Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

                                                                                   लेखांक २५६

                                                                                                        श्री 

                                                           सदानंदाचे                                                                 तालिक

राजश्री आनंदगिरी गोसावी मठ सदानंद गोसावी यासि

5 अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य                  सेवक महिमाजी पाटील व तान्हाजी पाटील व विठोजी पाटील व परसोजी पाटील व कृष्णाजी कानोजी व विठोजी पा। व बाजे बाप भाऊ समस्त मोकदम मौजे गोवे सा। निंब पा। वाई दंडवत विनंती उपरी आपले आत्मसंतोषे दसनामाचे भंडारीयाबदल जमीन 68१॥ दीड नजीक बागाचे खाली तुकडा दिधला असे लेकराचे लेकरी चालऊन जो हिकहरकत करील त्यास श्री व आपले वडिलाचे इमान असे हे लिहिले सही व आमचे पाटाचे पाणीयासी निसबत नाही तुह्मी आपले धरणी पाणी धरणे कळले पाहिजे हे विनंती.

निशान नांगर

                                                                       

                                                                                   लेखांक २५५

                                                                                                        श्री 

सदानंद मठ निंब
राजश्री बसवतराउ खासखेल हजुराती यासि

प्रती भवानगीर गोसावी आसिर्वाद उपर येथील क्षेम जाणून ता। कार्तिक वद्य सप्‍तमीपावेतो वर्तमान यथास्थित असे विशश श्री स्वामीची झोळी हक पुर्वापार प्रा। वाई व प्रात कुडाळ येथे श्री स्वामीचा हक आहे ऐसीयासि साप्रात कोणी पाटील खलेल करितात तरी आपण प्रांत वाई व प्रांत कुडाळ यांस ताकीदपत्रे हुजुरची व आपली दिली पाहिजे पूर्वापार हक दर गावास एक टका व एक मण गला व तेली याच्या घाण्यास तेल पाच सेर व साळी याच्या मागास कापड तीन हात व धणगरास मागास घोंगडी व चांभाराच्या दुकानास जोडा व सोनाराच्या दुकानास रुपे एक मासा येणेप्रमाणे आहे तरी आपण प्रात वाई येथील संमत वाघोली व निंब व कोरगाव संमत व कुडास देश यास ताकीदपत्रे दिलीयाने तुमच्या राज्यास व तुह्मास कल्याण चितून आपणाकडे सतोशगीर गोसावी पाठविला आहे याजपाशी पत्रे दिली पाहिजेत बहुत ल्याहावे तरी आपण सूज्ञ असेत हे आसिर्वाद                                                                                 

                                                                                   लेखांक २५४

                                                                                                        श्री 

श्रीमत् महाराज मातुश्री आईसाहेब याणी राजश्री समस्त गोसावी मठ वास्तव्य निं बप्रा। वाई यासी आज्ञा केली ऐसी जे तुहमी विनतीपत्र पाठविले ते पाऊन लिहिले वर्तमान विदित जाले इडमिडे हा गाव पूर्वी श्रीस होता त्याप्रो। करार करून द्यावा ह्मणोन लिहिले ऐशियास सातारीयास आगमन जाल्यावर येविसीची जे आज्ञा करणे ते केली जाईल जाणिजे रा। छ ३ जिल्काद हुत काय लिहिणे

 

                                              137

रुजूबार

 

                                                                                      

श्री शके १६७२ फाल्गुन शुद्ध ६

राजश्री दामोधरपंत रावजी व पुरुषोत्तमपंत गोसावी यांसीः--

छ अखंडीतलक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नो। मल्हारजी होळकर व जयाजी शिंदे दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असावे. विशेष. पत्र पाठविलें प्रविष्ट जालें. आपला मुक्काम कोणे ठिकाणीं आहे, आह्मीं कोण ठिकाणी यावें, ह्मणून लिहिलें. ऐसियासी, उदईक गुरुवारीं कुच करून झुणकीवर पांचा कोसाचा मुकाम नेमिला आहे. त्यास, सत्वर आलिया तळावरच भेटी होतील, अथवा मजलीस भेटी होतील. सत्वर आलें पाहिजे. छ. ४ रबिलाखर. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

मोर्तब
सुद.

