Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४७५ ]
श्रीवरद.
एक अर्जी पातशाहास, व एक पत्र मजिदुद्दौलास पा। कीं, याचें समाधान होय. याप्रों। तुह्मीं पत्र लिहून जलदीनें पो।; व पत्रें आणवणें. व आह्मी, न भेटल्याची नालिश पाटिलबावास लिहील. यास्तव जलदीनें पत्रें पों। कीं, त्याचें समाधान राहे. येथें बापूजी होळकरासी त्यासी वितुष्ट होवून बापूजी होळकर जैपुराहून दाहा कोसांवर आहे. पातशाहाकडे चाकरी करावयाचा जाबसाल आपले विद्यमानें आहे. परंतु बापूजी होळकरापाशीं माणूस नाहींत. जातीनसी नादान; यास्तव उपाय चालत नाहीं. पोटास देत असतां गोसावी, अनुपगीर व आंबाजी नजबखानाचे धाकें पातशाहाचे लष्करांत येत नाही. ते खातरजमा आमची पूर्वी जाली आहे. परंतु ते भयभीत फार ; व समय जैनगरीहून रुपये घ्यावयाचा, व नजबखानाकडून तलबेची बाकी घ्यावयाचा समय ! व, पातशाहाकडून तलबेचा रुपया देऊं ह्मणतात. तो घ्यावयाचा समय आहे. ईश्वर घेऊं नदे, यास उपाय काय ? उपदेश करीत आहों. पुढें आमलांत येईल तें लिहूं. श्रीमंतांची फौज जवळ नाही. ग्वालेरचा किल्ला किल्लेदार सोडून जाणार. नजबखानाकडे व पातशाहाकडे पैगाम लागला आहे कीं, किल्ला घेणें, गोहदकरास न द्यावा. वरकड जो येऊन रसीद देईल त्याचे स्वाधीन करावा, हें मानस ग्वालेरचे किल्लेदाराचें आहे. ह्मणून एक कारकून आंबाजींनीं नजबखानास भेटविला आहे. पुढें अमलांत येईल तें लिहूं. तुमचें पत्र बहूत दिवस न आलें. श्री कृपा करो; भेट होय तो सुदीन ! श्रीकृपा करणार समर्थ आहे ! अलीकडे सीख मथुरेपावेतों पावले. कोठेडीकर प्रतापसिंग डीग-अगरेकडे धूम करितो. नजबखान येथें पातशाहापाशीं आहे. पुढें अजमेरीस जाणें पातशाहाचें आह्मी मना केलें. माघारे दिल्लीस जातील, तें ( पातशाहास अर्जी श्रीमंताची पोटगीफलाखी याची मान्य केली. समाधान जालें. ) मागाहून लिहूं. चिरंजीव बालासाहेबास आशीर्वाद. श्रीकृपेनें भेट घडे ते सुघडी ! श्रीकृपा करो ! चिरंजीव सौ। राजाबाईस आशीर्वाद. श्रीकृपा करो ! समस्त मंडळीस नमस्कार. लोभ कीजे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४७४ ]
श्रीशंकर.
राजश्री देवरावजी गोसावी यासीः---
छ अखंडितलक्ष्मीलंकृत राजमान्य श्नो। देवीसिंग टोके, विश्वासराव, दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. आपले भेटीचा हेत बहुत आहे. भेट होईल तो दिवस सुदिन असे ! येथून राजश्री त्रिंबकपंत कामकाजाकरितां दरबारी पाठविले आहेत. आपणही प्रसंगी आहा. हरएकविसी साह्यता असावी. सर्व प्रकारें भरवसा आपला आहे. विस्तारें करून ल्याहावेसें नाहीं. बहुत काय लिहिणें ? कृपालोभाची वृद्धी केली पाहिजे. हे विनंति.
श्री सीवचरणीं
दृढ भाव, देवराव-
सुत देवीसिंग टोके
विनीत भाव.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४७३ ]
श्री.
