगनाथ पंडित सिऊरकर होते. त्यास कितेक मनसबदार वगैरे लोकांसी नामाफकत होती, त्यामुळे त्याजला मारिलें. प्रस्तुत फिरंगी बाजवाड्यास जमाव करून आले आहेत, यामुळे हैदरबादेकडे चालिले. गुंडमटकाळेस पोंहचलीयाचीं पत्रें आली. आपण हैदराबादेस जाऊन, रुकनुदौला यास फौज समागमें देऊन पुढे रवाना करणार. त्याची पुढे चाल जालिया याची त्याची लढाई होणार. लढाईच्या प्रसंगामधे ईश्वर काय करतो ? हे पाहावें. वरकड कितेक वर्तमान आपण लिहिलें होतें. त्यास, चिरंजीव लक्ष्मणभाऊंनी लिहिले आहे, त्याजवरून कळों येईल. बहुत काय लिहिणें ? लोभ असो. द्यावा. हिंदुस्थानाकडील वर्तमान येईल, त्याप्रमाणें कृपा करून लिहीत जावें. हे विनंति.

                                                                                   लेखांक २५१

                                                                                                      देऊ

                                                                                            श्री रामजी साहाय
रामराम

तीर्थरूप राजश्री आनंदगीर महंत गोसावी यासी

.5 सिधी महाराज स्नेहांकि(त) दुर्गादासजी व समस्त ठाकूर उपरी येथील क्षेम तो धर्म स्वामीचा स्वामीने आपले स्वानंद लेहावया आशीर्वादपत्री लेखकास आज्ञा दीजे विशेषु गोसावी यानी दया करून श्रीहरदेवगीर व ता। रामगीर याबराबरी आशीर्वाद पत्र पाठविले ते उत्तम समई आह्मापासी प्रविष्ट जाले बहुत संतोष जाला तेथे आज्ञा की ताम्र येऊन मठासबब उपद्रो केला धर्मशाळेस उपद्रो केला परंतु श्री स्वामी आपण येथे आहो मठही जाला पाहिजे व देवाचा नैवेद्य चालला पाहिजे अनछत्र चालिले पाहि(जे) त्यावरी गोदावरीचा मेळा आला आहे येथेही येणार आहेत तरी त्याचे चालले पाहिजे ह्मणून आज्ञा केली तरी मठाचे काय आहे श्रीस्वामी तुह्मी अभग आहा तुह्मी ते ठाई आहा तोवरी श्री चालवील हा भरवसा आहे परतु आह्मी तुमची लाविली झाडे आहो आह्मास आज्ञा करावी तरी आह्मी सेवेस अंतर पडो देणार नाही या समयात खरचाची तुंबडी आहे यानिमत्य पत्र लिहिले आहे देव करील तरी तुमचे कृपेने खरचाची आबादानी होईल आणि आज्ञप्रमाणे सेवेस उभे ठाकोन या समयाची गोष्टी ऐसी आहे कळले पाहिजे कृपा असो दीजे पगे लागणा

श्री शके १६७२ कार्तिक शुद्ध ४

यादीदास्त हिशेबी ब॥ भरणा रसद प्रांत गुजरात ब॥ सनद श्रीमंत राजश्री पंतप्रधान सु॥ इहिदे खुमसैन मया अलफ. छ ३ जिल्हेज. म॥ रुपये

४०००००
रुपये
२०००००    सनद बनाम राजश्री पुरुषोत्तम
महादेव      महाल
१     प्रमाणें अमदाबाद
१     प्रमाणें पेटलाद

दर सदे रु॥ १। प्रमाणें बिनसूट

२०००००        बनाम राजश्री देवराव महादेव
                  महाल
               १ जंबूसर
               १ खंबाईत
               २
दर सदे रुपये १। प्रमाणें बिनसूट
----------
४०००००
यासी भरणा बा। सनद रसीद

---रुपये--

१०००००            वरात देणें खाजगी जमा. राजश्री शिवरामकृष्ण
                        यासी छ ८ जिल्हेच रसीद शामराव गौतम दि॥
                        राजश्री
जिवाजीपंत. मिति कार्तिक वा। ८ शके १६७२
                        प्रमोदनाम संवत्सरे.

