Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १
श्री.
पौ छ १८ जिल्हेज.
१६८३ ज्येष्ट वद्य १२
राजश्री मोराजी शिंदे नामजाद, जजीरे रत्नागिरी गोसावी यासीः-
अखंडितलक्ष्मी राजमान्य श्रों रघुनाथ बाजीराव. सु।। इसन्ने सितैन मया व अलफ. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. अनानासें शंभर पाठविलीं आहेत, ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास, शंभर अनानास, पौ अठावीस येथें आली, तींहि नासली. असला नासका जिन्नस दुरून न पाठवीत जाणें, असें पूर्वीं लिहिलें असतां, हाली रयतीस हैराण करून अनानासें प्रजंनकालाचीं पाठविलींत, हे गोष्ट कामाची नसे. या उपरी पाठवीत न जाणें. जाणिजे, छ २५ जिल्काद. बहुत काय लिहिणें ? लेखनसीमा.
श्री राजा शाहु नरपति हर्षनिधान बाळाजी बाजीराव प्रधान,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
प्रस्तावना
१३. नारायणराव बल्लाळाच्या कारकीर्दीतील पत्रे थोडीं म्हणजे फक्त ४ आहेत. माधवराव नारायणाच्या कारकीर्दीतील पत्रे ३०२ आहेत. पैकीं पत्रांक २७४ पर्यंतचीं पत्रें रघुनाथरावदादांच्या संस्थानद्रोहाच्या हकीकतीनें भरलीं आहेत. शक १६८३ पासून शक १७०४ पर्यंत जीं २१ वर्षे गेली, त्यांचा इतिहास म्हणजे रघुनाथरावदादांच्या संस्थानद्रोहाचा इतिहास. त्याची समाप्ति पत्रांक २७४ त झाली आहे. रघुनाथरावाच्या द्रोहाचा सांसर्गिक झटका गायकवाड, पटवर्धन, भोसले, होळकर, शिंदे, कोल्हापूरकर वगैरे अनेक सरदारांस बसल्या कारणानें पत्रांक २७४ पर्यंतच्या पत्रांत ह्या सरदारांच्याहि संस्थानद्रोहाची हकीकत आलेली आहे. शक १७०४ पासून शक १७१८ पर्यंतची म्हणजे सवाई माधवरावांच्या मृत्यूपर्यंतचीं पत्रे आहेत, त्यांत, सर्वं मराठा सरदारांचें एकीकरण करण्याचा जो नाना फडणिसानें प्रयत्न केला, त्याची हकीकत पहावयास सांपडेल. ह्या एकीकरणाच्या हकीकतीची समाप्ति पत्रांक ४१५ त झाली आहे. तद्नंतर रावबाजींच्या कारकीर्दीचीं पत्रे लागतात. त्यात बाजीरावाचा कमकुवतपणा, सरदारांचा द्रोह, पेंढा-यांचे दंगे, स्त्रियांची नागवण, व लोकांची दैना, ह्यांचीं वर्णनें वाचावयास मिळतील. शक १६८३ पासून रघुनाथराव व गोपाळराव यांनीं जो संस्थानद्रोह सुरू केला व ज्याचें पारिपत्य यथास्थित झालें नाहीं, ती परिपाकास येऊन सत्ताधीश, सरदार, सामान्य प्रजा, स्त्रिया, व धर्माधिकारी यांस कसा भोंवला, तें शक १७२२, शक १७२३ व शक १७२४ या तीन सालांतील पत्रांवरून तपशीलवार कळेल. स्वतंत्र संस्थान म्हणजे काय वा संस्थानद्रोह म्हणजे काय, स्वसंस्थानाला सोडून, शत्रूची सेवा करणें म्हणजे केवढें पातक आहे, प्रत्येक जाणत्या माणसाला राजकीय भावना किती जाज्वल्य असली पाहिजे, वगैरे गोष्टी ज्या वाचकांना माहीत असतील, ते ह्या तीन सालांतील पत्रांचे बहुत मनन करतील. शक १७२४ नंतरची रावबाजीच्या कारकीर्दीतील पत्रें आपापली हकीकत सांगतच आहेत. तेव्हां त्यासंबंधानें येथें जास्त लिहीत नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
