Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[ ५९६ ]

श्रीरामजी वैशाख शु॥ २ शक १६४९

कृष्णासिंग जयसिंगका
पुत्रका
सिक्का

श्री दिवान वचनात प्रगणा इंदोरकी पेसकस संवत १७८२ का सालकी काचेतकी कीसतीका रुपया ५००० पाच हजार मार्फती भयाजी नायककी आपामी. बेसाष शुदि २ स• १७८३.

[ ५९५ ]

श्रीशंकर शक १६४६ फाल्गुन वद्य १४

श्रीराजा शाहु
चरणि तत्पर
संताजी भोसले
नीरंतर

छ मा। अनाम नंदलाल मंडलोई व कानगी पा। इंदूर प्रांत माळवे यासि

सवाई संताजी भोसले सु॥ खमस अशरीन मया व अलफ. राजेश्री गोपाळपंत व आपाजीपंत. माहाराणाकडे उदेपुरास कांहीं नाजुक कार्यभागप्रसंगामुळें रवाना केले आहेती. त्यास, हे तुह्माजवळ येतील. ऐशास, आमच्या नजरेबाबत घोडा एक व वस्त्रें तुह्मांकडील याचे स्वाधीन करून यास पलीकडे मार्गस्त करणें. या कार्यास विलंब न लावणें. विलंबाखाले घातलें आणि कार्यास अंतर पडिलें मणजे जवाब तुह्मास करणें लागेल. हें पष्ट समजोन लिहिल्याप्रमाणें वर्तणूक करणें. छ २७ जमादिलाखर.

मोर्तब
सुद

[ ५९४ ]

श्रीशंकर. शक १६४६ फाल्गुन वद्य १२
श्रीराजा शाहुचरणी
तत्पर संताजी
भोसले नीरंतर

छ मा। अनाम नंदलाल मंडलोई प्रा। इंदूर प्रांत माळवे यांसि सवाई संताजी भोसले. सु॥ सन खमस अशरीन मया व अलफ. फौजेच्या उस्तवारीबद्दल त्या प्रांते थोडीयाच रोजांत येत असो. त्यास, सांप्रत राजश्री आपाजीपंत व राजश्री गोपाळपंत याजपासी कागदपत्र देऊन महाराणाकडे उदेपुरास रवाना केले आहेती. हे तुह्मापासी येतील. यासि खर्चास रुपये ५०० पांचसे परगणे मजकुरपैकी नाजुक काम समजोन आधि आधि याचे पदरीं रुपये घालून, समागमे माणसें आपलीं देऊन, पलिकडे पोहचावणे. या कार्यास एका घडीचा विलंब न लावणें. साल गुदस्ता रुपये १५००० पंधरा हजार पडले होते, त्यापैकीं राजश्री विसाजी हरी याजबा। घोडी व कापड पांच हजार रुपयांचे पाठविलें. बाकी रुपये १०००० दहा हजार राहिले. हे मा।रउननिल्हेस पाठवून देणें. रुपयेही आखर देणे लागेल. परंतु पाठविलेयामध्या उत्तम आहे. कळलें पाहिजे. छ २५ जमादिलाखर

मोर्तबसुद

[ ५९३ ]

श्री शक १६४६ माघ शु॥ १

० श्री ॅ
राजा शाहु नरपति
हर्षनिधान । बाजि
राव बलाल प्रधान.

छ मा। अनाम नंदलाल मंडलोई पा। इंदूर यासि बाजीराउ बल्लाळ प्रधान. सु॥ खमस अशरैन मया व अलफ. तुह्मी विनंतिपत्र बराबर शंकराजी रघुनाथ पाठविले ते प्रविष्ट होऊन वर्तमान निवेदन जाहलें, व तुह्माकडील कितेक वर्तमान शंकराजी रघुनाथ यांनी निवेदन केलें त्यावरून कळों आलें. तुह्मी आपणाकडील मातबर माणूस पाठवून परगणे मजकूरची खंडणी चुकवायाची होती, ते गोष्ट तुह्मी न केली. हे गोष्ट तुह्मी बराबर केली आहा, ऐसे नाही. हाली आह्मी अलीमोहनच्या रोखें जातों. तिकडील काजकाम जालियावर ते प्रांते येऊन. राजश्री केशो महादेऊ वगैरे सरदार ते प्रांते आले तर त्यांस परगणे-मजकूरचा ऐवज न देणे. त्यांजला तुह्मी ऐवज दिल्हिया तुह्मास खंडणीत मजुरा पडणार नाहीं. कितेक जबानी शंकराजी रघुनाथ यांस सांगितले आहे. ते तुह्मास सांगतील त्याप्रमाणें वर्तणूक करणें. जे गोष्टीनें बरें होऊन तुमचा गौर होई ते गोष्ट करून घेणे. जाणिजे. छ रबिलावर. पा। हुजूर.

लेखन
सीमा

[ ५९२ ]

श्री
शक १६४६ पौष वद्य १२

० श्री ॅ
राजा शाहुनर
पति हर्षनिधान
बाजीराव बलाल
प्रधान

छ मा। अनाम मंडलोई व कानगो पा। इंदूर यांसी बाजीराऊ बलाल प्रधान. सु॥ खमस अशरीन मया व अलफ. पा। मजकूर राजश्री चिमणाजी बलाळ यांजकडे पागेस मुकासा दिला आहे. तरी तुह्मी मशारनिलेसी रुजू होऊन पा। मजकूरचे पडलें पान आकार होईल त्याचे चौथाई वसूल मानिलेकडे सुरळित देणे. खलेल न करणे. जाणिजे. छ २५ रबिलाखर. पा। हुजूर.

