Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[ ६०६ ]

श्री.

फाल्गुन शु॥ ५ शके १६५२

० श्री ॅ
राजा शाहु
नरपति हर्ष-
निधान बाजिराव
बलाल प्रधान

राजश्री तेजकर्ण मंडालोई व कुंवर न्याहालकर्ण प्रगणे इंदूर गोसावी यास

 अखंडितलक्षुमीअलंकृत राजमान्य स्नो। मलारजी होळकर व राणोजी सिंदे दि॥ पंत प्रधान दंडवत. सु॥ इसन्ने सलासीन मया अलफ. गिरमाजीपंत व भुटोजी तुह्माकडून आले. याणे हजूर कितेक वर्तमान निवेदन केलें व रा॥ नारोपंतीहि सांगितलें, त्यावरून कळों आलें. ऐसियासी, हाली राजश्री नारो शंकर व रा। मलार गोपाळ उभयतास कितेक मतलब सांगोन पाठविले आहेत, व गिरमाजीपंतही निवेदन करतील. त्याजमाफिक कबूल करून, तुर्त पोख्ता ऐवज जमा करून हजूर पाठविणे. खरीफाचा हंगाम होऊन गेला, अद्यापि तुह्माकडील निर्गम नाहीं. तरी याउपरि पोख्ता वसूल पाठवून देणे. आमचीहि फौज त्याप्रांते अविलंबेच येत आहे. तुह्मास मग जे गोष्टीनें लागे ते गोष्ट न करणे. तुमचा आमचा स्नेह जो आहे तो पुढें वृद्धि चाले, ऐसी गोष्ट करणें. वरकड मजकूर कित्येक पंत उभयतां मा।रनिले सांगतां कळों येईल. जाणिजे. छ ४ रमजान. पा। हुजूर. लेखनसिमा

[ ६०५ ]

श्री.

शके १६५२

श्री मार्तंड चरणी दृढ भाव
होळकर मलार
राव

राजश्री नंदलाल मंडलोई पा। इंदूर गोसावी यासी

छ अखंडितलक्षुमीअलंकृत राजमान्य स्नो। मल्हारराऊ होळकर दंडवत. सु॥ इहिद्दे सलासीन मया अलफ. आह्मी घाट चढोन देपाळपुरावर आलों. ये प्रांतीचा बंदोबस्त करावा लागतो. याजकरितां राजेश्री निळोपंत दिमत राजश्री पंतप्रधान हे तुह्माकडे पाठविले आहेत. तर तुह्मी भेटीस येणे. कितेक वर्तमान मशारनिले मुखवाचा सांगतील ते मनांत आणून निस्संदेह भेटीस लौकर येणे. व जेजाला ८० ऐशी व दारू खंडी सवा व सिसें मण अर्धा पाठविणे. व उंटें पन्नास ऐशी तयारी करून पाठवणे. बहुत काय लिहिणे ? हे विनंति.

० ॅ
मार्तबमुद

[ ६०४ ]

श्री शक १६५० माघ वद्य २

सीधश्री सरब उपमा जोग सदा राजमान राजश्री मं० राव नंदलालजी कुवर तेजकरणजी जोग्यली. माहाराज श्रीराणा सबलसींघजी, श्रीकुंवार नरीदसींघके. बंचणों इहांका समाचार भला छे, उहां का सदा भला चाहीजे तो संतोष होये. आगों पत्रीका दसखत खास भेजी सो पोंहचा. समाचार पाया सुबकुवो लिष्येथी, जो चुहड मलजीनें जामका मुकदमा बाबत करार दाद मा कुछ कमीकी कही सो हमतो अफजुदका उमेदवार छां. हमारी मीहनत वी० खरच उपरनेजर राखणी. ते खै साहेब नैसबसां चली लीयेतो खरच करणो मीहनत तळास तरकुद साहेबथी जवा बात बणी आवे. श्रीमहाराज साहेब खदमत नहीं कुई आवी अवरगनीमका समाचार उमट वाडीका लीखा ते जाहेर हुवा फैरी समाचार लीखोगा गनीम मालवा छे तब तांईसाहेबके भरोसे छां समाचार ऊज तार होगा. अपर बाजीरावकी बाघणकी खबर झुटीछे. अपर अपुरब समाचार नही जो लिखा चिठी समाचार लिखता रहणो. मास फागण वीदी २ संवत् १७८५.