प्रस्तावना
१२. ह्या दहाव्या खंडांत माधवराव बल्लाळ, नारायणराव बल्लाळ, सवाई माधवराव व बाजीराव रघुनाथ ह्या चार पेशव्यांच्या कारकीर्दीतील पत्रव्यवहार आला आहे. पैकीं माधवराव बल्लाळाच्या कारकीर्दीतील ७९ लेख आहेत. त्यातला २१ वा लेखांक शक १६८५ श्रावण शुद्ध ५ चा असून, त्यांत दोन्हीं सैन्यें मिळून पांच सहा हजार लोक रणास आले, असें खुद्द माधवराव लिहितो. ह्या राक्षसभुवनाच्या लढाईत मोंगलांचे दहा हजार लोक पडले, असें डफ म्हणतो व आधार बखरींचा देतो. कोणत्याहि बखरीपेक्षा खुद्द माधवरावाच्या पत्रावर जास्त विश्वास ठेवला पाहिजे, हें उघड आहे. अस्सल पत्रापेक्षां बखरीवरच डफने विशेष निर्वाह केला होता, हे सांगावयाला नकोच. ही तपशिलासंबंधाची बाब झाली. परंतु; निजामाशीं चाललेल्या ह्या मोहिमेंत दुसरीच एक बाब इतिहासदृष्ट्या व राजनीतिदृष्ट्या महत्वाची आहे. ती बाब ही. मोरोबा फडणवीस, गोपाळराव पटवर्धन, सदोबा शेणवी, गमाजी मुतालिक, भवानराव प्रतिनिधी, वगैरे मराठे मुख्यसत्तेला सोडून शत्रुपक्षाला मिळाले, तें राजनीतीच्या दृष्टीनें कितपत न्याय्य होते? स्वतंत्र संस्थानांतील कोणीहि माणूस युद्धप्रसंगी किंवा शांततेच्या काली शत्रूंच्या संस्थानाच्या विरुद्ध कोणत्याहि प्रकारे संस्थानाच्या जाणून उपयोगीं पडल्यास, तो संस्थानद्रोही होऊन देहान्तशिक्षेस पात्र होतो, असा सर्व राष्ट्रांचा नियम आहे. त्या नियमाच्या दृष्टीनें पहातां गोपाळराव पटवर्धन वगैरे सरदार संस्थानद्रोही ठरतात. हा नियम त्या कालीं महाराष्ट्रांत प्रचलित नव्हता, असेंहि नाहीं. तोतयाचे बंड झाले तेंव्हा नाना फडणिसांनीं हजारों लोकांची त्यांच्या त्यांच्या अपराधांच्या मानानें शासनें केलेलीं आहेत (पत्रांक ३०७). संस्थानांतील सामान्य माणसें शत्रूंच्या सेवेस गेलीं असतां, त्यांचीं घरेदारें जप्त करण्याचीहि वहिवाट त्या कालीं होती (पत्रांक ६६ वगैरे). शिवाजी तर अशा माणसांना शत्रु समजून शासन करीत असे (म. इ. सा. खंड ८). रघुनाथरावाचें व माधवरावाचें इतकें बिनसलें असतां, रघुनाथरावाच्या विरुद्ध माधवराव निजामाला जाऊन कधींहि मिळालेला नाहीं. असा दंडक त्या वेळीं प्रचलित होता. मुख्य सत्ता शिरजोर असतां हा नियम लागू असतो, व कमजोर झाली असतां नसतो, असें तर बिलकूलच म्हणतां येत नाहीं. मुख्य सत्ता कोणत्याहि कारणानें कमजोर होऊं लागली असतां, तिच्याशीं एकनिष्ठेनें रहाणें इतकेच नव्हें, तर तिला शिरजोर करण्याकरितां जिवापाड मेहनत करणें संस्थानांतील प्रत्येक माणसाचा स्वभावसिद्ध धर्म आहे. तो धर्म न पाळला, तर संस्थानाचें स्वातंत्र्य त्या मानानें नष्ट होतें. संस्थानाचें स्वातंत्र्य जसजसें नष्ट होतें, तसतसें ज्या धर्म, नीति व संस्कृति यांच्या संरक्षणाकरितां स्वतंत्र संस्थान निर्माण झालेलें असतें, त्यांचा नाश होतो. त्या नाशाबरोबर संस्थानांतील प्रत्येक व्यतीचेंहि स्वातंत्र्य नष्ट होतें. अशी भयंकर आपत्ति संस्थानद्रोहानें येते. तेव्हां, संस्थानद्रोह्यांना मोठी