[ ५०९ ]
न यावें तर त्यास अबदालीची ताकीद कीं, सत्वर स्वामीचे सेवेसी जाणें. यास्तव त्यास येथेंच लावून ठेवून त्याचा एक भला माणूस घेऊन रा॥ मल्हारजी होळकर सुबेदार याजकडे जाऊन. सो। स्वामिदर्शणास पांच वर्शें नाली; एकदां दर्शन घ्यावें. येथें ती॥ राजश्री बापूजी माहादेवासी आज्ञा येती तेव्हां याकुबअलीखानासी घेऊन सेवेसी येते. येथून येक मजल मथुरेकडे निघालों इत्कियांत रा। मल्हारजीबावाची खबर आली कीं, फिरोन स्वामीचे सेवेस गेले. मार्ग दुस्तर जाला. यास्तव, लाइलाज राहिलों. तों शाहाची पत्रें वरचेवर आली की, सत्वर येणें. तिकडेहि न जावें तर इकडील हिंदुस्थानी पातशाहासुद्धां बेइमान जाले. त्याजकडे गेल्यानें त्यासी व स्वामीसी एकोपियाची शोहरत होईल; व बेइमान बेइमानी करणार नाहींत; व स्वामींनी या पातशाहास पातशाहा केलें असतां बदानियेत जाली; येविशईंही तिकडून बनलें तर, ते आपले करावे; व तेहि बोलावितात. काय मानस ? व किती फौज ? व काय विचार ? तो मनास आणून सेवेसी यावयासी रवाना जालों ते शामलीस पावलें. पुढेंहि श्रीस्वामीचे प्रतापें जातों. कृपा करून शाहास ; व अश्रफुल्उजरा शाहावलीखान यांसी पत्रें शिष्टाचाराची पाठविणार स्वामी समर्थ आहेत ! सुरक्षित हजुर येऊन स्वामी साहेबांचे दर्शन श्रीकृपेनें घेऊं तो सुदीन ! खर्चावेंचाविशई विनंति लिहिली ते मान्य करणार स्वामी समर्थ आहेत. कृपा केली पाहिजे. हे विज्ञप्ति. + +