लेखांक ३१४
श्रीगणेशायन्माः
राजश्री खंडेराव बापूजी सुभेदार सरदेसमुखी सुभा सातारा गोसावी यांसि
अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य श्रीा केदारजी मसरकर अजहत सरदेसमुख रामराम सु॥ सीत अर्बैन मया अलफ बदल देणे राजश्री बाबूराव दिवाण यास रुपये २५ पंचवीसाचा गला बार सेरी बारुले मापे दिवाण निर्खप्रमाणे देविला असे आदा करून पावलियाचे कबज घेणे छ २२ माहे सफर बहुत काय लिहिणें हे विनंती
बार