शिक्षाच योग्य असते. अशी शिक्षा न देणारा संस्थानाधिकारीहि संस्थानाच्या नाशास कारण होतो. ह्या दृष्टीने पहातां, संस्थानहितार्थ माधवराव बल्लाळानें गोपाळराव पटवर्धनादि मंडळींचें यथायोग्य शासन केलें पाहिजे होतें. गोपाळरावादि मंडळी फौजबंद पडल्यामुळें व संस्थानाधिकारी कमजोर पेंचांत पडल्यामुळे, माधवरावाच्या हातून शासन करण्याचा धर्म यथास्थित अंमलांत आला नाहीं. त्याचा परिणाम असा झाला कीं, देशांतील राजधर्म व प्रजाधर्म ढिला पडला; ह्यापुढें प्रत्येक सरदार हरहमेष संस्थानच्या शत्रूंशीं कधीं गुप्तपणें व कधीं उघडपणें मित्रत्व करूं लागला. पानिपतच्या लढाईनंतर संस्थानद्रोहाचें पहिलें उदाहरण म्हटलें म्हणजे हें गोपाळरावादि मंडळींचें होय. ह्याचा कडक बंदोबस्त ताबडतोब व्यवस्थित रीतीनें त्याच वेळीं झाला असता, तर सर्व सरदारांना भयंकर वचक बसला असता व मराठ्यांचें स्वतंत्र संस्थान अजरामर झालें असतें. ह्या प्रकरणाचा येथें विशेष उल्लेख करण्याचें कारण असें की मराठ्यांचें पुढील सर्व चरित्र ह्या एका संस्थानद्रोहाच्या पातकानें लिप्त होऊन गेलेलें आहे. ह्या संस्थानद्रोहाचा मूळ उगम रघुनाथराव पेशवा होता. त्याचा निकाल यथायोग्य शासनानें माधवरावानें लावून टाकिला असता, म्हणजे द्रोहाचें बीजच नष्ट झालें असतें. शक १६९० च्या ज्येष्ठ शुद्ध १० स धोडपच्या लढाईंत रघुनाथरावदादाचा माधवरावानें रेच मात्र उतरला (पत्रांक ४९); परंतु, संस्थानद्रोहाबद्दल त्याचें करावें तसें शासन न करतां, कीड तशीच राहूं दिली. ह्या किडीच्या आश्रयानें संस्थानांतील सरदारांना संस्थानाच्या विरुद्ध वागण्यास अवसर मिळाला. ही कीड नाहींशी केली असती, म्हणजे सरदाराचें पृथक् होण्याचें एकच साधें खूळ राहिलें असतें. व तें कालांतरानें जमीनदोस्त करतां आलें असतें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
प्रस्तावना
१०. वांशिक पद्धतीनें इतिहास लिहावयाचा म्हटला म्हणजे त्या त्या देशांतील लोकांची वंशपरीक्षा करणें अपरिहार्य होतें. मराठ्यांच्या इतिहासासंबंधाने विचार करावयाचा म्हटला म्हणजे मराठ्यांचा वंश कोणता, तें ठरविणें अवश्य होते. मराठे शकवंशीय आहेत, असे रिस्ले प्रपादतात. तें खोटें व निराधार आहे. असे मी म्हणतों. रिस्लेचा प्रत्येक शब्द असत्य व डळमळीत आहे, असें मला वाटतें. मराठे कोठून आले, केव्हा आले, कसे आले, एतत्संबंधीं रिस्लेची माहिती कोती, असंबद्ध, निराधार, पोरकट व शास्त्रशून्यतेला साजेल अशी आहे. शकांनीं आपली मूळ शाक भाषा टाकून दिली, आर्य प्राकृत भाषा स्वीकारली व तिच्यापासून वर्तमान मराठी झाली, असा रिस्लेचा विचित्र कोटिक्रम आहे. बोलण्याला आधार कशाचाही नाही. नुसता Wild and ignorant conjecture आहे. ह्याला सशास्त्र पद्धत म्हणतात ! व हिंदुस्थान सरकार हें भारुड छापण्याकरिता पैसे खर्चते! लेखकाच्या सशास्त्र पद्धतीचें कौतुक विशेष करावें किंवा हिंदुस्थान सरकारच्या पारखेचे कौतुक विशेष करावें, ह्याचें मला गूढ पडलें आहे!