                        ऐवज पुण्यांत देविला.
१५००००             वरात राजश्री विठ्ठल शिवदेव बा। देणे
                        शिलेदार नालबंदी.

१०००००             नाशकीं देणें रोख
५००००              औरंगबादेस देणें रोख
-------------
१५००००
छ ९ जिल्हेज सु॥ इहिदे खससैन मया अलफ. रशीदा.

१०००००           बनाम राजश्री महादाजी केशव दि॥ र॥.
                      विठ्ठल शिवदेव. मि॥ मार्गशीर्ष शु॥ ९. शके
                      १६७२ प्रमोदनाम संवत्सरे, सन मजकूर.

५००००            रसद बनाम महादाजी केशव दि॥ विठ्ठल
                     शिवदेव ऐवज अवरंगाबाद येथें दिल्हे, नाशकीं,
                     मि॥ मार्गशीर्ष व॥ १ प्रतिपदा शके १६७२ प्रमोदनाम संवत्सरे.

------------
१५००००

५००००          हुंड्या पुण्याच्या दोन २ नाशकी हून आषाढ
                    व॥१३, शके १६७३, रसीद छ ७ रमजान.

५००००           राजश्री विठ्ठल शिवदेव छ ८ सव्वाल रसीद
                     बनाम महादाजी केशव दि॥ विठ्ठल शिवदेव.
                    मिती श्रावण शु॥१, शके १६७३, प्रजानाम संवत्सरे.

५००००         हुंडी पुणे राजश्री कृष्णाजी भैरव थत्ते नाशकीहून
                   भाद्रपद शु॥ १, शके १६७३, रसीद आश्विन शु॥ ५, सव्वाल.

-------------
४०००००

२१२५           हूंडणावळ हुंड्या ३
१०००           हुंडी १ एक १०००००
५००             हुंडी १ एक ५००००
६२५            हुंडी १ एक ५००००
-------      --------
२१२५       २१२५

-----------------

श्री

शके १६७२ कार्तिक शुद्ध २

पु॥ राजश्री दामोदर महादेव गोसावी यासी:-

विनंति उपरी. नवाबांनीं एकांतीं गाठोन कितेक शब्दारोप ठेविले; त्यांत खुलासा हाच कीं, अंतखेदीत मर्हाटे न आणावे. येविसीं पातशाहा आदिकरून कोणाची सलाह नसतां, आपण सरदारांचा करारमदार बेलभंडार जाल्यावरून आणिले. त्याप्रो। मामलत निभावून हाली खालशाचे मुलुखांत उपद्रव होऊन बोभाट आले. या गोष्टीनें एखादें नाशास कारण होईल ! ते अवरलें जाणार नाहीं ! ह्मणोन त्यांणीं कितेक शब्द लाविल्यास, त्या त्या प्रो। नबाबांसी तुह्मीं जाबसाल समर्थक करून निरोत्तर केल्याचा मजकूर लिहिला, तो समग्र कळला. ऐशास, नवाबांनीं तुह्मांसी मजकूर केले, त्याप्रो। तुह्मीं जाबसाल केले ते उत्तमच केले. पेरोजाबादेचा मजकूर तरी, केशोराम नवाबाचा अमील त्याजवर आमची तज * पै छ १ जिल्हेज.

शके १६७२ आश्विन

+ + सावंतसिंग व ठिला मोदी व पुरोहित जगन्नाथ व शेरसिंगजीचा पुतण्या एसे सदरांकडे जायानिमित्य हजार स्वारांनिसी येऊन दीपावळीस येथें पावलें. श्रीजीची भेटी हि घेतली. किशनकुंडावर सर्व उतरले आहेत. श्रीजीसी लागूं आहेत कीं, एखादा भला माणूस आपल्याकडून हि समागमें देणें. त्यासी, येथून कनहीरामजीस पाठवायाची तजवीज ऐकिली जाते. परंतु कन्हीरामजी ह्मणतात की, विना पंडिताचे रजाबंदीखेरीज माझ्यानें कसें जावतें. त्यासी,

