Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २७५ ]
श्री शके १६७४ फाल्गुन वद्य २.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बापूजीपंत व राजश्री पुरुषोत्तमपंत स्वामीचे सेवेसीः--
पो। अंताजी माणकेश्वर सां। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्मांस फौजेच्या कारभारामुळें व पातशाहाच्या घरच्या चाकरीमुळें वर्षासन मोईन करार केली रुपये ५०,००० पनास हजार. त्याप्रो। साल दरसाल घ्यावे. तुह्मी आपणापासून व पातशहापासून उर्जित सर्वस्वें करावें. यंदाचे व सन सलासचे रुपये पनास हजार तुह्माकडे फौजेचा पैका येणें आहे रुपये साडेच्यार लाख त्यापैकी देऊन. नवी फौजेची सनद नसतां तुह्मापासून घेतले रुपये ३,००,०००. सदरहू तीन लाख रुपयांची नेमणुकेची सनद श्रीमंतांची अथवा सरदारांची तुह्मांस आणून देऊन. जरकरितां श्रीमंतांची अथवा सरदारांची तीन लाखाची सनद आणून न देऊं, तरी तीन लाख रुपये आपण तुमचे घरां भरून देऊन. तुह्मी सर्व प्रकारें आह्मांसी इमानें प्रमाणें चालावें. तुह्मांस ईश्वर दरमियान आहे. दुसरा अर्थ नाहीं. जुनें फौजेची पांचमाही रोजमरियाची दीड लाख रुपयाची सनद नाहीं तीही आणून देऊं. एकूण साडे च्यार लाखाची सनद आणून देऊं. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ असों दीजे. हे विनंति. छ. १५ जमादिलावल, सु॥ सलास खमसैन मया व अलफ. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २७४ ]
श्री. शके १६७४ फाल्गुन वद्य २.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बापूजीपंत व राजश्री पुरुषोत्तमपंत स्वामीचे सेवेसीः---
पो। अंताजी माणकेश्वर सां। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. आह्मांस उभयतासरदारांनीं पातशाहाचे चाकरीस दिल्लीस पाठविलें. फौज अडीच हजार. आह्मी ग्वालियेर प्रांतास आलों. तेव्हां तुमचीं पत्रें दोन चार आलीं की, नवाब वजीर यानें नवाब बाहादर मारिला. पुढें पातशाहासी दगाबाजी करणार. याजकरितां आह्मांस पातशाहांनी बोलावून सांगितले कीं, तुमची फौज पांच हजार सत्वर बोलावणें. आह्मी अर्ज केला कीं, फौज ग्वालियेरींत आली. पातशाहांनी रागें भरून सांगितले की, फौज थोडी आहे, कराराप्रों पांच हजार फौजेनसीं आपले सरदार चाकरीस बोलावणें, उणी फौज आली तरी कार्यास येणार नाहीं. करारांत अंतर नसावें. या प्रा। आज्ञा केली. तरी तुह्मी दुसरी नवी मर्हाठी फौज अडीच हजार ठेवणें व पहिली अडीच हजार एकूण पांच हजारानसीं सत्वर येऊन पोहोंचणें. त्याजवरून आह्मी नवी फौज ठेविली. स्वार १५०० दीड हजार व कदीम फौज अडीच हजार एकूण च्यार हजार फौजेनसीं तुह्मांजवळ चाकरीस आलों. साहा महिने तुमचे आज्ञेप्रमाणें पातशाहाची चाकरी करून पातशाहाही राजी राखिले. अडीच हजार फौजेची नेमणूक माहे पुर्णिमापरियंत होती. त्याप्रमाणें तुह्मी पैका दिल्हा. पुढें अडीच हजार फौजेस दरमाह रोजमुरा पहिल्याप्रमाणें, दरमाहे रुपये तीस हजार, एकूण पांच माहीं रुपये १,५०,००० दीड लाख, नवी फौज दीड हजार, त्याचे रुपये तीन लाख, एकूण साडेच्यार लाख रुपये आह्मास पाहिजेत. तेव्हां तुह्मांस सांगितले कीं, आह्मांस ठेवणें तरी साडे च्यार लाख रुपये देणें, नाहीं तरी खावंदाकडे जाण्यासी निरोप देणे. त्यासी, तुह्मी सांगितले की, तुह्मी श्रीमंताचे सरदार, पातशहाचे चाकरीस तुह्मास पाठविले, आणि विनाखावंदाची आज्ञा व पातशाहीची रुकसतीशिवाय जाणें उत्तम नाहीं, पातशाहाचीच चाकरी करणें अथवा सरदार लिहितील तेव्हां जाणें. सहरहू साडेचार लाख रुपये आह्मी तुह्मास सरकारचेऐवजी क्षेपनिक्षेप देतों, श्रीमंताचे फौजेनें चाकरी पातशाहाची केली ती श्रीमंतांची जाली, चिंता काय ? साडेच्यार लाख रुपये घेऊन पातशाहा सांगतील त्याप्रों। चाकरी करणें, ह्मणजे श्रीमंताचा नक्षा होतो. त्याजवरून आपण कबूल केलें, ज्याप्रों। चाकरी तुह्मी सांगाल त्याप्रमाणें करून खाविंदाचा व वडिलांचा लौकिक राखून पातशाहा वगैरे यांजपासून बहुमान मनसबा जागिर, व इनामगांवे. वगैरे तुमचा यत्न जेथवर इमाना प्रों। होईल तेथवरी करून घ्यावें, आह्मी तुमचे मर्जीप्रा। चालावें. हरयेक विशयीं तुह्मा आह्मांत याउपरि प्रतरणा कामाची नाहीं. जें तुमचें बरें तें आमचें बरें. आमचें बरें तें तुमचें बरें. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ असो दीजे. हे विनंति. छ. १५ जमादिलावल, सु॥ सलास खमसैन मया व अलफ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २७३ ]
श्री.