त आपण जे समयीं कोळेस दाखल होतील ते वेळेस पठाणाची व रोहिल्याची मुलाजमत करवीन; अकबराबादेस दाखल जालियावर सफदरजंग येऊन मुलाजमल करील; या गोष्टीचा इतबार हजरतला येत नसला तर शुकें खास सर्वांचे मजला इनावात करावे; त्यांणीं उत्तरे खातरख्वाह लिहिली तर हजरतनीं कूच करावें. हे बोलणें जालियावर सर्व लहानमोठ्यांस रुखसत हजरतनीं करून, आमात्यास व नागरमल्ल या उभयतांस ठेवून घेऊन राजाजीस शुका लिहिला जे, कांहीं तुह्मांसी बोलणें आहे, तुह्मीं अविलंबे येऊन पोहंचणें. शुका पोहंचतांच, राजाजी स्वार होऊन, हजरतजिलमुभानियाजवळ गेले; मुजरा केला. हजरतनी हुकम केला जे, किबलेअलम याजपाशीं ज़ाणें, त्या हुकमावरून किबलेअलमजवळ गेलें. तेथें नागरमल्ल व अमात्य व बख्तावरखां होते. त्रिवर्गानीं राजाजीस पृच्छा केली की, हजरतचा बाहेर निघावयाचा कस्त आहे; तुमचे सरदारांची काय मर्जी ? व कोणता मनसबा जाटांचा सलूक जालियावर करणार ? तुह्मीं काय सलाह देतां ? तेव्हां राजाजींनीं उत्तर दिल्हें जे, सरदार तुह्मांसी बदसलुख करणार नाहींत ; खालसा सोडून देतील; कदापि अमर्यादा करणार नाहींत ; बल्की, या गोष्टीचीं पत्रें त्रिवर्गा सरदारांची आणून देतों. त्यांणीं "अति उत्तम" ह्मणून, किब्लेअलम व हजरतजवळून राजाजीस रुखसत करविलें. पाचा साता दिवसाउपरांतिक नागरमल्लांनीं रोहिल्या पठाणांच्या अर्जिया गुजराणिल्या. तदोत्तर, सफदरजंगाचें पत्र खानखानास व अर्जी पातशाहास आली जे, हजरतनीं अकबराबादेस यावें; मी येऊन मुलाजमत करितों. ऐसीं पत्रें सर्वांची येऊन पावलियावर, राजाजींनी त्रिवर्ग सरदारांच्या अर्जदास्ती गुजराणिल्या. हजरतची सर्वा गोष्टींनीं खातरजमा जाली. तेव्हां कूच करून, सिकंदरियापावेतों जाऊन पावले. पठाण रोहिल्यांच्या अर्जिया पैदरपै येत्यात. सफदरजंगहि आपली तयारी करून यावयासी सिद्ध जाला. बल्की, एक दोन कूचहि जाले असावे. सांप्रत या दिवसांत, अकबतमहमूदचें पत्र सैफुल्लाचे विद्यमानें सुत्फलाबेगास व नानासाहेबांस आलें जे, तुह्मी राजाजीस माझेपुर्ते पक्षावर आणून त्यांच्या मार्फतीनें हजरतकडून माझी तकशीर माफ करवावी. तें पत्र बजिन्नस लुथफल्लाबेगानें राजाजीजवळ पाठविलें, व नानांनीही आपलें दाखविलें. तेव्हां नानासी रायजाजींनीं पृच्छा केली की, अकहतमहमूदची तकसीर माफ करवितों; त्यांणीं खालशांतून व सरुफखासांतून हात उचलावा; व सिनदागचा दावा सोडावा; थोडीबहुत सिनदागचे तलवेची वाट करून देविन, या गोष्टींची पोख्तगी खानमजकुराकडोन तुह्मास आलिया त्याचे कामांत हात घालीन. त्यांजवरून नानासाहेबीं खानमजकुरास पत्र लिहून सर्व गोष्टींची मजबुती आणविली. तेव्हां, पातशाहास व आमात्यास अर्ज करून राजाजींनी त्याची तकसीर माफ करावी असें ठरवून पाचारिलें आहे. आजि उद्यां मुलाजमत खानमजकुराची होणार. जाटांचा सलुख सरदारांनी केला, हें वर्तमान येथें पावलियानंतर, पादशाहांनी पाचसात मुकाम शिकंदरियांत फर्माविले. पुढें जें निदर्शनास येईल तें मागाहून लिहून पाठवूं. हे विज्ञप्ति. *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४७२ ]
श्री
चिरंजीव राजश्री तात्या यास प्रति पुरुषोत्तम माहादेव आशीर्वाद उपरि. श्रीमंत स्वामीस पुरवणी पत्र लिहिलें आहे. त्यांत मजकूर की, अनवरुल्लाखान याजबराबर शाहअबदालीस हस्ती वगैरे सरंजाम पाठविला होता, तो कोठ्यापासून माघारे फिरून गेला. त्यास चिरंजीव देवराव माहादेव याजबा। हस्ती वगैरे सरंजाम पाठविल्यास सर्व गोष्टी उत्तमच होतील, ह्मणोन श्रीमंत स्वामीस लिहिलें आहे. तर, बनाव बनला तर, तुह्मी हें काम करून लौकरच आह्मापाशीं येणें. तुह्मीं शुज्यातदौलाकडील काम करूं ह्मणोन लिहिलें. त्यास, त्यापरीस हें काम उत्तम आहे. कळलें पाहिजे. कृपा करणार श्रीसमर्थ आहे. चिंता न करणें. सत्वर भेट होय ते सुदीन. हे अनेक आशीर्वाद. समस्तांस नमस्कार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४७१ ]
