Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ६१५ ]
श्रीशंकर.
फाल्गुन शु॥ ११ शके १६५३
राजश्री राव तेजकर्णजी मंडलाई व कुंवर न्याहालकरणजी गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। नारो शंकर व मल्हार गोपाळ नमस्कार. सु॥ इसन्ने सलासीन मया अलफ. उपर. आपण राजश्री सुभेदारांपासून खंडणीच्या तहाबद्दल आलों असों. एविषयी राजश्री सुभेदारांचही लिहिलें आहे. तर तुह्मी आपले समाधानं भेटीस येणं. खंडणीचा तह केला जाईल. रवाना छ ९ रमजान. मोर्तबसुद. हरएकविषयीं वसवास न करणें. खातरजमेनं आलं पाहिजे. विशेष काय लिहिणें हे विनंति.
मोर्तब
सुद
० श्री ॅ
मंगलमूर्ति
चरणीं तत्पर
नारो शंकर
नीरंतर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ६१४ ]
श्रीर्जयति मार्गशीर्ष शु॥ १३ शके १६५३
राजश्री मल्हार होळकर गोसावी यासी.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥ चिमणाजी बल्लाळ आशीर्वाद. सु॥ इसन्ने सलासीन मया अलफ. नंदलाल मंडलाई प्रगणे इंदूर हे पहिलेपासून निष्ठेनें वर्तत आहेत. हाली ते मृत्य पावले गेले. त्यांचे पुत्र मंडलाई रा। तेजकर्ण कुवर न्याहालकर्ण हेही त्याजप्रमाणें निष्ठेनें वर्ततात. ऐसियास, त्या प्रांतें प्रा इंदूर हे जागा आपली आहे. त्याचे मागें त्याचें पुत्राचें चालव वें हें उचित आहे. आणि आपले कामाचे गोष्ट आहे. यास्तव तुह्मास हें पत्र लिहिलें असे. तरी मारनिलेवर हरएकविसी साल मजकुरीं साल गुदस्तास त्यात करून अगत्यवादेकडून सर्वस्वें चालविणें. येविसी आह्मासही अगत्व आहे. तुह्मी लक्ष प्रकारें याजवरील साल-गुदस्तांत खंडनीस रुपये ५००० पांच हजार सोडून बाकी सालमजकुरी घेऊन रयात करणें. हरएकविसी आजार न देणें. माळवे प्रांते हे आपले कायावे आहेत. त्याचे लिहिणेप्रमाणें चालवावयास अंतर न करणे. जाणिजे. छ ११ माहे जमादिलाखर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ६१३ ]
श्रीराम कार्तिक शु॥ ४ शके १६५३.
नकलखत बमोहर राजश्री बाजीराय पंत प्रधान. बाबत छ माहे २ जमादिलावल. मतलब. मा। अनाम. मंडलाई तेजकर्ण प्रा। इंदोर यासी बाजीराय बल्लाळ प्रधान. सु॥ इसन्प्ने सल्लालीन मया अलफ. तुह्मा विनंतिपत्र पाठविलें तें पावोन सविस्तर कळलें. नंदलाल मंडलाई यास देवाज्ञा जाली. आपले प्रकारें चालवावें ह्मणून कितेक निष्ठापुरस्कर लिहिलें ते कळले. ऐसियासि माळवा प्रांतीचे यखतियार राजश्री मल्हारजी होळकर, राजश्री राणोजी सिंदे यांसि देऊन पाठविले आहेत. यास तुमचा गोर करावयासि कितेक आज्ञा केली आहे. उभयता मा।रनिल्हे आज्ञेप्रमाणें तुमची गोर करितील. तुह्मी त्यांस भेटोन कामकाज करीत जाणें. तुमचा सर्वप्रकारें आह्मास अभिमान आहे. तदनरूप निर्वाह होईल. चिंता न करणें. आपले वर्तमान वरचेवर लिहित जाणें. जाणिजे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ६१२ ]
श्रीशंकर.
ज्येष्ठ वद्य १० शक १६५३
० श्री ॅ
मंगलमूर्ति चरणीं
तत्पर नारो शंकर
निरंतर
स० १७८६
राजश्री राउ तेजकरण व कुंवर न्याहालकरणजी मंडलोई पा। इंदूर गो। यासि.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो नारो शंकर व मल्हार गोपाळ दि॥ होळकर व सिंदे. सु॥ इसन्ने सलासैन मया अलफ. बा। मनोती पा। बेटमपैकीं पोहचले. छ २२ जिल्काद, सन ११३९, रुपये सहासे पन्नास मेबलग साडेसासे सदर्हू ऐवजपैकी बेटमाचे खंडणीचे ऐवजी तुमचे मनोतीपैकी मंजूर असे. जाणिजे. रा। छ २३ जिल्हेज.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ६११ ]
श्री.
ज्येष्ठ वद्य ६ शके १६५३
० श्री ॅ
राजा शाहु नर-
पति हर्षनिधान
बाजीराव बलाल
प्रधान
राजश्री तेजकर्ण मंडलाई प्रगणे इंदूर गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥ मल्हारजी होळकर ब राणोजी सिंदे दंडवत. सु॥ सलास सलासिन मया अलफ. तुमचे भेटीकरितां तळावरी आह्मी वाट पाहतों. तरी पत्रदर्शनीं स्वार होऊन येणें. एक घडीचा विलंब न करणें. जाणिजे. छ १९ जिल्हेज.
लेखनसीमा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ६१० ]
श्रीगणपतिर्जयति
राजश्री तेजकर्ण मंडलोई पा। इंदूर गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो कृष्णाजी कदम रामराम विनंति उपर. राजेश्री बाळाजी गणेश यांसी कांहीं जिनस आणावयाबदल इंदूरास पाठविलें आहे, त्याबरोबर माणसें देऊन लष्करास पोहचावणें. जाणिजे. छ १६ जिल्हेज. हे विनंति. मोर्तब सुद.