श्रीह्माळसा-
कांतचरणीं तत्पर
खंडोजीसुत मल्हा-
रजी होळकर.

हिशेब दि।। सरदेशमुखी तहबंद करारनामा सन खरसैन

 

श्री • शके १६७२ पौष शुद्ध १२

यादी जिनस फराशखाना मा। अजमेरी शके १६७२ प्रमोद नाम संवत्सरे, पौष शुद्ध १२.

१० दिवानखाना मजला तिसरा
पडदे बनातीबा। क जाजम छापल्या
५           ४              १
दिवानखाना मजला २
१६ पडदे
         ३ प्रा।
         ४ प्रा।
         ४ प्रा। 

    ५ कोठडी
------
१६

•५ गदड
•६ छत
.५ चांदणी
•५ झालर
दिवानखाना मजला १
३४ पडदे खारवे
       ५ मोठे
        ५ बनाती मोठे
        ८ पालान २ बनाती
        ६ कोठडी बनाती
       -----
         २४
बनात  खारवी
१६      ५
१०    पडदे खारवे
        दिवानखाना
-------
१५
-----३४
८    गदड     जाजम
        ६          २
पैकीं गंगापार तात्याकडे
१         गदड़
             १
६ चांदणी
गंगापार    हरद्वारीं

६   दरवाजे पडदे   ६
बनाती    बनाती
३            ३

श्री

शके १६७२ मार्गश्रीर्ष वद्य ८

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री मल्हार मुकुंद गोसावी यांसी :--

स्नो। बाळाजी बाजीराव आशीर्वाद. सु॥ इहिदे खमसैन मया व अलफ. मातुश्री आईसाहेब यांचे कोठीचे बैल वगैरे ५० पन्नास बरोबर चवडापा कोटवाला बईल चारणीस घेऊन मौजे कुंबठे पा। वरूल येथें चारणीस नेले होते. त्यास मल्हारी डोंब याणें कुंडलवाडीचे हुंडे भाडें करून घेऊन आला; आणि बैलांस अटकाव केला. आजी सबब कीं, चवडापामा।र याच्या भावाकडे रुपये आहेत ह्मणून बहुतांना येऊन बैल अटकाविले आहेत. त्यास, वाणीमजकूर हा मातुश्रीचा कोटवाला, याजकडे लिगाड काय आहे ? तरी तुह्मी मल्हारी डोंब याजला ताकीद करून बैल सोडवून आपले हद्देंतून ताटमुटसुद्धां रवाना करणें, हुंड्या भाड्याचे रुपये जे होतील ते चवडापाचे पदरीं घालवणें. जाणिजे. छ २१ मोहरम.

(लेखनसीमा.)

श्री शके १६७२ मार्गशीर्ष वद्य १

नकल

राजाश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोधर महादेव हिंगणे स्वामीचे सा। :-

सेवक महादाजी केशव दि॥ राजश्री विठल शिवदेव नमस्कार विनंति उपरी. श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीहीं गुजराथचे रसदेचे ऐवजी औरंगाबादेस रु॥ ५०,००० अंक पनास हजार देविले ते मु॥ नासिक येथें भरून पावलों. बहुत काय लिहिणे ? सके १६७२ प्रमोद नाम संवत्सरे, माहे मार्गेश्वर वद्य प्रतिपदा. हे विनंति.

श्री शके १६७२ मार्गशीर्ष शुद्ध ९

नकल

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोदर महादेव स्वामीचे सेवेसीः--

सेवक माहादाजी केशव दि॥ राजश्री विठ्ठल शिवदेव सा। नमस्कार विनंति उपरी. श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीहीं गुजराथचे रसदेचे ऐवजीं रुपये दीड लक्ष रुपये समजाविस नालबंदीस देविले. त्यापैकीं नासिकचे मुकामीं रुपये १००००० एक लक्ष मा। धोंडाजी नाईक नवाळे भरून पावलों. मिती मार्गेश्वर शुद्ध ९ नवमी, शके १६७२, प्रमोदी नाम संवत्सरे, सु॥ इहिदे खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे ? छ. माहे मोहरम. बौ। ॐ