शके १६७४ माघ वद्य १३.
श्रीमंत राजश्री दामोधरपंतदादा स्वामींचे सेवेसीः--
पो। बाळाजी शामराज कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत गेलें पाहिजे. यानंतर पां। टोंक व रामपुरा खुर्द येथील मामला श्रीमंत राजश्री मल्हारजी होळकर व राजश्री जयाजी शिंदे या उभयतापासून करून घेतला. त्याची रसद रु॥ ४,०१,२५१ च्यार लाख एक हजार दोनशें एकावन भरले. त्या भरणियांत तुह्मांपासून रु॥ १,००,००० लक्ष घेऊन भरले. त्यास, सदरहू रु॥ त्याचें खत आमचे नांवे आहे. त्यास व्याज दरसदे रु॥ १।. सवोत्रास हुंडणावळ दरसदे रु॥ ४ च्यार व मुशाहिरा रु॥ ४ च्यार लेहून घेतला आहे. त्यास, सदरहू व्याज मुदल मुशाहिरा हुंडणावळ जो सरकारांतून वसूल होईल तो रु॥ यांत हिसेरसीद बसून यथाविभागें वाटून घेऊं. मिति सके १६७४, अंगिरानामसंवत्सर, माघ वद्य १३. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २७२ ]
श्री. शके १६७४ पौष शुद्ध ३.
राजश्री दामोधर महादेव व राजश्री पुरुषोत्तम महादेव गोसांवी यासिः--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने॥
मल्हारजी होळकर दंडवत विनंति सुहुर सन सलास खमसैन मया अलफ. प्रा। सोरम व प्रा। गंगेरी व प्रा। बांचलाणा कटक प्रांत अंतरवेद येथील फडनिसीचें काम राजश्री वासुदेवराम याजकडे सांगितले असे. तरी याच्या हातून लिहिणियाचें प्रयोजन घेऊन वेतन रुपये ३०० तीनसें प्रा। मजकूरपैकीं पावते करीत जाणें. छ. १ रबिलावल. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २७१ ]
श्री. शक १६७४ कार्तिक वद्य १२.
