[ ५०५ ]
वार्ता सर्वामुखीं जाली आहे. त्यास, हे वार्ता यथार्थ जाली तर, बहुत अनुचित गोष्ट जाली. तेव्हां चहूंकडून पळाळे, पळाले, ह्मणून एकत्र शहोरत जालिया, पठाणाच्या दहशतीनें ठाणीं आसपासचीं राहणें कठीण होतील. आणि वजिर अजम सर्व प्रकारें बुडाला हें जाणावें. त्यास, तुह्मी उभयतां सरदारांस सांगावें जे, ज्याचा पक्ष करावा तो शेवट करून दाखवावा. तुह्मी मात्र अकबराबादपर्यंत येऊन, सलुखाचाच पैगाम पठाणास करून, उभयतांचें सौख्य करून यश संपादावें. येथून पाहिजे तैसी सार्वभौमाची पोख्तगी करून घेतों.
तो विचार सुभेदारास येऊन लागला त्याचा निकाल तुह्मी करून घेणें. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.
चिरंजीव नानास आशीर्वाद उपरि. लि॥ परिसीजे. हे आशीर्वाद.
राजश्री त्रिंबकपंत व गोविंदराव यांस नमस्कार. सो। गिरमाजी मुकुंद कृतानेक सा। नमस्कार विनंति उपरि. लिहिलें परिसोन कृपा कीजे हे विनंति.