Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३२८
श्री
रामराम
मा। आ। राजश्री कान्होजी जेधे राजश्री मुधोजी वणगोजी नाईक राम राम विनति उपरि हजरत साहेबी आह्मास मदती खा। दिलावरखान व भोसले व बाजे वजीर असे वजारतपन्हाह मदती एताती गनीम हि स्वार होउनु पैलीकडे चालिले तरी तुह्मी मदतीसी कृष्णाजी राजे तुह्मी आह्मास मेणउनु घेणे दिरंग न करणे हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३२७
श्री
रामराम
मा। अनाम कान्होजी राजे जेधे देसमुख ता। रोहिडा तरफ भोर यासि राजश्री मुधोजी वणगोजी नाईक विनति एथील क्षेम जाणउनु तुह्मी आपले क्षेम लिहिणे उपेरी कागद पाठविला सकल अभिप्राय विदित जाहाला लिहिले की रजा जालिया इसाबतीच्या कामाबदल हुजूर एउनु ह्मणउनु तरी बहुत बरवे कागद देखता च स्वार होउनु एणे एक घडीचे देर न करणे आह्मास हजरत अलमपन्हा साहेब रोहिड तरफेस नामजाद करिताती याकरिता स्वार होता वेळी जवळी असिलेस ह्मणिजे तुह्मास हाती धरून हजरतीचे बादगीस अर्ज करून इसाबती व हकलाजिमा व इनामबाब असे तुमचे दुमाला करउनु व आपणा बराबरी नामजादी घेउनु सकल अर्थ बरवा च होईल सत्वरन एइजे कोणे बाबे काही फिकीर न कीजे तुमचे जैसे मनोगत आहे तैसी सरंजामी करून रा। छ ९ जिल्हेज
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३२६
श्री
रामराम
श्री सकलगुणसंपन्य सौजन्यसिधु परोपकारमाहामेरू राजमान्य राजश्री कान्होजी नाईक देसमुख ता। भोर गोसावी यासि भालेराऊ हवालदार व नरसिगराऊ ना। किले केळंजा
विनती येथील क्षेम जाणौनु राउळे आपले क्षेम लिहिणे विसेष्य कागद पाठविला मनास आला वेलंगीचे कौलाचे लिहिले तरी बहुत बरवे कौल दिल्हा असे कोण्हेविशई अन्यथा नव्हे जैसे किले ना। मुकासा देह आहेती तैसे च वेलंगे असे दुसरा भाव नाही वेहाली व माडी वाटून गोपाजी व पोसजी यापासी दिल्हा असे मुखता सागता कळो येईल हे विनती मौजे वेलंग यास तो गाव आमचा असे यास अनसारिखे असे तरी श्री आण असे व तुह्मी हि आमचे हरएक चालउनु नेत जाणे परस्करे बरवे असेलिया बरवे च असे पोसजी व तान्हाजी सागता कळो यईल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३२५
श्री
रामराम
राजश्री कान्होजी राजे जेधे
देशमुख ता। रोहिड व भोर
.॥ श्री मसुल हजरती अखंडित लक्षुमी प्रसन परउपकारमूर्ति माहामेरु राजमान्य राजश्री गोसावी यासि स्नहअकित राजश्री साबाजी मुधोजी नाईक प्रतिपूर्वक विनंती येथील क्षेम जाणौनु अपले क्षेम लिहिती अनुज्ञा देणे विसई राउले कृपा करुनु पत्रिका पाठविली स्वरूपवाद मनास अली लिहिले की बहुत दिवस जाहाले साभालपत्र आले नाही तेणेकरुनु तुह्मास वाटते ह्मणौनु बहुत काही तपसिल लिहिले तरी ते तरफेहून माहानगरास आलो याकरिता पत्रास अतर पडले फरमन तुह्मापासी होते तुह्मा अह्मात इतका उपचार काय लिहिणे आह्मी काही तुह्मावेगळे नाही व लिहिले की पताजीपत हेजिब पाठविले हरियेकविसी दिवाणात वाकिब होउनु काम सरजाम केले पाहिजे ह्मणौनु लिहिले तरी हे लेहाव लागत नाही हे फिकीर अह्मास पुर्वीपासून आहे आता समयानसार हरवक्त जेव्हा दिवाणात जातो तेव्हा तुमचे च कामाचे आह्मास स्मरण आहे देव बरे च करील तुमचे अकीन हरी आहे बाजे बाब अवघे हवाल पंडित मशारनुलस सांगितला आहे ते लिहितील त्यावरुनु कलो येईल कृपा अखंडित असो दीजे हे विनती अपण हि काही दौलतखोईस अतर पडो ने दीजे अह्मी खत खानसाहेबास मालूम करुनु सरजाम करुनु देवउ
