[ ५१२ ]
श्री. पौ। छ ११ रा॥वल.
राजश्री दामोदर महादेव गोसावीः--
उपरि. तुह्मी आह्मांबराबर येणें ह्मणून तुह्मांस दोनचार पत्रें लिहिलीं; परंतु तुह्मी अद्यापि आला नाहीं. खानखानाचा कारभार विल्हेस लागणें. त्यास, बापूजी महादेव तेथें आहेतच. कारभार यासी विल्हेस लावतील. त्रिंबकपंतासही याच कारभाराकरितां ठेवावयाचें अगत्य असल्याप्त ठेवावें. परंतु जरूर जरूर आह्मांबराबरी तुह्मी यावें; व रा॥ कुकाजी शिवराम, व त्रिंबक खंडेराव यांजबराबरी ऐवज पाठविणें. ह्मणून आज्ञा केली होती. त्यास, याजबराबरी ऐवज रवाना केला असिला तरी उत्तम. ऐवज रवाना जाला नसल्यास एक लक्ष रुपये अगत्य अगत्य जरूर जरूर तुह्मीच घेऊन येणें. तुह्मी यावें व ऐवजहि जरूर पाहिजे याकरितां उदैक गाजदीनगरावरी मुक्काम करावा लागला. त्यास, दिरंग न लावितां बहुत सत्वर येणें. जाणिजे. छ १० रबिलावल. तीन मुकाम पडले. दोन तुमचे जाहाली. ती मुकामादाखलच जाहाली. यास्तव लौकर येणें. उशीर न करणें. मुलकासी ताकीद आहे. यास्तव लौकर स्थान करून पुढील भलता एखादा विचार केला पाहिजे. फार दिवस लश्करास ताकीद केल्यानें खराबा होईल. आजपावेतों दिल्लीवर खराबा जाहाले ते भलत्या एखाद्या मनसुब्यावर घालून तोंड मोकळें केलें पाहिजे. यास्तव लौकर येणें. जर तुह्मी रुपये लौकर येत नाहीं, तरी मग ताकीद कशास करावा ? ये प्रांतीस पोटास ऐवज मेळवावा लागेल. मग सला राहणें कळतच आहे. तुह्मी इतकें करून फलकार्य सिद्ध जाहालें तरी लौकर आला.