श्रीगणराजवरद.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बाबूराव दीक्षित पटवर्धन स्वामीचे सेवेसी :--
पो। बापूजी महादेव हिंगणे कृतानेक सा। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशळ लेहावें. विशेष :– पो। मेरठ वगैरे माहाल, प्रांत अंतर्वेद, हे राजश्री अंताजी माणकेश्वरं याजकडील दूर करून, आह्माकडे सरकारांतून कमावीस सांगावी; याप्रमाणें करार करून त्याची रसदेंबद्दल रुपये सात लक्ष सरकारीत द्यावे, ऐसा करार जाला. त्यावरून तुमचे हमी पत्राच्या + + + + + + + + + + + + + + + + + + + + + मार्गेस्वर वद्य ३. बहुत काय लिहिणें ? हस्तअक्षर देवराव महादेव हिंगणे मु॥ पूणें. *
गोही
१ भिकाजी आपाजी पेंडसे मु॥ पुणें
१ भटमभट भाटे मु॥ पुणें
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३००
श्रीरामप्रसन १६४६ फाल्गुन शुध्द ३
नकल
राजश्री मताजीराव जेधे देसमुख ता। रोहिडखोरे गोसावी यासि
.॥ अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य श्रीा त्र्यंबकजी काकडे हवलदार किले मनमोहनगड रामराम सु॥ खमस असरीन अलफ मौजे कोरले व वडतोंबीचे रान हिरडसमावळचे सीवेचे अमानत आहे ते रान किलेमजकुरास सेते करावयासी राजश्री स्वामीनी दिल्हे आहे येविसी तुह्मास हि पत्रे पाठविली आहेती कलले पाहिजे बहुत काय लिहिणे कृपा असो दीजे छ १ जमादिलाखर हे विनंती
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४७० ]
श्री.
राजश्रियाविराजित राजमान्य रजश्री त्र्यंबकपंतबाबा स्वामीचे सेवेसीः--
सेवक नरहर शामराज कृतानेक सां। नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम ता। रा।खर जाणोन स्वकीय स्वानंद लिहीत गेलें पाहिजे. विशेष. इकडून दोन पत्रें सेवेसी पाठविली; परंतु प्रविष्ट होऊन हस्ताक्षरपत्रीं तोषविलें नाहीं, तेणेंकरून चित्त उदास आहे; तर हरघडी सांभाळ करीत असावें. पारचे गाऊ १८ प्रा। कनोज येथील कानगोह याचे दफतरी शुदामद आहे. त्यासी, तेथले जमीदार येऊन भेटले; आणि आपलें ठाणें घेऊन लस्कर फुरीं गेले. गढी तेथील पडली होती, ते नीट केली. त्यास, तिकडील कछोदीयाचा फौजदार रोज उठून खटखट करितो. त्याजकरितां जबरदस्तीनें गढी राखनें लागलें. सिबंदी प्यादे तीनसे च्यारसे ठेवनें लागले. व रा। धोंडो दत्तात्रय यांचे स्वारही पनास घेऊन आलों. दररोज पंचवीस रु॥ खर्च देणें लागले. तेथल्या फौजदारानें पाचसातसे माणूस व सेदीडसे स्वार जमा केले. आपण त्यासी झुजावें, तर आपली आज्ञा नाहीं, आणि सलुकें तर अमल देत नाही. याजकरितां, आपल्यास विनंति लि॥ जाते कीं, तेथील फौजदार वजिरास सांगून तगीर करवा; अग्रर बनलेंतर, तेथील इजारा करावा. जमा थोडकी आहे; याजमध्ये केल्या कस्टाचें सार्थक होतें, खर्च जाला तोही उगवतो, आणि नक्षा रहातो. आपण या कार्यास हइगई करील तर रु॥ खर्च जाले ते बुडतात ; दुसरी बदनक्षी होती. याजकरितां रो॥ मथुरादासपंत सेवेसी पा। आहे. जबानी सर्व वृत्त निवेदन करितां श्रुत होईल. पूल वजीर प्रा। मारीं मौजे दाईपुरी बांधितात. त्यास, रबीचे गाऊ कुल खराब होऊन पैसा हातास येणार नाहीं; आणि रयत दहशत लस्करामुळें खाऊन सडे राहिले आहेत. त्यासी, आपण रयतीचा दिलासा करून थांबाथांब केली आहे; परंतु विस्वास येत नाही. तर येथून पुल दूर होऊन आणिखा जागा बांधीत तर उत्तम आहे. येणेंकरून रबीचा पैसा वसूल होऊन येईल. ये गोष्टीचा सर्वस्व अभिमान धरून निर्वाह केला पाहिजें. आपल्या भरंवसियावर पारचें काम केलें आहे. लौकिकांत आपला नक्षा राहे तो पदार्थ करावा. बहुत. काय लिहिणें ? कृपा असो दीजे. हे. विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४६९ ]
श्री.