श्री शके १६७२ मार्गशीर्ष शुद्ध १

सो। कृतानेक सा। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशळ तागायत छ २९ माहे माहरम सोमवार, कूच आज भुसावड, व डीग मु॥ सिलमानपूर लस्कर, श्रीजीस्वामीचे कृपाकटाक्षें यथास्थित असे. विशेष. काम्याहून मुजरत कासीद रवाना केला आहे, त्याजवरून सकलही अवगत जालें असेल. सारांश, श्रीजी काम्याहून डीगेस आले. मेजमाची तमाम लस्करासी करवून आपणही भोग लाविली. व खुद राणीसुधा जाटाचे थें जाऊन दर्शनलाभें पावन जाठजाठणीस केलें. से पनास अशर्फी नजरनियाजेच्या मिळवून तोरे नौ व जवाहिर रकम दोनी व एक हाथी मिळविला. तदनंतर सुरजमलजींनीं भरथपुरासी नेऊन तेथील गढचा बंदोबस्त तरतूद सर्व दाखविला. हाथी व घोडे, वस्त्रें व जवाहीर, नजरनियाज त्यानेंही सिष्टाचार करून मेजमानी केली. तदनंतर चौत्र्याची आशा बहुत होती; परंतु चुन्याचे व मातीचे चौथ्यांखेरीज आणखी चौत्रे दृष्टीस न पडले. राणीनेंही हजारपाचाशेयाचीं वस्त्रें व जवाहीर मिळवून त्यासी शोभा दिधली. राज्यही बदनसिंगजीस व सुरजमलजी व त्याचे दोघां पुत्रांसी वस्त्रें देऊन सरफराज केलें. त्यांनीं उभें राहून सिष्टाचार केला कीं, हे जागा तुमची व तुमचे वडिलाची दिधली आहे; आतां ज्यांसी ह्मणाल त्यासी सोंपिली जाईल; आह्मीं सर्वस्वें तुमचे आहों ; कोणाही गोष्टीचा उजूर न जाणावा. त्यांणीं ऐसा सिष्टाचार केल्यानंतर यांणीं त्यासच नवाजिलें. चारीपांच दिवस या सिष्टाचारांत लाऊन खुद येतों, पुत्रांसी पाठवितों, मातबर फौज समागमें देतों ह्मणून + + + + + + + + + + + + + + + + + पुत्रांचा लडा + + + + + न आले. शेवटी आह्मीं आपल्या घरची वाट धरली. बाजार बुनगाह इतर पहिलेंच घराची वाटें लाविलीच होती. आतां आजिचे चौथे दिवशीं घरासी पावावयाचे मुहूर्त काढिलेसे आहे. व, श्रीमंत सुभेदारजी तर वाडाण्यासी जाऊन लागले आहेत. आपाही कोट्यासी येऊन पावले. समीप पावले असतील. दिवाणजी आपण जायाची मस्त त्याजकडील करितात कनहीरामजी तर स्वामीसमीप. वरकड तात्यासो। व सखारामपंत सकलही मुतसदी तिकडेच. याजकडील मामिला लक्षांचा फडस्या कसा कोणाचे विद्यमानें होणार ? व रदबदली व भेटीगोष्ट सवाईजीप्रमाणें श्रीमंत दादासाहेबी घ्यावी; हाही मनसबा यांचा आहे. दिवानजी आपासा।सीही सिष्टाचार करितात. तेथें गेलियावर + + पां।चे विद्यमानें रदबदल गोष्ट मात करावी. जें ज्यासी ल्याहायाची सलाह असेल, तें ल्याहावी. न कळेलासा प्रसंग योजूं नये. वरकड तिकडील प्रसंग मुफसील लेखन करून संतोषविले पाहिजे. मिरबकशी यमुनापार जाले. आतां सरदार तेथील कोणें रुखें होतील ? हें सर्व लि॥ पाहिजे. समयोचित हरएकाचें व कनहीरामजीचें येणें जालिया उत्तम असे. अखेर हाही मामिला मोठा आहे. विस्तार काय लिहूं ? लाला नरसिंगदासजीही सुभेदाराचे समीपच आतां जातील. हे विनंति.

