लेखांक ३१३
श्री १६३४ ज्येष्ट वद्य ३
राजश्री जयसिंग जाधवराऊ सेनापति गोसावी यांसि
सकलगुणालंकरणअखंडितलक्षमिअलंकृत राजमान्य श्रीा हिंदुराऊ घोरपडे ममलकतमदार जोहार विनंती उपरी राजश्री पिराजी घाटगे देसाई पा। मांगल याचे ऐवजी रुपये
सरदेसमुखीकडे घेणे रद कर्ज रा। तिमाजी नाईक
८००० ८०००
७००० एकंदर देणे
१००० तकसीम पैकी देविले आहेत त्यास सरदेसमुखी आठ हजार श्री स्वामीकडे पावते करविले पाहिजेत व कर्जाचे कर्जदारास दिजे सन सलास असर मया छ १७ जमादिलावल विशेष काय लिहिणे हे वीनंती