पहावें, कसे तजवीजीनें व सरंजामानें कोण जातो. जरी रजावंदीने घेऊन जाईल तर त्याजबराबरी जाणें नाहीं तरी त्याजबराबरी जावें हें माझी तजवीज आहे. यासी जे सलाह हौलत असेल ते स्वामींनी आज्ञा करावी, की तदनुरूप वर्तणूक केली जाईल. राजश्री नारोशंकर यानी झांशीहून बाळाजी टोका याजबराबर खजाना साडे आठ लक्षांचा पाठविला होता तो बर्हानपुरच्या सुभेदारानें उतरून घेतला, व बाळाजी टोक्यासी धरून कैद केलें, व शहरच्या सुब्यानें पेशखाना बाहेर उभा करविला. व श्रीमंत स्वामीनीं हि डेरा दसर्याचे मुहूर्ते बाहेर केला. उभय पक्षीं निगादास्त फौजबंदी ज्यारी आहे. व जानोजी निंबाळकर श्रीमंतासमीप पुण्यासी गेले. पेशवे जाऊन घेऊन आले. बहुत सन्मानेकडून ठेऊन घेतलें आहे. व मोरोपंत हे हि नवाबासी रुसूद करून ++ बाराहून अन्य ठिकाणीं जाऊन निराळे बसले. ताराबाईनीं रघोजी व फत्तेसिंग व दमाजी गायकवाडाकडील सूत्र तुर्काकडे लाविलें आहे. दमाजीगायकवाडाचा पुत्र नवाबासमीप शहरीं आहे. विठ्ठल शिवदेव व पवार वरकड सरदार जे गुजरातेकडे मार्गस्त जाहाले होते ते नाशिकापावेतों येऊन पावले असतां, मागती या गडबडीनें श्रीमंतासमीप परतून गेले. व दमाजी निघाला ह्मणून जे वदंती उडाली होती ते सर्व इष्कल आढळली. या गडबडीकरितां सरदारांस हि बोलाविले आहे. त्याजवरून मकारनामकाची वासना तुर्त रोहिल्याकडील मामिला फैसल केल्या विरहित परतायाची दिसत नाहीं. व जकारनामक जाऊं ह्मणतात. व पलबंदी हि पार उतरायाची होऊन वजिराकडे फरखाहंदचे रुखें कुच सरदारांहीं केलें. वजीर हिकडे माणिकपुराहून येणार, भेटी उभयपक्षीं जाल्यावर, पहावें, कोणीकडील रुख करितात ? हें तो सर्व हि स्वामीसमीप तथ्य लिहिले. श्रीमंत दादासाहेब व नानासाहेबाचे येत असेल ते खरें ! परंतु, इकडील वर्तमान जे कांहीं ऐकण्यांत आले ते निवेदनार्थ विनंति केली असे. हरि गोविंदजी सुटले. पांचांची निशापात ग्रहस्थांची परभारे जाहाली. त्याजमुळें जकार याजकडील गृहस्थांन विषम मानून त्याजपावेतों लिहिलें होतें. त्याजवरून आह्मांला हि ताकीद येऊन पावली कीं, सर्व हि मिळोन वर्तावें. कदाचित् निराळे निराळे वर्तणुक करावयाची कामाची गोष्ट नाही. तर यासी माझी का--

श्री

शके १६७२ आश्विन शुद्ध ९

राजश्री दामोदर महादेव गोसावी यासीः-

अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। मलारजी होळकर दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणऊन स्वकीयें कुशल लिहित जाणें. विशेष. गंगापार होऊन पठाणास तंबी पोंहचावयाचा विचार करून पुलाची तरतुद करवीत असों. बाहिरवार ठेवणें लागेल. निगेवजीस कांहीं जमियेत राहील. रूपराव खिचर यासी श्रीमंत राऊसाहेबीं विरादरांत जाणत होते, येथें जमियेत सुद्धां पोंचल्यास त्याचे तरफेनें निगेबजीची खातरजमा असे. तरी नवाबास सांगून दोघा भावांतून एकजण जमियेत सुद्धां येऊन येथें पोहचत तें करणें. ते इकडे चाकरीस येतील. मागें त्यांच्या तालुकियासी कांहीं उपसर्ग न लागे तें करणे. विश्वासूक, कार्याचे मणृश ( मनुष्य ) असत. याजकरितां लिहिलें आहे. तरी, लिहिल्याप्रो। त्यांचे येणे होय, तें जरूर करणे. छ ७ जिल्काद. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.