Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३१४
श्रीगणेशायन्माः
राजश्री खंडेराव बापूजी सुभेदार सरदेसमुखी सुभा सातारा गोसावी यांसि
अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य श्रीा केदारजी मसरकर अजहत सरदेसमुख रामराम सु॥ सीत अर्बैन मया अलफ बदल देणे राजश्री बाबूराव दिवाण यास रुपये २५ पंचवीसाचा गला बार सेरी बारुले मापे दिवाण निर्खप्रमाणे देविला असे आदा करून पावलियाचे कबज घेणे छ २२ माहे सफर बहुत काय लिहिणें हे विनंती
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३१३
श्री १६३४ ज्येष्ट वद्य ३
राजश्री जयसिंग जाधवराऊ सेनापति गोसावी यांसि
सकलगुणालंकरणअखंडितलक्षमिअलंकृत राजमान्य श्रीा हिंदुराऊ घोरपडे ममलकतमदार जोहार विनंती उपरी राजश्री पिराजी घाटगे देसाई पा। मांगल याचे ऐवजी रुपये
सरदेसमुखीकडे घेणे रद कर्ज रा। तिमाजी नाईक
८००० ८०००
७००० एकंदर देणे
१००० तकसीम पैकी देविले आहेत त्यास सरदेसमुखी आठ हजार श्री स्वामीकडे पावते करविले पाहिजेत व कर्जाचे कर्जदारास दिजे सन सलास असर मया छ १७ जमादिलावल विशेष काय लिहिणे हे वीनंती
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ६२२ ]
श्री. शक १६८० मार्गशीर्ष शु॥ ५
० श्री ॅ
राजा शाहू नर-
पति हर्षनिधान
बाळाजी बाजीराव
प्रधान.
मा। अनाम चौधरी व कानगो प्रांत हिंदुस्थान यांसि बाळाजी बाजीराव प्रधान सु॥ तीसा खमसैन मया व अलफ. त्या प्रांतीं गायी व गोणी चारणलमाण घालितात, ह्मणोन गणेसीदास उदासी याणें हुज़र विदित केलें त्याजवरून हें आज्ञापत्र सादर केलें असे. तरी तुह्मी चारणास ताकीद करून गायीवर गोणी घालूंन देणें. जाणिजे. छ ३ रबिलाखर. आज्ञाप्रमाण
लेखन
सीमा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ६२१ ]
श्री
वैशाख शु॥ २ शके १६५८
० श्री ॅ
राजा शाहू नरपति
हर्षनिधान बाजीराव
बलाळ मुख्य प्रधा
न
मा। अनाम तेजकरण मंडलोई प्रा। इंदूर यांसि बाजीराव बलाळ प्रधान. सु॥ सीत सलासीन मया अलफ. रा। भयाजी नाईक यांजपाशीं सरकारचा ऐवज बर्हानपुरास पावावयाचा पाठविला आहे. तरी तुह्मी बदरका देऊन बर्हानपुरास पोहचावणें. जे वेळेस जो ऐवज रवाना करितील ते वेळेस बदरका देऊन पोहचावीत जाणें. ये बाबे गई न करणें. जाणिजे. छ १ जिल्हेज.
लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ६२० ]
श्री. कार्तिक शु॥ १ शके १६५४
० श्री ॅ
राजा शाहु नर-
पति हर्षनिधान
बाजीराव बलाळ मुख्य
प्रधान
मा। अनाम तेजकर्ण मंडलोई पा। इंदोर यासि बाजीराउ बलाळ प्रधान सु॥ सलास सलामीन मया अलफ. तुह्मी विनंतीपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें व जेठमल येथें आला. यांणी कितेक निवेदन केलें, त्याजवरून कळलें. ऐशास, तुह्मी एकनिष्ठ मातबर जमीदार, तुमचा गौर करावा हें जरूर. राजश्री मल्हारजी होळकर येथें आले होते. यांस तुमचेविशी कित्येक आज्ञा करणे ते केली आहे. ते तुमचा गौर करून रयत जागियावर खुशाल राहे तेच करितील. तुह्मी आपला खातरजमा असों देणें. पेशजीचे कमाविसदारानें परगणे मजकूरचे रयतीस तसदिया दिल्ह्या ह्मणोन कळलें. त्यास तो दूर करावा ह्मणोन मारनिल्हेस आज्ञा केली. त्यांणींहि तो कमावीसदार दूर केला आहे. याउपरि तुह्मी परगणे मजकूरचे रयतीचा दिलासा करून, रयत गेली असेल ते आणून, परगणियाची आबादानी करणें. हरएकविसी तुमचा गौर केला जाईल. जाणिजे. छ ३० रबिलाखर. आज्ञाप्रमाण.
