Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २५०
श्री
श्रीगणेशायनमा
श्रीमंत तपोनिधी माहाराज राजश्री भवानगीर बावा
महंत स्वामीचे सेवेसी
सेवक शंकराजी कृष्ण दि॥ देशमुखी का। मलेवडी नमो नारायण विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन आज्ञा केली पाहिजे विषेश आपणाकडील आशीर्वादपत्र येत नाही ऐसे उचित नव्हे आह्मी तुमचे स्थापित असो कितेक वर्तमान यादोजी तावरे यानी स्वामीचे सांगितले त्यावरून समाधान जाहले आमचे चित्ती आहे की तुमची स्थापना होवी हे विशी राजश्री बाजीसाहेब स्वारीस जाता आह्मास सागोन गेले आहेत ऐसीयासि स्वामीनी श्रीचे यात्रेस येणे भेटी होईल भेटी अंती अवघे वर्तमान कळो येईल कितेक वर्तमान यादोजी तावरे यास सांगितले आहे तो सेवेसी निवेदन करील चित्तावरी घेऊन अगत्य करून यात्रेस आले पाहिजे बहुत काय लिहिणे कृपा निरंतर असो दीजे हे विनंती
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री
शके १६७२ आषाढ वद्य १२
राजश्री याविराजित राजमान्य राजश्री दामोधर महादेव गो:-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. तुह्मीं अद्यापि नाशिकासच आहां. पुढें त्या प्रांत जावयाची तरतूद + + + + + + + तुह्मीं सरदार बिदा जाहला. + + + + + + + पाठविला आहे. ते सविस्तर + + + + + + + + करावयाची व वोली + + + + पहिली केली आहे त्याची तरतुद कांहींच न केली. तरी फर्मासिविसीं पत्र दिल्लीस लिहिलें असे. याजबरोबर तुह्मी आपलें पत्र लिहून पाठवणें आणि घरबांधावयास एक कारकून आणि पाच हजारपर्यंत रुपये पर्यंत बेगमी करून देऊन पत्र दर्शनीं पाठवून देणें. जाणिजे. छ २५ साबान, सु॥ इहिदे खमसैनमया व अलफ ( लेखन सीमा. )
पै॥ छ २ रमजान
३९
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
॥ श्री ॥
शके १६७२ आषाढ वद्य १२
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोधर महादेव गोसावी यांसी:---
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्मी विनंतिपत्रें पाठविलीं ती पावलीं. राजश्री मल्हारजी होळकर व जयाजी सिंदे यांणीं तुह्माकडून साडे चोवीस हजार रुपये देविले होते. त्यास ऐवज आपणाकडे नाहीं ह्मणून तपसीलें लिहिलें तें कळलें. तपसीलवार हिसेब राजश्री मल्हारजी होळकर यांजकडे तुह्मी पा। आहे. त्याचा जाबसाल ते तुह्मांस लिहितील. त्यावरून कळेल. जाटाबाबत हुंड्या तुमचे निसबतीस आल्या. त्याची हुंडणावळी त्यांणी घेतली नसता तुह्मी हुंडणावळी सरकारांतून घेता, याचा अर्थ काय ? या उपरी हुंडणावळीचा ऐवज तुह्मी येणें प्रमाणें पाठऊन देणें. रुपये
५००० पेशजी दोन लक्षाच्या हुंड्या
आल्या त्याची.
३५०० कित्ताहुंडी सत्तर हजाराची
------- तुह्माकडे आल्याचे रुपये
८५००
येकूण साडे आठ हजार रुपये हुंडी पावली बाबत पाठऊन देणें. विलंब न लावणें. छ २५ साबान सु॥ इहिदे खमसैन मयावअलफ.
( लेखन सीमा )
पै॥ छ १ माहे रमजान.
--------------
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
॥ श्री ॥ शके १६७२ आषाढ शु॥ ११
पुरवणी राजश्री दामोधर महादेव गोसावी यांसिः--
उपरी जाटाबाबत ऐवज येणें. त्याऐवजी राजश्री मल्हारजी होळकर यांणीं तुह्माकडून रुपये १५००० पंधराहजार सरकारांत देविले आहेत. तर मल्हारबाचे पत्र तुह्मांस आहे तें घेऊन सदरहू ऐवज सत्वर पाठवून देणें. एक घडी विलंब न लावणे. साबानसुहिदेखमसैनमयाअलफ.