० श्रीमार्तंडचरणीं ॅ
दृढ भाव कृष्णाजी
कदम राव
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३११
श्री
वंशावल देशकुलकर्णी ता। रोहिडखोरे
मूळपुरुष
वडिल
१ वडिल भिक प्रभु
भिक प्रभूचा पुत्र
१ हजर प्रभु हर प्रभूचा
१ पुत्र बाल प्रभु बाल
१ प्रभूचा पुत्र भान प्रभु
भान प्रभूचा पुत्र
१ जाऊ प्रभु जाव प्रभूचा
१ पुत्र साव प्रभु साव प्रभूचा पुत्र
१ नरस प्रभु नरस प्रभूचा पुत्र
१ दाद प्रभु दत्त पुरुष दादा प्रभूचे पुत्र कृष्णाजी
१ व एसाजी प्रभु
-----
९
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ६०९ ]
श्री. शक १६५३ ज्येष्ठ वद्य ४
श्री ह्माळसाकांत
चरणी दृढभाव
होळकर मल्हार
राव
राजश्री नंदलाल मंडलोई पा। इंदूर गोसावी यांसि
अखंडिलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। मलारजी होलकर दिमती राजश्री पंतप्रधान दंडवत सु॥ सन इसन्ने सलासीन मया अलफ. लिहिलें पत्र पाठविलें पावोन वर्तमान विदित जालें. लि॥ कीं पा। मजकुरी ताकीद करणें ह्मणोन लि॥, तरी ताकीद केली आहे. परंतु कोणी तुमचे अगोदर आलें नाही. त्यासी न कळत जाहलें, यासी उपाय नाही. मग राघोदास व मयाराम भेटले. ताकीद करविली- या कुळ माळवियांत तुमची प्रमाणीकता विश्वास, तुमचा आमचा घरोबा आणि तुह्मी बेइमानाची गोष्ट सांगावी, हें अपूर्व आहे ! पैकियाचा वसूल अद्याप झाडियानसी न दिल्हा यावरून काय ह्मणावें ? याउपरि पत्रदर्शनी पैकियाचा झाडा राजश्री नारो शंकर यापासीं करणें. आणि कोणेविसीं इमानांत अंतर न करणें. जाणिजे. छ १७ जिल्हेज. पैकियाचा झाडा न केला यास्तव राजश्री बापूजी बाजी पाठविले आहेत. तरी यांच्या विद्यमानें राजश्री नारोपंत यांसी ऐवज झाडा करणे. ऐसें न होय कीं इष्टत्वास अंतर पडेल. पैकियाच्या निशेचें वर्तमान नये तोंवरि मुकाम पडेल असें न करणें. सारांश गोष्टी स्नेहास अंतरता न होय तें करणें. काहीं कामकाजास राजश्री रामाराऊ गाडे पाठविले आहेत. तरी कार्य-भाग करून सत्वर पाठविणें. आणि पेशजी बुनंगे यांचे कबिले होते तेव्हां घोडी वगैरे वस्तभाव बारीच्या तोंडी गेली आहे ते पाठविणें. येविसीं बहुत लिहिणें नलगे. तुमचे जिभेची दि॥ देवास बाकी झाडियानसी देणे. उजूर न करणे. जाणिजे. रवाना छ १७ जिल्हेज. हे विनंति.
मोर्तब
सुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ६०८ ]
श्रीशंकर. ज्येष्ठ शु॥ ४ शके १६६३
० श्री ॅ
मंगलमूर्ति-
चरणीं तत्पर
नारो शंकर
निरंतर.
राजश्री राव तेजकर्णजी व कुवर न्याहालकर्ण मंडलोई परगणे इंदूर गोसावी यासि--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो नारो शंकर व मल्हार गोपाल दि॥ राजश्री मल्हारराउ होळकर व राजश्री राणोजी सिंदे सु॥ इसन्ने सलासीन मया अलफ सन ११३९ बा। हावाला मनोती परगणे बेटमे पैकीं पोहचले रुपये ५२५ मोकरा सवापांचसे रास मनोती बा। पा। बटेमपैकी मजुरा असेत. जाणिजे. रवाना छ २ जिल्हेज. जाणिजे. मोर्तबसुद
मोर्तबसुद
स०० १६७४
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ६०७ ]
श्रीर्जयति
शक १६५३
राजश्री राणोजी सिंदे गोसावी यासि--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। चिमणाजी बल्लाळ आशीर्वाद. सु॥ इसन्ने सलासैन मया अलफ. नंदलाल मंडलाई प्रा। इंदूर हे मृत्य पावले. त्यांचे पुत्र राजश्री मंडलाई तेजकर्ण कुवर न्याहालकर्ण हाली निष्ठेनें वर्ततात. त्यास, त्याचें अगत्य सर्व प्रकारें आहे. आणि ते जागा हरएकविसी आपली आहे. तेथें हरएकविसी रयात करून याचें चालवयाविसी रा। मल्हारजी होळकर यांस तुह्मांस पत्र लिहिलें आहे. तरी तुह्मी ते जागा आपलीसी जाणून सालगुदस्ताच खंडनीपैकी ५००० पांच हजार सोडून बाकी साल मजकुरी घेऊन सर्वप्रकारे चालविणें. येविसी रा। मल्हारबासही तुह्मास लिहिलें आहे. मशारनिले सर्वस्वे आपले मायेचे आहेत त्याचें आह्मास बहुत अगत्य आहे. तरी लक्ष प्रकारे लिहिणेंप्रमाणें चालवयासि अंतर न करणें, जाणिजे.