११. असो. असले विपरीत सिद्धांत युरोपियन लेखकांच्या लेखांत पदोपदी आढळतात. जशी वेळ पडेल व लहर लागेल, त्याप्रमाणें हे सिद्धांत एका टोंकापासून दुस-या टोंकापर्यंत बदलत असतात. मोंगलांना चिरडून हिंदुस्थान इंग्रजांनी मिळविलें, असें एक लेखक लिहितो; तर मराठ्यांपासून हिंदुस्थान इंग्रजांनीं हिसकून घेतलें, असे दुसरा लेखक प्रपादतो. हिंदुस्थानच्या विचित्र हवेंत शारीर व मानसिक श्रम युरोपांतल्याप्रमाणें होत नाहीत, असें एक शहाणा बरळतो, तर दुसरा होतात म्हणून त्याचा निषेध करतो. असे नाना प्रकारचे परस्परविरुद्ध ग्रह युरोपियन लोक आपल्या सुपीक डोक्यांतून, मन मानेल तसे, प्रसवत असतात. त्यामुळें होत आहे काय कीं, ह्या पाश्चात्यांच्या कोणत्याच बोलावर इकडील विचारी लोकांचा विश्वास बसत नाहींसा झालेला आहे. अशा स्थितींत एकच मार्ग सुरक्षित भासतो. आपली मते यथासत्य बनविण्यास आपणच उद्योग केला पाहिजे; दुस-याच्या दुटप्पी बोलण्यावर भिस्त ठेवून बसण्यात तात्पर्य नाही, हीच गोष्ट लक्ष्यांत घेऊन, मराठ्यांचा यथासत्य इतिहास निपजण्याकरितां, मराठ्यांच्या इतिहासाचीं अस्सल साधनें प्रसिद्ध करण्याचा प्रस्तुत लेखकानें उपक्रम केला आहे. त्या कामीं प्रस्तुत प्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेनें साहाय्य केलें, ही बाब मतैक्याची सूचक आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
प्रस्तावना
Chap. VI, Ethnology and Cast, pp. 307-308
by H. S. Risley. Imperial Gazetteer of India, Vol. I
मराठ्यांना शाक ऊर्फ Scythians ठरविल्यावर रिस्ले पुढें म्हणतात –
The highest class of Marathas is supposed to consist of ninety-six families, who profess to be of Rajput descent and to represent the Kshattriyas of the traditional system. They wear the sacred thread, marry their daughters before puberty, and forbid widows to marry again. But their claim to kinship with the Rajputs is effectually refuted by the anthropometric data now published & c.
येणेंप्रमाणें, महाराष्ट्रांतील मराठे आर्य नाहींत, असा रिस्लेचा नवीन शोध आहे. महाराष्ट्रांतील ब्राह्मण आर्य नाहींत, असे बरळण्यापर्यंत अद्याप मजल पोहोंचली नाहीं. परंतु, तोहि प्रसंग पुढें मागें आल्याशिवाय रहाणार नाहीं. असो. सध्यां ब्राह्मणांशीं आपल्याला कर्तव्य नाहीं. फक्त मराठ्यांच्या वंशाचा विचार करावयाचा आहे. सर रिस्ले यांना आमचा असा सवाल आहे कीं, रजपूत Scythians नाहींत, हें ठरविण्याला जीं प्रमाणें त्यांनीं नमूद केलीं आहेत तींच प्रमाणे मराठे Scythians नाहींत, हें ठरविण्याला समर्पक आहेत. Scythians ऊर्फ शक काठेवाड, गुजराथ व जुन्नर ह्या स्थलीं केव्हां आले व किती दिवस राहिले, हे इतिहासप्रसिद्ध आहे. ते जुन्नरास राज्य करीत होते, त्या वेळीं व त्यांच्या पूर्वी महाराष्ट्रांतील समाज चातुर्वर्ण्यघटित होऊन पूर्ण सुयंत्र झाला होता. अशा समाजांत अहिंदु जे शक ते (हिंदु म्हणून) सामावले जाऊन, महाराष्ट्रांत ज्यांना क्षत्रिय म्हणतात, त्यांच्यांत प्रमुखत्वानें मोडले जावे, हें रजपुतस्थानांतल्याप्रमाणेंच महाराष्ट्रांतहि सर्वस्वी अशक्य आहे. तात्पर्य, महाराष्ट्रांतील मराठ्यांना शककुलोत्पन्न करून टाकण्यांत रिस्ले यांचे तर्कशास्त्र सपशेल तोंडघशी पडलें आहे.
