रोहिडखोरें - गुप्ते देशपांडे
लेखांक २६६
१५६४ ज्येष्ठ शुध्द ७
(नकल)
मा। इनाज दादाजी नरस प्रभु देशपांडे व गावकुलकर्णी ता। रोहिडखोरे (सिका) यास किले रोहिडे सु॥ सलास रऐन अलफ रोहिरेश्वरचे गाव साडेतीन से टके मलकबरी आहद पुर्वकडील कडा तहद कोकण सरहद शेहद्रीचा कडा दक्षण जोरखोरे कडा उत्तर हिरडसमावळ कडा या बमोजीब तिन सरहदीस तुझे खारीतील गाव श्रीस इनामती अज रख्तखाने वजारत सीवाजीराजे याणी दिल्हा देवाचे पुजेस तुमचे व देशमुखाचे वडिली वेका व नावरटा कोळी ठेविला त्यास हाली राजे मा।रनिल्हे व तुह्मी सिवा जगम नोकरीस ठेविला तो ही खबर कालि मा।र किला येऊन मालूम केले या बाबे तू देशमुख जाब देणेस सिताब येणे छ ५ रबिलावल (मोर्तब पारसी)