[ ५१० ]
श्री.
पौ। छ ४ रमजान.
श्रियासह चिरंजीव राजश्री दादा यासीः--
बापूजी माहादेव अनेक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता। छ २२ माहे शाबान मुक्काम इंद्रप्रस्त जाणून स्वकुशल लिहिणें. विशेष. तुह्मी पत्रें दोन-एक पाचवे तारखेचें आलें तें पंधरावीस पावलें, पंधरावीचें आलें तें एकविसावे तारखेस पावून-वर्तमान सविस्तर विदित जाहालें. लिहिलें की, वजिरासी शंढासी आपल्या विद्यमानें मित्रत्व असावें. वजिराचा खास दस्खताचा शुका पाठविला त्यावरून नवाब बहादूर यास सविस्तर सांगितलें. त्यांणी पातशाहास अर्ज केला. पातशाहांनी ह्मटलें :– रावदामोदरपंतास वजिराचे कामामुळें ना ह्मटलें. त्यावरून सरदार येऊन काम केलें. याचप्रकारें खालसा सोडावायाचा जिंमाहि राव दामोदरपंताचा आहे. व वजिरुनमुमालिकाची एकनिष्ठतेवरच चित्त असावें, हाहि जिंमा राव दामोदरपंताचा आहे. अकबराबाद ह्मटल्यास मजला हें कळलें नवतें जे, या सुभ्यावरी दृष्टी वजिरुन. मुमालिकास असेल, त्यासी बाविसा सुभ्यांचा यख्त्यार वनिरुनमुमालिकांचा आहे, तेथें हा सुभा बिसाद काय ? परंतु पहिल्यापासून मर्यादा + + + + + पातशाहा जाद्याचें नाव जाहा + + + + रिचा शब्द कोण्ही आरकानतो + + + + + नाहींत. व पातशाहांहीं काढी + + + + + हेहि वजिरुनमुमालिकाचे कामाकरितां रजपुतास बंदगींत आणून फौज संगीन तयार करविली. या रीतीनें सांगून, मसलहत करून, जवाब देऊं ह्मणाले, जें कांहीं उत्तर होईल तें लिहून पाठवूं. मग दुसरे पत्राचा मजकूर करूं. तुह्मांस कळावेंनिमित्य लिहिलें असे. मागाहून नवाब बहादुराचें पत्र तुमचें नावें पाठवूं तेवढें मुफसल लिहूं. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.