( लेखनसीमा. )
पौ छ ११ शाबान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्रीमोरया
शके १६७२ आषाढ शुद्ध ७
राजश्री दामोधरपंत गोसावी यांसीः--
अखंडितलक्ष्मी अलंकृतराजमान्य स्नो। मल्हारजी होळकर व जयाजि सिंदे दंडवत विनंती उपर येथील कुशल जाणून स्वकीय कुशल विदित करणें. विशेष. तुह्मांकडे जाटाबाबत ऐवजाची हुंडी रुपये ७०००० सत्तर हजार होती. त्यापैकीं पावले रुपये ५०० बाकी रुपये ६९५०० साडे येकूणहत्तर हजार रुपये राहिले. ते सदरहू ते रुपये श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामी यांजकडे देविले असेत ते पावते करून जाब घेणें. छ ५ शाबान * बहुतकाय लिहिणें ? हे विनंती. सुमाईहिदेखमसैनमया अलफ.
( लेखनसीमा )
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २४९
श्रीशंकर प्रसन्न
तपोनिधी राजश्री भवानगिरी महत स्वामीचे सेवेसी स्नो। मोरो जिवाजी देशपांडे पा। वाई नमो नारायण विनंती उपरी आपण पत्र पाठविले ते पावले मौजे उडतरी यात इनाम आहे त्याविसी लिहिले तरी आपला इनाम पुरातन चालत आला असेल त्याप्रमाणे कीर्द केली पाहिजे आह्माकडून इनामास तगादा लागणार नाही सुखरूप इनामाची लावणी केली पाहिजे बहुत काय लिहिणे आपले समाधान असो दीजे हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
पु॥ ८९
॥ श्री ॥
शके १६७२ ज्येष्ठ शुद्ध १३
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री अंताजी माणकेश्वर गोसावी यासीः-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार सु॥ इहिदे खमसैन मयावअलफ. तुह्मी हिंदुस्थान प्रांतें जातां राजश्री पिलाजी जाधवराव यांच्या परगण्यांत धामधूम केली. कसबे बाबरे प॥ पलिलमरीटा प॥ सुतोडा येथें पैका घेतला, ह्मणून हुजुर विदित जाहालें. तरी म॥ रनिलेच्या तालक्यांत तुह्मांस धामधूम करून पैका घ्यावया गरज काय ? याउपरि त्याच्या मुलुकांत जो पैका घेतला असेल, तो माघारा देणें. येविसीं फिरून बोभाटा येऊं न देणें. जाणिजे छ १२ रजब. आज्ञाप्रमाण.
( लेखनसीमा )
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २४८
श्री
श्रीमत् महाराज मातुश्री आईसाहेब याणी मल्हारजी सावंत पाटील कसबे निंब प्राां वाई यासी आज्ञा केली ऐसी जे का। मजकुरी भवानगीर गोसावी याचा मठ आहे त्यास त्याच्या शिष्यशाखा आहेत त्यासी नसते पेच कुपेच करितोस याकरिता पेशजी आज्ञापत्र सादर केले असता मागती लबाडी करावयास चुकत नाहीस हे गोष्ट कामाची नाही याउपरी सदरहू मठच्या कजीयांत तुवा लबाडी करून पेच केली (या) मुलाहिजा होणार नाही जाणिजे रा। छ २३ रमजान लेखनावधी
रुजू
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
॥ श्री ॥
शके १६७२ चैत्र शुद्ध २ .
राजश्री कोंडो नीलकंठ सुभेदार सरदेशमुखी प्रांत जावळी व्याघ्रगड गोसावी यांसिः--
अखंडितलक्ष्मिअसंकृत राजमान्य. स्नो। हैबतराव केशरकर अजाहत सरदेशमुख रामराम. सुहूरसन इसने खमसैन मया अलफ. बदल देणें धोंडो संभाजी यासि नागली महाल मार्पे .॥. दहा मण देविले असेत. तुह्मांकडील गल्ला ऐन जिनसी येणें त्यापैकीं आदा करून सदर्हू गल्ला पावलियाचें कबज घेणें. छ. ३० माहे रबिलाखर § बहुत लिहिणें ? + हे विनंति.