राजश्रियाविराजित राजश्री यादो रंगनाथ गोसावी यासी.
स्नो। बापूजी माहादेव व दामोदर माहादेव. नमस्कार. उपरि. येथील कुशल जाणून स्वकीय कुशललेखन करीत जाणें. यानंतरः वो। राजश्री बाळंभट जावाई याजसमागमें भोजराज जमादार आ। १०, व उंटाचे सारवान, व घोडियाचे माणूस, ऐ॥ बारा माणसांचा मुशारा दुमाही येथें रबिलावलपरयंत चुकवून दिल्हा आहे. घोडा व उंट तेथें तुह्मीं ठेऊन घेतलियावर सारवान घोडियास माणसास दरमहा १० दाहा रुपये देत जाणें. आणि जमादार दाहा माणसानसी इकडे येईल, यास दुमाही याजला खर्चास तेथें देणें. दरमाहायाचा येणेंप्रोः जमादार रुपये ६॥- आ। १० पंचावन अर्ध; आणि दर रुपयीं कसूर काढोन खर्चास देऊन इकडे रवाना करणें. उंट, घोडे, आपले पागेस ठेवणें. जाणिजे. छ ५ सफर. बहुत काय लिहिणे ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४६८ ]
श्री.
पौ। छ १८ मोहरम
श्रियासह चिरंजीव राजश्री दादा यासी बापूजी माहादेव अनेक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता। छ १ जिल्हेज मु॥ इंद्रप्रस्थ जाणून स्वकुशल लिहिणें. विशेष. भवानीदास साहुकार बहुत मातबर भला माणूस श्री यात्रेउद्देशें जाणार. समागमें गरीबगुरबेहि चालतील. त्यास, मार्गाचें दस्तक वजीरमुमालिकाचे समागमें असलियां उपद्रव होणार नाहीं. धर्मकार्य आहे. करणें. जरूर केलेंच पाहिजे. त्यास, नवाबास अर्ज करून, यादिदास्त पाठविली आहे त्याप्रमाणें दस्तक हस्तगत होऊन ये, तो योग करावा. x t जे समयीं आपल्यास पत्र पावेल तेच समयीं दस्तक करून घ्यावे. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[४६७ ]
श्री. पौ छ १७ रबिलावर.
श्रियासह चिरंजीव राजश्री राजेराव दामोदर माहादेव यासी प्रति महाराजे बापूजी माहादेव कृतानेक आशीर्वाद. उपरि येथील कुशल ता। छ १० माहे रबिलाखर मुकाम इंद्रप्रथ जाणून स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान विदित जालें. तुह्मीं लिहिलें कीं, प्राश्याचा बंदोबस्त करून येऊं. त्यास जिनस पाठविला आहे हा पावेल
१॥- तांदूळ खासे
८॥- तुरीची डाळ
।- दाळ मुगाची धोई
येणेप्रमाणें पाठविलें आहे, पावेल. * या दिवसां तुमचें पत्र येऊन वर्तमान कळत नाही. तरी, ऐसें न करावें. आणि लौकर तजवीस करून, हवालदार ठेऊन, उभयतां चिरंजिवांस मातुश्रीचे दर्शनास घेऊन यावें. त्यानंतर यांजला कुरुक्षेत्र यात्रा करवावी. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.