[ ६२१ ]
श्री
वैशाख शु॥ २ शके १६५८
० श्री ॅ
राजा शाहू नरपति
हर्षनिधान बाजीराव
बलाळ मुख्य प्रधा
न
मा। अनाम तेजकरण मंडलोई प्रा। इंदूर यांसि बाजीराव बलाळ प्रधान. सु॥ सीत सलासीन मया अलफ. रा। भयाजी नाईक यांजपाशीं सरकारचा ऐवज बर्हानपुरास पावावयाचा पाठविला आहे. तरी तुह्मी बदरका देऊन बर्हानपुरास पोहचावणें. जे वेळेस जो ऐवज रवाना करितील ते वेळेस बदरका देऊन पोहचावीत जाणें. ये बाबे गई न करणें. जाणिजे. छ १ जिल्हेज.
लेखनसीमा.