लेखन
सीमा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ६१९ ]
श्री. शके १६५४ ज्येष्ठ वद्य ३
० श्री ॅ
राजा शाहू
नरपति हर्ष-
निधान । बाजि-
राव बलाल
प्रधान
राजश्री तेजकर्ण मंडलोई पा। इंदूर गोसावी यांसि अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। मल्हारजी होळकर व राणोजी सिंदे दंडवत. सु॥ सलास सलासीन मया अलफ. उपरि. हाली छ १७ जिल्हेजी मुळसकर नजीक बनेडें जाल आहे. एसियास, परगणे बागोदचे खंडणीचा पैसा हाकाळपर्यंत बेदाम न जाला, हे गोष्ट उत्तम न केली. हाली लिहिलें जातें कीं, देखतपत्र झाडियानसीं पैका वसूल रा। माधोराउ जीवाजी कमावीसदार यांस देणें. एक घडीचा उजूर न करणें. ढील जालिया मुलकाची खराबी होईल, ते गोष्ट न कीजे. जाणिजे. छ १७ जिल्हेज.
मोर्तब
सुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ६१८ ]
श्रीशंकर.
वैशाख वद्य १२ शके १६५४
० श्री ॅ
मंगलमूर्तिचरणीं
तत्पर नारो शंकर
निरंतर
संवत् १७८६
राजश्री राव तेजकर्ण कुवर न्याहळकर्णजी मंडलोई पा। इंदूर गोसावी यासी--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। नारो शंकर व मलार गोपाळ दि॥ राजश्री होळकर व रा। राणोजी शिंदे. सु॥ इसन्ने सलासैन वालफ. परगणे बेटमियाचे जमीदाराकडून राजश्री बालाजी विष्णु मजमदार पा। मजकुर यास रुपये ५० पन्नास देविजे. गै न कीजे. रा। छ २५ जिल्काद. जाणिजे. मोर्तबसुद
० ॅ
मोर्तबसुद
संवत् १७८६
ऐवज खंडनी पा। मजकूर पैकीं मुजरा असे. जाणिजे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ६१७ ]
श्रीशंकर. शक १६५४ चैत्र शु॥ १
० श्री ॅ
मंगलमूर्तिचरणीं
तत्पर नारो शंकर
निरंतर.
राजश्री राऊ तेजकर्ण मंडलोई कुवर न्याहलकर्ण पा। इंदूर गोसावी यासी--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। नारो शंकर दि॥ मलारराउ होळकर व मलार गोपाळ दि॥ राजश्री राणोजी सिंदे नमस्कार. सु॥ इसन्ने सलासिन मया अलफ. ऐवज पा। मजकूर बा। खंडनी सन ११३९ पैकी रुपये ५००० मोबलग पांच हजार गु॥ गोविंद रामाजी पोहचले. हिसेबीं मंजूर असेत. जाणिजे. रा। छ २९ रमजान.
मोर्तबसुद
स०० १७८६
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ६१६ ]
श्री माघ शुद्ध ४ शके १६५३
० श्रीह्माळसाकांत ॅ
चरणी तत्पर । खंडोजी-
सुत मल्हारजी होळ-
कर
राजश्री तेजकर्ण मंडलोई गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। मलारजी होळकर दि॥ राजश्री पंतप्रधान. सु॥ इसन्ने सलासीन मया अलफ. राजश्री कुसाजी गणेश व भोळूभट व गिरमाजीपंत याणें वर्तमान विदित केलें. त्यावरून नवाब उमरखान यांसि फारसी कागद रजपुताविसीं लिहिला आहे. व दामाजीपंत कमावीसदार प्रगणे धार यांसीहि लिहिलें आहे. कागद पोहचावून देणें. रजपूत काहडून देतील, याउपरि उपद्रव देणार नाहीं, ऐसेंच लिहिलें आहे. व धोंडोपंत व भेवजी अवधूत, कमावीसदास प्रा। काटकुत, यांसि कागद लिहिला आहे की, मवाफणीतपियाचा गांवची वस्तभाव घेतली ती फिरोन देणें. हजूर, बोभाट यावयासी प्रयोजन नाहीं, ऐसें त्यासही लिहिलें आहे. तुह्मी हरएकविसी आपली खातिरजमा राखणें, जाणिजे. छ ४ साबान.
मोर्तब
सुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३१२
श्री
राजश्री जयसिंग जाधवराऊ सेनापति गोसावी यांसि
सकलगुणालंकर्ण अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य श्रीा हिंदुराऊ घोरपडे ममलतमदार जोहार विनती येथील कुशल जाणून स्वकीये कुशललेखन करीत गेले पाहिजे यानंतर कसबे कागलचे तटापैकी खा। दारूगोळी गु॥ कोनेरी कोमटी यास रु॥ ५०० पाच से रास देविले असेती अगत्य जाणून प्रविष्ट केले पाहिजे विशेष काय लिहिणे छ जमादिलावल