लेखन
सीमा

[ ५९१ ]

श्री
शक १६४६ पौषवद्य १२
० श्री ॅ
राजा शाहु नरपति
हर्षनिधान । बाजि
राव बलाल प्रधान

राजश्री रघोजी भोसले गोसावी यासी. *
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। बाजीराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद. सु॥ खंमस अशरीन मया व अलफ. पा। कमपेल, सुभा इंदूर, सरकार उज्जैन, प्रांत माळवा, हा महाल खासगत पागेस मोकासा दिल्हा आहे. तरी तुह्मी परगणे मजकूरास एकंदर तगादा न देणे. एक रुपया न घेणे. एक रुपया घेतलिया खुद तुह्मास देणे लागेल. हें जाणून वर्तणूक करणे. जाणिजे. छ २५ रबिलाखर. बहुत काय लिहिणं ?

लेखन
सीमा

 

[ ५९० ]

श्रीरामजी
शक १६४५ वैशाख शु॥ १५

सीधश्री महाराजाधिराज महाराजा श्री सवाई जैसींघजी देववचनात नारायणदास दिसेसु प्रसाद बंचा. अपरंच हरजीमल सरकार सै बंदगीराषै छ सोयाने खीदमत फौजदारी वे अमीनी प्रगणे कंपेल सुबा उजनकी जो महमद अमीषा मुवा पाछषाहजी सैमुहूंछे सो बातसाहजीसै अरज पोहोचाई सब उन्हालु सबत १७७७ थी देवाईछे सो इहवास्ते थाने फरमावाछे जो याकाताळकामे जमीदारको हमाळे वाजबी देखा मोसुख न फेरे अरजमीयातके वास्ते थाने लीखेत व जमीयत भेजी जो जोय हसाब खतसीर खजाना पातिसाहीमै पहोंचै अर खोजे अबदालाखा दीवान सुबाका नायब हरजी मळकर्ण पोहोचता पहली जो हांसी सब उन्हाळुको तहसील करी लीयो होयसो मवाफीक हकम हजुरी कै फैसल देनापैगनें अरज लीखजो. मिती बैसाख सुदी १५ संवत् १७७९.

[ ५८९ ]

श्री. शक १६४२ आश्विन वा। १२
श्रीमार्तंडचरणि
दृढभाव शीवजी-
सुत रघोजी बारगळ
निरंतर

राजश्री राउ नंदलाल मंडलोई पा। इंदूर गोसावी यांसि.

छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। मल्हारराऊ होळकर दंडवत. सु॥ इहिदे अशरीन मया व अलफ. पा। मजकूरच्या ऐवजाचा करार जाला. ते समयीं अंतस्त, रुपये चार हजार केले आहेत. ते तों तुह्मी दिल्हेच असतील. नसतील दिल्हे तरी सदर्हू रुपये राजश्री नारो शंकर दि॥ मा।र यांजवळ झाडियानसी देणें. हैगै न करणे. हैगै कराल तरी एका दों रोजां तुमचे भेटीस आह्मासच येणे लागेल. मग जें होणे तें होईल. आजीं छ २५ जिल्हेजीं मुकाम चिखलदियानजीक जाला आहे. पुढें मजल दरमजल त्या प्रांतीं येतों. तरी तुह्मी सदर्हू रुपये व बाकी मा।रनिलेजवळ देणे. जाणिजे. छ २५ जिल्हेज.

मोर्तब
सुद.

[ ५८८ ]

श्री.

श्रीमंत राजमान्य याविराजित राजश्री नंदलालजी मंडलोई पा। इंदूर
गोसावी यासि

सेवक मुकुंद नरहरी कृतानेक नमस्कार विनंति उपरि. येथील क्षेम जाणौन स्वकीय लेखन करणें. विशेष. पूर्वी हरी जासूदाबराबरी पत्रें पाठविलीं ते पावलीं असतील. त्यांना जौबसाल अद्याप आला नाही. तरी सत्वर जौवाबसाल पाठविला पाहिजे. जोंवरि जौवाब ये तोंवर फौज प्रगणियांतून जात नाहीं. नुकसान आहे. या उपर तुह्मी विवेकी आहां.

                                                                                  लेखांक ३०९ 

                                                                                                      श्री

राजश्री त्रिंबकराव बादल गोसावी यांसि

5 अखंडितलक्ष्मीआलंकृतराजमान्य श्रीा फतेसिंग भोसले रामराम सुहूर सन इसन्ने सलासीन मया व अलफ राजश्री कृष्णाजी प्रभु हे मौजे कर्जे ता। रोहिडखोरे येथे यराहातात त्यासि मा।रनिले घर बाधीत आहेत त्यास राजश्री राणोजी नाईक याणी हि माने केले आहे की याचे घराचे साहित्य करावे तरी तुह्मी हि यासि सांगोन वासे पाचसे देवऊन याचे घर होये ते करवणे याचे सर्वप्रकारे अगत्य आहे जाणिजे २६ रमजान बहुत काय लिहिणे

           305 2                                                               305 1