९. अशा नाना प्रकारच्या विपरीत क्लृप्त्या इंग्रज व युरोपियन लेखकांनीं वेळोवेळीं प्रपादल्या आहेत. त्यांच्या मुळाशीं एक मनोविकृति असते. ती ही. इंग्रज, फ्रेंच, जर्मन, वगैरे पाश्चात्य समाजांत शरीरसंबंध वाटेल त्या धर्मबाह्य व लोकबाह्य समाजाशीं होत असल्यामुळें, त्या समाजांतील लोकांचें बीज व रक्त अत्यंत भेसळ झालेलें आहे. त्यामुळें होतें काय कीं, हिंदुस्थानांतील चातुर्वर्ण्यघटित समाजांतही आपल्यासारखीच रक्ताची व बीजाची खिचडी झाली असली पाहिजे, हे यद्वातद्वा सिद्ध करण्याचा मोह ह्या लोकांतील विद्वानांना साहजिक पडतो. परंतु त्यांनीं हें पक्के लक्ष्यांत ठेविलें पाहिजे कीं, हिंदुस्थानांतील जातिबद्ध लोक, शरीरसंबंध करण्याच्या कामांत बौद्धधर्म प्रचलित होण्याच्या पूर्वीपासून फार चिकित्सक आहेत. तेव्हां त्यांच्या वंशासंबंधानें बोलतांना फार जपून बोललें पाहिजे. यूरोपांतील उपमानें हिंदुस्थानाला लावण्यांत बिलकुल अर्थ नाहीं. शक, यवन, किरात, पल्हव, पुंड्र वगैरे अनार्य कुलांशीं आर्यांचा शरीरसंबंध होणें केवळ असंभाव्य आहे. उदाहरणार्थ, प्रस्तुतचा मुसुलमानांचा-अस्सल व बाट्ये-समाज घ्या. हा समाज आज कमींत कमी बाराशें वर्षे हिंदुस्थानांत वावरत आहे. परंतु, कोणी मुसुलमान शरीसंबंधानें किंवा धर्मांतरानें हिंदु झाला व तो क्षत्रियांत मोडूं लागला, असा एकहि दाखला नवसालासुद्धां मिळावयाचा नाहीं. तात्पर्य युरोपियनांचे एतद्विषयक प्रलाप निव्वळ बाष्कळ आहेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
प्रस्तावना
Chap. VI, Ethnology and Caste, pp. 306-307.
by Mr. H. S. Risley (Imperial Gazetteer of India, Vol I.)
ज्याच्या आधारावरती हिंदूंच्या शुद्ध जातीला वर सांगितलेले विद्वान् नावें ठेवीत होते व सबगोलंकार करण्यास उत्तेजन देत होते, तो सिद्धान्त flimsy self-contradictory व कवडीमोल आहे, असें सर रिस्ले म्हणतात. हे सर रिस्ले मानववंशशास्त्राचे व जातिज्ञानाचे मोठे ज्ञाते आहेत, असें हिंदुस्थानसरकार समजतें. त्या सरकारच्या आज्ञेवरून प्रसिद्ध केलेल्या ग्रंथांत रजपुतांचे शाकवंशीयत्व ज्याअर्थी अशास्त्र व असत्य ठरविलेलें आहे, त्याअर्थी तें तसें मानणें उच्छिष्ट विचार व सिद्धान्त यांवर स्वजनांच्या उरावर पाय देऊन उपजीविका करणा-या लोकांना अत्यंत अपरिहार्य आहे. बाकी धर्मनिष्ठ जे आहेत त्यांना शाकवंशजत्वाची व लंबशिरस्कत्वाची अशा दोन्हीही उपपत्त्या एकाच किंमतीच्या वाटतात. रजपूत वंशानें हिंदु आहेत, क्षत्रिय आहेत, व आर्य आहेत, हा सिद्धान्त, कितीही पोषक किंवा मारक अशा पाचकळ उपपत्या निघाल्या तत्रापि, धर्मनिष्ठांना त्रिकालाबाधित वाटत राहील, ह्यांत संशय नाहीं.
