[ ६१६ ]
श्री माघ शुद्ध ४ शके १६५३
० श्रीह्माळसाकांत ॅ
चरणी तत्पर । खंडोजी-
सुत मल्हारजी होळ-
कर
राजश्री तेजकर्ण मंडलोई गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। मलारजी होळकर दि॥ राजश्री पंतप्रधान. सु॥ इसन्ने सलासीन मया अलफ. राजश्री कुसाजी गणेश व भोळूभट व गिरमाजीपंत याणें वर्तमान विदित केलें. त्यावरून नवाब उमरखान यांसि फारसी कागद रजपुताविसीं लिहिला आहे. व दामाजीपंत कमावीसदार प्रगणे धार यांसीहि लिहिलें आहे. कागद पोहचावून देणें. रजपूत काहडून देतील, याउपरि उपद्रव देणार नाहीं, ऐसेंच लिहिलें आहे. व धोंडोपंत व भेवजी अवधूत, कमावीसदास प्रा। काटकुत, यांसि कागद लिहिला आहे की, मवाफणीतपियाचा गांवची वस्तभाव घेतली ती फिरोन देणें. हजूर, बोभाट यावयासी प्रयोजन नाहीं, ऐसें त्यासही लिहिलें आहे. तुह्मी हरएकविसी आपली खातिरजमा राखणें, जाणिजे. छ ४ साबान.
मोर्तब
सुद