[ ६१८ ]
श्रीशंकर.
वैशाख वद्य १२ शके १६५४
० श्री ॅ
मंगलमूर्तिचरणीं
तत्पर नारो शंकर
निरंतर
संवत् १७८६
राजश्री राव तेजकर्ण कुवर न्याहळकर्णजी मंडलोई पा। इंदूर गोसावी यासी--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। नारो शंकर व मलार गोपाळ दि॥ राजश्री होळकर व रा। राणोजी शिंदे. सु॥ इसन्ने सलासैन वालफ. परगणे बेटमियाचे जमीदाराकडून राजश्री बालाजी विष्णु मजमदार पा। मजकुर यास रुपये ५० पन्नास देविजे. गै न कीजे. रा। छ २५ जिल्काद. जाणिजे. मोर्तबसुद
० ॅ
मोर्तबसुद
संवत् १७८६
ऐवज खंडनी पा। मजकूर पैकीं मुजरा असे. जाणिजे.