८ आतां दुस-या एका कवडीमोल दुष्ट ग्रहाचा उल्लेख करतों. तो वरच्याच्या सारखा जुना नाहीं; अगदीं अलीकडला कोराकरकरीत आहे. हा कालपर्यंत रजपूत Scythians आहेत, अशी कंडी पिकवून, अनेक अर्धवट लोकांना यानें माकडचेष्टा करावयास लावल्या. आतां रजपुतांवरची संक्रांत उठून मराठ्यांवर ती बसूं पहात आहे, नव्हे साक्षात् बसलीच आहे. आतां असें मत निघालें आहे कीं, महाराष्ट्रांतील मराठे लोक वंशानें शाक म्हणजे Scythian आहेत. सर रिस्ले म्हणतात -
Is it not conceivable that the Scythians, who first occupied the great grazing country of the Western Punjab, and then, pressed upon by later invaders and finding their progress eastwards blocked by the Indo-Aryans, turned towards the south, mingled with the Dravidian population, and became the ancestors of the Marathas? The physical type of the people of this region accords well with this theory, while the arguments derived from language and religion do not seem to conflict with it. For, after entering India, the Scythians readily adopted an Aryan language, written in the Kharosthi character, and accepted Buddhism as their religion. Their Prakrit speech would have developed into Marathi, while their Buddhistic doctrines would have been absorbed in that fusion of magic and metaphysics which has resulted in popular Hinduism. On this view the wide-raging forays of the Marathas their guerilla methods of warfare, their unscrupulous dealings with friend and foe, their genius for intrigue and their consequent failure to build up an enduring dominion, might well be regarded as inherited from their Scythian ancestors.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
प्रस्तावना
६. ग्रांट डफ् च्या बखरींतल्या तारखा, प्रसंग व तपशील प्रस्तुत खंडांतील मित्याशीं, प्रसंगांशीं व तपशिलांशीं ताडून पाहिला असतां स्थलोस्थलीं चुकीचा व विपरीत दिसेल, हें महाराष्ट्रांतील लोकांस तरी सांगण्याचे आता कारण उरलें नाहीं. रा. खरे, रा. पारसनीस व मी ह्यांनीं ही बाब आजपर्यंत इतक्या वेळा सांगितली आहे व स्वजनांनीं इतक्या वेळा ऐकिली आहे कीं तिचा पुनरुच्चार करणें ह्यापुढें केवळ कंटाळवाणे होणार आहे. ग्रांट डफ् ला ह्या देशांत आतां कोणी प्रमाण मानीत नाहींत. इंग्लिश लोक मात्र त्याला अद्याप प्रमाण म्हणून समजतात. परंतु, तो निव्वळ अज्ञानाचा प्रकार होय. निदान ह्या एका बाबींत तरी इंग्रजांच्या आपण पुढें आहोंत, ही समाधानाची गोष्ट आहे.