श्री

शके १६७२ कार्तिक वद्य ९

विनंति उपरि. आजी छ २२ जिल्हेजीं माहाबतखानाचे रेतीहून पुढें कुच केला, तुगलाबादचे बराबरीनें. आठ दिवस जाले कीं रेतींत येऊन पडले. एकदां पातशाहाजीस किल्लेंत जाऊन सलाम मुजरा हि करून आले. एकांत लोकांत हि बहुत कांहीं वजिराचे शामिलातीनें केला. सारांश, आडळलें कीं, लकेप तो शिष्टाचार जुबानी बहुत करून, हा काळवर शुष्कतेवर ठेवून, नक्की कच्चा खर्चायासी कपर्दिका, या रीतीनें वरकड मंडळीही उमेदवार ठेवून, कोरडी कृपा दाखविली. त्याजवरून हे वेजार जाले. बल्के, नागरमल व लुत्फल्लाबेग वगैरे जे मध्यस्थ होते यां सर्वांसी बेरुख होत्साते इंतजामुद्दौला वजीर यांसी स्पष्ट सांगून पाठविलें कीं, जर तुह्मासीं निघून यश संपादणें आहे. तर बाहेर निघा, नाहीं तर, आह्मी तर कुच करून जातों. तेव्हां वजीरजी रात्रीस येऊन साहा घटकापावेत एकांत लोकांत करून, बाहेर निघायाचा निश्चय करून, घरासी जाऊन, आजी प्रातःकाळी बादशाहाजीसमीप जाऊन, फते, पेंच व समशेर घेऊन, आज्ञा मागितली; व खास शुका मीर बक्षी व वजीर यांचे नावें लिहून घेतला कीं, जे कांहीं राजाधिराज व वजिरुन्मुमालिक सांगतील ते हजूरचीच जुबानी मानून कर्तव्यार्थ कीजे. या रीतीनें रुकसत होऊन रेतींत जुगलकिशोर यांचे बागांत येऊन दाखल जाले. + + + + + स्वार होऊन गेल्यानंतर नरसिंग + + + + + + दरजंग यांजकडून आले असतां, यांसी दोन वेळा एकांत जाहाला. त्यांचें समाधान निराळें केलें कीं, तुमचा कलह निवारणें, निमित्य व तकशीर माफ करून ध्यायानिमित्त आलों, ईश्वरइच्छेनें सर्व कलह दूर करून बादशाहाजीचे चित्तांतील किंतु दूर करून सर्फराज केले जाईल. या रीतीनें त्यासी लावून घेऊन, परस्परें भेटी जाहल्यानें सर्व मंडळी येईल ह्मणून लावून मायेममतेकडून उत्तरें लिहून पाठविली आणि त्यासी सांगात ठेवून घेतलें. अर्धरात्रीस अकबतमहमूद मीरबक्षीकडून येऊन पावला. त्यासी ठराविलें कीं, वजीर व बादशाहा सर्वहि पाहिले, सार्वभौम तुह्मावरी नाखुश होते, त्यांसी खुश करून जें करणें तें मीरबक्षीचेच विद्यमाने करावें. हा निश्चय करून येथून कुचाचें ठहराविलें. वजीरजीही येणार. ऐसीयासी, जरी तुह्मी लवकर येऊन पावाल तर तुमचेच मार्फातीची गोष्ट होईल; वजीरजी येऊन पावल्यानंतर मग उपाय नाहीं; ह्मणून त्यांसी निराळें लावून घेऊन ममतेनरूप मीरबक्षीस मध्यरात्रीसच मार्गस्थ केलें. त्यासी त्यांचीहि पत्रें आलीं कीं, अकबतमहमुदानें सर्व निवेदन केलें, याजवरून बहुत आनंद जाला, तुह्मीं लवकर येणें, अथवा दिवाण हरि गोविंद यासी तरी पाठविणें, ह्मणजे मजकूर मनासी आणून जें करणें तें लवकर केलें जाईल, तुह्माकारणें दिरंगावर गोष्ट टाकली आहे, विलंब न करावा. व जाटासी लिहिले आहे की :-