[ ६०३ ]

श्री शक १६५० वैशाख शु॥ १

० श्री ॅ
शाहू भूपतिमध
परसोजी तनुजन
मनः कान्होजी
भोसलस्येयं
भाति मुद्रा
यशस्करी

अभयपत्र. सेनाधुरंधुर विश्वासनिधि राजमान्य राजश्री कान्होजी भोसले सेनासाहेबसुभा ताहां मंडलोई व कानगो, पा। इंदूर, सु॥ समान अशरीन मया व अलफ. परगणेमजकूरची खंडणी रुपये

२०००० ऐन खंडणी रुपये
५०० कारकुनी जासुदी
-----------
२०५००
एकूण वीस हजार पांचसें रास केले असेत. वसूल देऊन सुखरूप राहणे. अभय असे. जाणिजे. छ २९ माहे शाबान ० ॅ

लेखन
सिमा

[ ६०१ ]

श्री.

शक १६५०

राजश्री उदाजी पवार, राजश्री मल्हारजी होळकर साहेब दि॥ पंतप्रधान.

कबुलत मंडलोई कानगोई पा। बागोद सरकार मांडवगड़ सन ११३७ कारणे ऐसाजे. परगणे मजकूरची खंडनी सायेर राहदारी फशल केले. मोकरा रुपये १९०१ कबूल केले.

[ ६०० ]

श्री फाल्गुन शु॥ ७ शके १६५१

श्री भवानीशंकर
मुधोजीसुत देसो-
जी वाघ निरंतर.

छ राजमान्य राजश्री नंदलाल मंडलोई प्रा। इंदूर यासी

देसोजी वाघ नामजाद किले मांडवगड सु॥ सलामीन मया अलफ. तुह्माकडून राजश्री नारो शंकर आले. यांणीं वसूलाविसी बेभाट घेऊन आले की तुह्मी खालमेली घालून आजीचें उद्यावर घालिता. या विचारेकरून निभाव होणार नाहीं. करारजमा इंदूर जेपालपूर सावेर केली. त्याप्रमाणें वसूल सिताबीनें रो। नारोपंताचे मार्फाती केलियावर पाठविणें. दुसरे, बाघोद वगैरे किलियाच्या जागिरि आहेत त्यांचा चवथाई मोकास बाबेचा करार मुकरर जमा इकडे असेल तेच करार. परंतु जागिरिचे ३ हिसियाची जमाबदीस जमीदबार कानगो किलियावर पाठविणें. जमा वसूल हिसेब मनास आणून, बाकी निघेल ते विल्हे करून घेऊन जाजती तोसीस लागणार नाही. याजकरितां आपला एक भला माणूस हिसेबास पाठविणें. त्याचे मार्फतीनें करार करून येविसी राजश्री उदाजी पवार याचींही पत्रें येतील, त्यावरून कळेल. बहुत काय लिहिणें ? जाणिजे. छ. ६ साबान.

[ ५९९ ]