७. तारखा, प्रसंग व तपशील ह्यासंबंधानें ग्रांट डफ् नें ज्या चुका केल्या व जे विपरीत ग्रह उत्पन्न केले, त्याहून निराळ्या त-हेच्या विपरीत ग्रहांचा बीमोड करण्याचा काळ आतां आला आहे. हे विपरीत ग्रह जाणूनबुजून केलेले असोत किंवा अज्ञानतः केलेले असोत, त्यांमुळे पुष्कळ जाणतेसवरते लोक देखील वारंवार फसतात; मग अजाण लोक फसले तर त्यांत कांहीं नवल नाहीं. अशा एक दोन दुष्ट ग्रहांचा स्पष्टीकरणार्थ येथें उल्लेख करतों. रजपूत व जाट लोकांतील कांहीं किंवा सर्व कुळ्या अहिंदु जे शक व तुरुष्क लोक ते हिंदु बनून त्यांच्यापासून झाल्या, असा विपरीत सिद्धांत गेलीं पन्नासपाऊणशें वर्षे बहुतेक सर्व इंग्रज व युरोपियन लोक ठोकून देत. इंग्रज व युरोपियन लोक पडले चौकसपणाने सशास्त्र विवेचन करणारे, तेव्हां, त्यांचे विपरीत दिसणारेहि सिद्धांत प्रमाणवत् मानून, आपल्या इकडील कित्येक विद्वन्मन्य हवे तसे बरळावयाला लागले. हे विद्वन्मन्य आपल्या साध्याभोळ्या परंतु कुलधर्मनिष्ठ स्वजनांना असा उद्धट सवाल करू लागलें कीं, 'शहाणे हो! पूर्वी अहिंदु जे शक लोक ते हिंदु बनून जातिवंत रजपूत म्हणजे क्षत्रिय समजले जात व त्यांचे पुरोहितत्व सोंवळ्यांतलें सोवळे जें कोणी ब्राह्मण असत के करीत, अशी सशास्त्र वस्तुस्थिति आहे; तेव्हां शुद्धजातित्वाच्या गप्पा कशाला मारतां?' विद्वन्मन्यांचे हे उच्छिष्ट व निरर्गल प्रलाप धर्मनिष्ठांना कवडीमोल भासत, हें सांगावयाला नकोच. परंतु, ते कवडीमोल आहेत अशी खात्री ह्या विद्वन्मन्य लोकांची कशी व्हावी? कोण्या युरोपियन शास्त्रज्ञानें तसें सांगितल्याशिवाय त्यांच्या मूर्ख मतांचा कवडीमोलपणा त्यांना कधीं पटावयाचाच नाहीं. हें जाणून एका इंग्रज मानववंशशास्त्रज्ञाचें रजपूतवंशासंबंधानें शास्त्रविचारान्तीं आतां काय मत झालेलें आहे तें देतों. तो म्हणतो -
Of the Scythian people themselves all traces seem to have vanished, and the student who inquires what has become of them finds nothing more tangible than the modern conjecture that they are represented by the Jats and Rajputs. But the grounds for this opinion are of the flimsiest description, and consist mainly of the questionable assumption that the people who are called Jats or Jats at the present day must have something to do with the people who were known to Herodotus as Getae. Now apart from the fact that resemblances of names are often misleading-witness the Roman identification of these very Getae with the Goths- we have good historical reasons for believing that the Scythian invaders of India came from a region occupied exclusively by broad-headed races and must themselves have belonged to the type. It seems, therefore, unlikely that their descendents should be found among tribes who are essentially of the long-headed type. Still less probable is it that waves of foreign conquerors, entering India at a date when the Indo-Aryans had long been absorbed by them so completely as to take rank among their most typical representatives, while the form of their heads, the most persistent of racial distinctions, was transformed from the extreme of one type to the extreme of another without leaving any trace of transitional forms in the process. Such are the contradictions which beset the attempt to indentify the Scythian with the Jats and Rajputs.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
प्रस्तावना
१. राष्ट्राच्या सर्व त-हेच्या गतचरित्राचें कालानुक्रमिक व संगतवार स्मरण म्हणजे इतिहास. तो दोन प्रकारचा. तोंडी व लेखी. पैकीं दुस-या प्रकारच्या इतिहासाच्या तयारीकरितां साधनांचा हा दहावा खंड आहे.
२. ज्या लोकांची स्वचरित्राची स्मृति हारपली, ते लोक मृतवत् असून पहावें तेव्हां सदाच मूढावस्थेंत असल्यासारखे दिसतात. उदाहरणार्थ, हिंदुस्थानांतील भिल्ल, खोंड, कातकरी वगैरे लोक घ्या. हिंदुस्थानांत ह्या लोकांची वस्ती आपणां आर्यांच्याहि पूर्वीची आहे. तेव्हां ते ज्या मूढावस्थेंत होते त्याच अवस्थेंत सध्यांही बहुतेक आहेत. कारण, आपल्या गतचरित्राची स्मृति त्यांना नाहीं. स्मृति जाज्वल्य त-हेनें जागृत असली, म्हणजे गतचरित्राचा आढावा घेतां येतों, आढावा घेतां आला, म्हणजे आपले राष्ट्रीय गुणदोष कळूं लागतात; आणि गुणदोष कळले, म्हणजे दोषांचा बीमोड करून गुणांचा परिपोष करण्याकडे सहज प्रवृत्ति होते.