++
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
॥ श्रीशंकर ॥
शक १६७१
नक्कल
फरमान श्रीमंत पंत प्रधान बाळाजी बाजीराव याचे नांवे,
या दिवसांत करारमदार मल्हारराव होळकर व जयाजी शिंदे खुलासा हे कीं ; श्री महादेव व मार्तंड व कुळस्वामी मधस्त दिल्हे आहेत. आपले जन्मभर शेवाचाकरी हजूरची व पारपत्य शत्रूचा अंतःकरणापासून करूं. अबदाली व राजेरजवाडे व जमीनदार लहान मोठे जो कोणी आज्ञा हजूरची अमान करील त्यांचे पारपत्य करावयास कधींही अंतर करणार नाहीं. आज्ञेप्रमाणेंच होईल. ज्या गोष्टींत सरकार चाकरी होईल तेच करूं. व रजामंदी हजूर व नवाब बहादुर व वजीरुल मु मालकची तेच अमलांत येईल. जो कोणी स्नेही हजूरचा व नवाब बाहादुरचा आहे तोच आमचा व शत्रू त्यांचा तो आमचा आहे. यास अंतराय जो कोणी सरकारची आज्ञा भंग करील त्याचें पारिपत्य मनोदयानुरूप आह्मी करूं, आणि पन्नास लक्ष रुपये ठराव त्यापैकीं तीस लक्ष रु॥ बद्दल पारपत्य अबदाली इनायत केलें. व सुबे मुलतान व पंजाब व थटा व भकर, व कमाविसी च्यार प्रो। नजीक काबील, व कमाविसाहिसार व संबळ व मुरादाबाद व वादाऊं याची चौथ, आमचे फौजेचे खर्चास टहराव जाला. आणि दोन हिस्से सरकारांत व एक हिस्सा शिबंदीस की बरोबर नवाब बाहादर व वजीराचे आहेत त्याचे खर्चस एकूण तीन हिस्से हजुरांत व सुबेदारी सुबे अजमेर व कमाविशी नारनोळ व सांबर वगैरे निम्मे व फौजदारी अकबराबाद व फौजदारी मथुरा वगैरे बमशर्त सुभेदारी व फौजदारी यांच्या रसदा आमचे नांवे ठराव होऊन दिल्हे. शपथपूर्वक करार करितो कीं, माफक मामुल , शर्ती व रसदा सुभेदारी व फौजदारी व पेशकशी बमोजब राजे व जमीदार व शिवाय लाजिमे वगैरे सुबेदारी व फैजदारी असे त्यांत काबीज होये आणि बंदोबस्त सुव्याचा व फौजदारीचा करून. प्रांत पातशाही कोणे जमीनदारानें व राजानें दाबोन घेतले असेल तरी सोडोन घेऊं. त्यापैकी मुलुक अर्धा हजुरांत व अर्धा आमचे फौजेचे खर्चास घेऊं. यानंतर जर कोणी मसलत पडली तरी फौज व अमीर व तोफखानाविशी विनंति केलियास हुजुरातून तैनात होय जरी अबदालीचे लढाई विशई एक आह्मांस आज्ञा जालियास हाजीर व खास स्वारी जालियास तयार होऊन नंतर खुद्द कामाची असेल ते चाकरी करून. दुसरे कोणास पातशाही मर्जी जाली तरी जे आह्मी विनंती करूं ते उमराव बरोबर द्यावें. उभेता आह्मी एक चित्त होऊन कामाचा बंदोबस्त करूं. चाकरीत उजूर कदापि करणार नाही. यांत शपथपूर्वक गंगाभंडारमध्ये दिल्हे असे. आतां सरकारी आमील व कारभारी आहेत त्यांशी कोणे बिशयी गुंता नाहीं. वेळेस त्यांची मदत करीत जाऊं. दुसरे जो कोणी जहागीदार चाकर हुजुरीचाकरींत हाजीर नसला तरी त्यांची जहागीर जप्त करोन, सरकारांत दाखल करोन, आपली चौथ त्याशी घेऊं. आमच्याकडून करारमदारांत अंतर पडणार नाही. यानंतर जरी आह्मांस कांहीं कार्यानिमित्य देशी जाणें झालें तरी फौज हजुरे ठेऊन जाऊं, व वायद्याप्रमाणें हाजीर होऊं. याशिवाय, आमचे धर्म क्रियेची किती वृत्ती आहेत ते जारी राहात, कोणेविशी तक्रार न होय. तीस लक्ष रुपये अबदाल्लीचे पारिपत्या ब॥ इनायत केलें. त्यास, आवंदा अथवा पेस्तर सालीं ज्या वेळेस अबदाली येईल, आज्ञेप्रमाणें पारपत्यास हाजीर. परंतु चौथ सुभे पंजाब व मुलतान व थटा व भकर प्रो। नजीक काबिल व मुरादाबाद व संबळ व हिसार व बादाऊं ठराव झाले त्यापैकी दोन हिस्से सरकारांत आणि एक हिसा फौज हजूरची त्यास ठरविले. बंदोबस्त प्रांताचा केली वर चौथ आपली घेऊं. रसदा ब॥ जमीदाराकडे व राजें रजवाड्याकडे शिवाय रसदा सुभेदारी जे मुत्सदी हजूरचे त्यांचे जीमे लिहून देतील ते आह्मी तहशील करून देऊं, व त्यापैकी आपली चौथ घेऊन, बाकी सरकारांत पावती करू. यानंतर सुब्यांत व कमाविशींत दारोगा आदालतीचा सरकारीचा राहे आणि किल्लेदारही सुदामतीप्रो। सरकारचे वहाल राहात. किल्याचे खर्चावर्चाचा जिमा हजूरचा आहे. शेवकास किल्लेदारी वगैरे सरंजाम व बागांत व प्रांत पातशाहीसी दखल न करूं. भोगवटा प्रा। बंदोबस्त पातशाही ठेवून, शहरच्या लोगांस राजी राखून, पारपत्य बागी वगैरेचा मनोदयानुरूप करून. व्यापारी यांस राजी ठेऊं व जहागीरदार जहागीर खाऊन चाकरींत हाजीर नसल्यास त्यांची जहागीर जप्त करून सरकारांत हवाल करूं. त्यापैकीं चौथ आपली घेऊ. ऐसीयास, श्रीईश्वर व मार्तंड व सांब साक्ष आहे. त्यास विद्यमानें अमीरान हजूर पावले. पंत प्रधान बाळाजी बाजीराव व उभयता सरदार होळकर व सिंदे यांचे वंशांत कोणी हजूराशीं व नबाब बहरादराशीं बेहुकुमी व बेमर्जी करील त्यास ईश्वर मध्यें साक्ष आहे. पोथी बेलभंडार तुळशी गंगा प्रत्यक्ष साक्ष नबाब बहादर व रुबरु वकील व मुत्सदी सरकारचे होते. त्यासमई (+++++++++) * आहेत, तेथें दखल न करितां उपराळा व मदत हरएक विषयीं करित जाणें. सरकारी चाकरीत जो जहागीदार असे तो चाकरीत हजीर नसल्यास आज्ञा होईल तेव्हां जागा बंद करोन तीन हिस्से सरकारांत व एक हिस्सा तुह्मी घेणें. व पेशकक्षा पातशाही राजे व जमीदार व शिवाय सुभेदरी व फौजदारी जे मुत्सदी हजूरचे त्याचे जिम्मे लावून देतील ते तहसील करून, त्यापैकी आपली चौथ वजा करून, बाकी सरकारांत प्रविष्ट करूं. व फौजदारींत दारोगा अदालत हजूरचा राहील, व किल्लेदार हजूरचे राहतील, तेथील खर्चावेचाचा बंदोबस्त हजूरांतून होईल. तुह्मी किल्ल्याशी व जागीर किल्लेदारान व दिवाण वगैरे कारभारी पातशाही व आणीक सरंजाम व बागबगीचे व पातशाही प्रांतांत दखल न करणें. व शहरचे रयतेस राजी व रजामंद राखून पारपत्य शत्रूचा करीत जावे. व व्यापारीस राजी व खुशीनें ठेवावे कीं आमदरफ्त राहे व तुमचे शेवाचाकरीचा मुजरा हजूरांत नक्ष होय ते करावें. कृपा दृष्ट समजावी. +