श्री. कार्तिक वद्य ५ शके १६५१

० श्री ॅ
राजा शाहु नरप-
ति हर्षनिधान ।
बाजीराव बलाळ
मुख्य प्रधान

छ मा। अनाम नंदलाल मंडलोई पा। इंदूर यांसि बाजीराउ बलाळ प्रधान सु॥ सलासीन मया अलफ. राजश्री कुसाजी गणेश हुजुर आले. यांणी कितेक अर्थ निवेदन केला. त्याजवरून सविस्तर कळलें. ऐसियास आमची स्वारी ते प्रांते सत्वरीचे आहे. माळवियाचा बंदोबस्ताचा अर्थ राजश्री लाला हरिनारायण यांणी लिहिला व जबानी सांगेन पाठविला होता. त्यास, प्रांत मजकूरचा बंदोबस्त जालिया रयत निरुपद्रवी राहून दुतर्फा किफायतच आहे एतद्विषयीं एथून उज्जैनच्या सुभ्यास व लाला हरनारायण यांस कितेक अर्थ-लेख करून पत्रें पाठविलीं व जबानी मा।रनिले सांगतील. तरी तुह्मी त्यास विचाराच्या चार गोष्टी सांगोन, मुलकाचा तह करून, दुतर्फा कमावीस सुरळित चालवणे. जरी हे गोष्टी त्यांचे विचारास न येच तरी आह्मी ते प्रांते येतच आहों. आमची फौज तिकडे आलियावर मुलुक सुप्रयुक्त राहतोसा नाहीं, खराब होईल. तेव्हां नुकसान होणे तें त्यांचे होईल. वरकड कितेक अर्थ मारनिले तुह्मास सांगतील त्याजवरून कळेल. सारांश, तुह्मी मातबर व कार्यकर्ते एकनिष्ठ आहां. हरएक विचारास चुकतासें नाही. तुमचें सर्व प्रकारें अगत्य आहे. तदनरूप बलाईस होणे तें होईल. आपला खातरजमा असो देणे. आमची स्वारी रेवातीरास येतांच तुह्मी मातबर मनुष्य हुजूर पाठवून देणे व त्यांजकडीलही मातबर मनुष्य बराबर घेऊन तुह्मीच रेवातीरीं भेटीस येणे. जाणिजे. छ १९ रबिलाखर. आज्ञा प्रमाण

लेखन
सीमा

                                                                                  लेखांक ३१० 

                                                                                                  श्रीशंकर

                                                                     310

राजश्री जगोजी जाधव गोसावी यासि

5 अखंडितलक्ष्मीआलंकृतराजमान्य श्नेहांकित कान्होजी भोसले सेनासाहेब सुभा जोहार उपरी येथील क्षेम जाणून तुह्मी आपले क्षेम लिहित जाणे यानंतर बहुत दिवस तुमचे पत्र येऊन वर्तमान अवगत होत नाही तर सदैव पत्र पाठवित असले पाहिजे विशेष राजश्री फत्तेसिंग भोसले व राजश्री नीळ प्रभू याची पत्रे आह्मास आली होती त्याची उत्तरे जासूद देऊन पाठविली आहेत त्यावरून कळो येईल तुह्मी त्यास सांगोन फौजेसहवर्तमान या प्राते येत ऐसे करणे आपले हरघडी वर्तमान लिहित जाणे रा। छ ७ माहे रबिलाखर बहुत काय लिहिणे लोभ असो दीजे ही विनंती

                          137

[ ५९८ ]

श्री.

शक १६५१ कार्तिक

० श्री ॅ
मंगलमुर्तिचर-
णी तत्पर । नारो ।
शंकर नीरंतर

राजश्री लाला हरनारायणजी पा। सावेर व तालुके प्रगणे देपालपुर

छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। उभयतां नारो शंकर दि॥ राजश्री उदाजी पंवार व राजश्री मल्हारराउ होळकर आशीर्वाद. विनंति. सु॥ सलासीन मया अलफ मा। राव नंदलाल मंडलोई परगणे इंदूर रु॥ हजर अंके १००० पावले. जाणिजे. शिवाय स्वारांचा खर्च पैकीं रुपये १०० शंभर एकूण रुपये ११०० अकरासे पावले असत.

मोर्तबसुद
स०० १७८६

[ ५९७ ]

श्री. आषाढ वद्य २ शके १६५१

श्री मार्तंडचरणी
तत्पर मुकुंद
नरहर निरंतर

राजश्री नंदलाल मंडलोई गोसावी यासि

छ अखंडितलक्षुमीअलंकृत राजमान्य सेवेसी मुकुंद नरहर नामजाद प्रा। तकटी दि॥ रा॥ उदाजी पवार सु॥ सलासैन मया अलफ. प्रा। बागोद येथील खंडणी साल गुदस्ता रा। रा। मलारराऊ होळकर यांनी केली. त्याप्रमाणें वसूल भरून पावला. आपला दामदिरिम राहिला नाहीं. + + + देशमुखी, चौथाई, सायेर, कारकुनी कुलबाब भरून पावलों. जाणिजे. रा। १५ माहे जिल्हेज.

मोर्तबसुद