३. राष्ट्राचा इतिहास म्हणजे राष्ट्रांतील सर्व लोकांच्या संकलित चरित्राची हकीकत. ती लोकांपुढे मांडिली असतां, सर्व लोकांना समानस्मृतित्वामुळें ऐक्याची व बंधुप्रेमाची भावना होते. ती उत्कटत्वानें व्हावी, एतदर्थ, प्रस्तुत खंड प्रसिद्ध करण्याचें ग्रंथकारांच्या संमेलनानें ठरविलें.
४. ह्या खंडातील अर्धी अधिक पत्रे इंदूरचे श्री. माधवराव किबे व रा. आठल्ये ह्या दोन सद्गृहस्थांनीं पांच सहा वर्षांपूर्वी प्रसिद्ध करण्याचें मनात आणिलें होतें. परंतु व्यवसायबाहुल्यामुळें पत्रांच्या नकला करण्यापलीकडे त्यांच्या हातून प्रसिद्धीचें काम रेटेना. सबब, मूळ पत्रें व नकला घेऊन व त्यांत आणीक ब-याच पत्रांची भर घालून, प्रस्तुत खंड बनवला आहे. पैकीं पांच पन्नास पत्रें रा. आठल्ये यांनीं स्वतः मिळविलेलीं आहेत.
५. येथें पानिपतच्या प्रसंगापासून दुस-या बाजीरावाच्या अखेरीच्या पर्यंतच्या काळांतील पत्रे घेतलीं आहेत. पांच दहा पत्रें तद्नंतरचीं आहेत. त्यांचा उद्देश, सरदार घराण्यांचा -हास उत्तरोत्तर होऊन तो कोणत्या थरास पोहोचला, तें स्पष्ट करण्याचा आहे. अर्धी अधिक पत्रे वाई येथील रा. रा. नानासाहेब वैद्य यांच्या दप्तरांतील असून, बाकीची इतरत्र किरकोळ मिळविलेलीं आहेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३३०
१५४१ आषाढ शुध्द ३
(शिक्का)
इ कौलूनामा अज दिवाण ठाणे ला। रोहिडा ता। देसमुखाने व मोकदमानी व सेटे माहाजनानी व रयानी व बाजे खुमानी व बलुतानी ता। भोर ता। मा सु॥ सन इसरन अलफ बादे कौलुनामा ऐसा जे तुह्मी हुजूर येउनु मालूम केले जे ता। मजकूर गावगणा नवी लावणी अबराई व चिचा व अनार निबोणी लावणी नवी जालियास दाहा झाडासी एक झाड इनाम एक १ बाकी झाडे नव त्यास मुखापा राजवाटा एक १ प्रजवाटा दोनी २ उतार होईतो येणेप्रमाणे घेणे बराये मालुमाती खातिरेसी आणौनु आबराई व चिचा वा निबोनी व अणार दाहा झाडास इनाम एक बाकी झाडास उतार होईल तो राजहिसा एक १ प्रजहिसा दोनी २ येणे च प्रमाणे कौलु असे व मौजे कारीस कान्होजी देसमुख त्याची मोकदमी असे त्याचे वडीलानी झाडझाडोरा लाविला असे तो देसमुख मजकूरासी इनाम असे कारी खेरीज ता। मजकूर सदरहू कौलू असे कोण्हे बाबे तालुक अदेशा न करिता झाडझाडोरा किर्दी करुनु सुखे असी जे कौलू असे व खेरीज इसापती मौजे आबोडे व त्या देसमुख मजकुराचे दुबाला असे बाकी गाव ता। मजकूर येणे च रिती कौलू असे मोर्तब
तेरीख १ माहे रजब
रजबू
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३२९
*