लेखांक ३१२
श्री
राजश्री जयसिंग जाधवराऊ सेनापति गोसावी यांसि
सकलगुणालंकर्ण अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य श्रीा हिंदुराऊ घोरपडे ममलतमदार जोहार विनती येथील कुशल जाणून स्वकीये कुशललेखन करीत गेले पाहिजे यानंतर कसबे कागलचे तटापैकी खा। दारूगोळी गु॥ कोनेरी कोमटी यास रु॥ ५०० पाच से रास देविले असेती अगत्य जाणून प्रविष्ट केले पाहिजे विशेष काय लिहिणे छ जमादिलावल