पु॥ राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यासीः----
उपरि याच्या मनांत जैसा स्त्रेह चालतो तैसा चालावी; गडकिल्याविसीं इमानप्रमाण बेलभंडार घ्यावा; आपला इमान घ्या; ऐसें जाहालें तरी येविसींचा जाब यथाज्ञानें आज्ञेप्रमाणें करूं, ह्मणून लिहिलें तें कळलें. ऐशास, पूर्वी नवाबाचा आमचा स्नेह जाहिरा मात्र होता. परंतु पेशजी सैद लस्करखान आले; यांचे मारफातीनें परस्पर वचनप्रमाणपूर्वक स्नेह जाला. त्या दिवसापासून नवाबाचे खैरख्वांईत आह्मीं किमपि अंतर न केलें. कितेक नवाबाचे मतलब हासील व्हावे, याकरितां नानाप्रकारचे प्रयत्न करनाटकविशयीं वगैरे केले. कांहीं आपल्या खावंदापाशीं बदलामहि जाहाले. तथापि नवाबाचें मनाकधारण करावें, याविचारें जें करणें तें केलें. ऐसें असतां गरजगो लोकांनीं मनास येईल तसे नवाबास समजाविलें; त्यावरून संदेह मनांत आणून रूक्षता धरिली. तर, आजी नवाबाप्रमाणें बुद्धिमंत दुसरा पातशाहींत कोण आहे ? तथापि दुसर्याच्या सांगीवर विकल्प वाढविला. असो. थोर आहेत ! जें उत्तम जाणतील तें करतील. आह्मीं मतलब घातले, ह्मणून वाईट मानिलें; तर चित्तास वाटेल तें करावें. परंतु सविस्तर आमच्या मतलबाची याद पाहावी; आणि अंदेशा करावा. कीं त्यांत नवाबाचा नफा किती व तोटा किती ? ऐसा विचार करून जे जाबसाल करणें ते करावे. मतलब करून न दिल्हे तर त्याविना आमची कांहीं बहुतशी हान आहे, यास्तव वारंवार लिहितो असें नाहीं. परंतु नवाब, आह्मी एक, हें अटकपासून रामेश्वरपर्यंत लौकिक आहे. त्यास, आतां नवाबाच्या व आमच्या मनांत विकल्प, हें उभयपक्षीं श्रियस्कर नाहीं. याकरितां चित्तास हळहळ ! वरकड, होणें तें दैवगतीनेंच होईल. राजश्रीच्या जावयास जागीर द्यावयाचा मजकूर तर, राजश्रीच्या चित्तास संतोष होवून कर्नाटक वगैरे कांहीं राजश्रीपासून नवाबाचें कार्य करून द्यावें, याअन्वयें बोलिलों होतों. आह्मी कर्नांटकाविसीं राजश्री स्वामीसहि पैगाम करित आलों. त्याचीं बजिनस पत्रें खान येथें असतां दाखविलीं. असो ! फार विस्तार बोलोन काय ? सर्वहि असत्भावनाच नवाबांनी चित्तांत आणिल्यास यत्न काय ? असो ! खान मध्यस्त आहेत. एकांती सविस्तर नवाबास वृत्त आमचे सबाह्मअभ्यंतर मर्जीचे निवेदन खानांनी करावें. तदुत्तर जे आज्ञा करितील ते लेहून पाठवावे. आह्मांस नवाबाचे स्नेहाची फार उमेद आहे. किल्याविसीं, वरकडविसीं जें नवाबास उत्तम तेंच आह्मीं करावें, ऐसा बेलभंडार आह्मांपासून घ्यावा, व नवाबांनीहि निखालसपणें नानकुरान द्यावें. परस्पर निखालसता व्हावी; लौकिकांत विरुद्ध नसावें; हेंच अतःकरणपुरःसर चाहातों. इतकेंहि असोन, नबाब निखालसता न करीत, तरी आमचा उपाय काय ? सारांश सविस्तर खानानें नवाबासीं बोलावें ; उत्तर होइल ते लेहून पाठवावें; ह्मणजे पुढे मागें खानावर उभयपक्षींचा शब्द येणार नाही. रा॥ छ. २४ मोहरम शुक्रवार. बहुत काय लिहिणें ?
( लेखन सीमा. )
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २७० ]
श्री. शके १६७४ कार्तिक वद्य १०.
राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यांसिः–
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्ने॥ बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद उपारि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. नवाबांनी राजश्रीचे जावयाचे जागिरीचे मजकुरावरून वाईट मानून तुटता सालजाब तुह्मांसी केला. वरकड नासरजंगाचे मर्जीप्रमाणें गरमी दाखवावी, ऐसा विचार अवलंबिला. त्यास, थोर आहेत ! जें इच्छितील तें करितील ! करोत! आह्मांसी स्नेह चित्तापासून करावा, सर्वप्रकारे आह्मांस निखालस करावें, यासाठी नवाबांनीं जानबास व खानास पाठविलें. त्यांपाशीं किल्याचा मजकूर नवाबाचे मर्जीप्रों। आह्मीं कबूल केला. वरकडहि कितेक अर्थ जे नवाबाचे उपयोगाचे, तेच सांगून पाठविलें. आमचा स्वार्थ त्यामध्यें कांहीं नाहीं ! असें असतां नवाबांनी सर्व एकीकडे ठेवून गरमी दाखवूं लागले तर, आह्मांस श्रीकृपेनें काय चिंता आहे ? किल्याचा तर आह्मांपासून गरमनरम मध्यस्थांकरवीं बोलवून इमानप्रमाण आह्मांपासून घ्यावा, व आमचे जाबसाल उडवून द्यावे, असें करूं पाहातात; तर तें कैसे आह्मांस अनकूल पडतें ? जे जे अर्ज आह्मी मध्यस्थाबराबर सांगून पा। आहेत ते आयकून, सर्वप्रकारें आपलें नानोकुरान करून देतील, तेव्हां आह्मीहि किल्याविसीं इमान देणें तें देऊं. नाहीतर जें त्यास बरें दिसेल तें तें करितील. आह्मी गनीमलोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहों ! छ. २३ मोहरम वृहस्पतवार संध्याकाळ
( लेखनसीमा. )
० श्री ॅ
राजा शाहू नरपति हर्षनिधान
बाळाजी बाजीराव मुख्य प्रधान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २६९ ]
श्रीमार्तंड. शके १६७४ आश्विन वद्य ३.
राजश्री दामोधर महादेव गोसांवी यांसिः-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने॥ मल्हारजी होळकर दंडवत विनंती सु॥ सलास खमसैन मया अलफ. सरकारचा ऐवज तुह्मांकडे. त्या पैकी बा। देणें पागा नि॥ दादोसिद्धेश्वर समजाविसबा। रुपये २५०० अडीच हजार देविले असेत. पावते करून कबज घेणें. छ. १७ जिल्हेज. बहुत काय लिहिणें हे विनंति.
मोर्तब
सुद.
श्रीह्माळसाकांत
चरणींतत्पर खंडो-
जीसुत मल्हारजी
होळकर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २६८ ]
श्रीमार्तंड. शके १६७४ आश्विन वद्य २.
राजश्री दामोधर महादेव गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥ मल्हारजी होळकर दंडवत विनंति सु॥ सलास खमसैन मया अलफ. सरकारचा ऐवज तुह्मां कडे. त्यापैकीं बा। देणें बाळाजी बापूजी यांसी समजाविस बा। रु॥ ४०० च्यारशें देविले असेत. पावते करून कबज घेणें. छ. १६ जिल्हेज. हे विनंति.
मोर्तब
सुद.
श्रीह्माळसाकांत
चरणीं तत्पर खंडो-
जीसुत मल्हारजी
होळकर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २७१
श्री १५७४ पौष वद्य २
महजर व तारिख १५ सफर हजरमजालसी किले रोहिडा सुहूर सन सलास खमसैन अलफ
→पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
अज महजर ऐसा जे बाजी बिन बाबजी येबी बिन बनाजी व सोनजी बिन दादाजी येबी बिन बालोली पाटील मो। कसबे उत्रोली किले मजकूर याणी किले मजकुरी येऊन अर्ज केला जे आह्मी कसबे मजकूरचे पुरातन मो। चे वतनदार कसबे मजकूरची मो। अनभवित असता दरम्यान सिरले याणी तटा करून अटकाव केला त्याजवरून आह्मापासी दिव्य घेतले आह्मी खरे जालो त्याजवरून सिराले रात्रीस पळोन गेला खोटा जाला त्यास आह्मी दिवाणाकडे आलो आहो आह्मास भोगवटियास पत्र करून दिल्हे पाहिजे त्याजवरून मनास आणिता तुह्मी मो।कसबे मजकूरचे खरे पेशजी तुझे वडिलापासोन मोकदमीची वहिवाट इनाम पासोडी होली पोली घटवात वगैरेसुधा कुल मो। मानापानसुधा अनुभवित आलो हे खरे त्याजवरून तुह्मावर मेहरबान होऊन तुमचा अर्ज खातरेस आणून कसबे मजकुरची मो तुह्मास बाहाल करून मो। बदल इनाम टके ५ पाच व पासोडी टके २ व मानपान होळीस पोली व घटवात वगैरे मानपान हकलाजिमा मा।समधे यजो पुरातनपासून चालत असेल तेणेप्रमाणे मा।चे वतन अनभऊन तुझे फरजंदाचे फरजद अवलाद अफलाद दिवाणचाकरी करून गाऊची अबाधी करून सुखे असणे जाला महजर सही (शिक्का)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २६७ ]
श्रीमार्तंड. शके १६७४ आश्विन शुद्ध १२.
राजश्री दामोधर महादेव गोसावी यांसिः--
अखंडितलक्ष्मी अलंकृतराजमान्य स्ने॥
मल्हारजी होळकर दंडवत विनंती सु॥ सलास खमसैन मया अलफ. तुह्माकडे सरकारचा ऐवज ते ऐवजी बा। देणें राहुजी पें॥ यांसी समजाविसपैकीं रु॥ ४००० च्यार हजार देविले असेत. सदरहू ऐवज मा।रनिलेनीं मुरार नाईक यांसी कर्जाच्या ऐवजी देविले असेत. सदरहू पावते करून कबन घेणें. सदरहू ऐवजाची वरात पेशजी दिल्ही होती ते हरपली. आजी सबब हे वरात दिल्ही असे. छ. १२ जिल्हेज. हे विनंति.
मोर्तब
सुद.
बार. रुजू.
श्रीह्माळसाकां-
तचरणीं तत्पर खं-
डोजीसुत मल्हार-
जी होळकर.