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३२४
श्री
वंशावळ मूळपुरुष गोपाळ प्रभूच्या पेशजी कायस्त गोत्र कृपाचार्य उपनाम दिघे पाली उर्फ आमीनाबाद येथील वतन देशमुखीचे आनाथसिध्द करीत होते त्याची स्त्री आनाबाई होती तिजला पुत्र २
→वंशावळ पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
गाट साहेब यास सागितले की याणी चाकरी फार केली आहे याजकरिता बदोबस्त द्यावा बोलले ते वेळी कोण्हाचे पोटात काय वाकडे आले न कळे माझे बोलणे कोण्ही बोलले नाहीत नतर चिटणीसानी मला आकलकोटास पाठविले तो इकडे ग्राटसाहेब गेले पुढे दादासाहेब स्वामी विठलपतबाबा वारले नतर माझा प्रवेश हि जाहाला नाही व स्वामीनी नेम हि दाहा वर्षाचा सागितला हा। सा। विनती केली नाही पुढे चिटणीस पडित सुमत याणी अकलकोटास सरकारात विनती करून पार तेथे (जाणे मुबईस गेले त्याचे फितुराचे कागद मी सरकार आज्ञेवरून धरिले) हि बड जाले ते वेळी कागद धरिले हुकूम सरकारचा आला त्याप्रमाणे चाकरी केली बडवाले याणी धरून कैद करून बेडी इत्यादि सस्कार केले हे सस्कार पेशजीचे राजकारणात हपत्याची बाकी राहिली होती ती जप्ते याणी केली तेथे चीजवस्तु लुटली गेली त्यानी इजा केली परतु दम न सोडिता पेशजी आपण राजकारणात वागलो स्वामीचे चरणप्रतापे धैर्य व सोडिता बडवाले यासी जबाब दिल्हे ते काळी जानराव शिर्के इकडे च होते असा प्रसग गुजरला हे सर्व सरकारास माहीत आहे च आणि गवताचे लिलाव बेरोजगारी भावानी घेतला असता तो च गुन्हा सिध्द होऊन मला बरतर्फी दिल्ही (व पेशजी सुध्दा या गुन्ह्यात) असो माझे वतन सोडून देऊन मजपासून महाराजानी पायापासी चाकरी घ्यावी मी संकटसमई सेवा केली परतु माझा जिर्णोध्दार जाहला नाही आकलकोट मुकामी श्रीमत राजश्री बाळासाहेब चिटणीस पडित सुमत याणी विनती पेशजीचे राजकारणाची केली त्यावेळी आज्ञा सरकारची जाहली की दुसरे यादीस याचे नाव लिहून ठेवावे ह्मणजे इनाम वगैरे मिळेल हुकूम जाहला व दाजीबा नारोळकर व कृष्णाबाई व दाजीबा उपाध्ये याची रुजुवात हि सरकारानी बळवतराव बक्षी याजकडून करून घेतली नतर चाफळ मु॥ तीथरूप मातुश्री ताईसाहेब व रगोपत दादा व चिटणीस पडित सुमत हि बोलले बदोबस्त करून देतो आज्ञा जाहली परतु मी देव हि जे काही देत नाही व कचा मजकूर हि सरकारात कळला नाही सा। ही अर्जी सरकारानी मनन करून वतन सोडून देऊन मला चरणापासी जागा देऊन चाकरी घ्यावी अकलकोटी धाकटे भावाचे लग्न जाले त्याजबद्दल कर्ज चारसे सवा चारसे जाहले आहे त्यास माझी चीजवस्तु येणे त्यापैकी तीनसे रुपये साहेबानी दिल्हे बाकी येणे ते देण्याचा हुकूम जाहला पाहिजे महा नित्य मुजर्यास येण्याची परवानगी जाहली ह्मणजे सधी पाहून वतनप्रकर्णी विनती हि करील मी चाकर सरकारसेवा करण्यास मजकडून अतर होणार नाही परतु मला ही दशा प्राप्त जाहली त्यातून काढून माझे सरक्षण करणार माहाराज समर्थ आहेत ही जिकीर सरकारास वाटेल परतु जाले राजकारण कळले पाहिजे सबब विनती लिहिली आहे हे प्रकर्ण बहुत दिवसाचे लिहिण्यात कमजास्त असल्यास माहाराजानी कृपा करावी कारण वेळेचे स्मरण बहुता दिवसामुळे राहिले नाही हाली कोण्ही माझे बोलणे बोलून बदोबस्त करून देवितील असा भरसा वाटत नाही सरकारनी च कृपा करून बदोबस्त करून दिल्यास बदोबस्त होईल नाहीपेक्षा दारिद्रयानी व्यापिले आहे तरी स्वामीनी सेवा घ्यावी सेवेसी शृत होत हे विज्ञापना मि॥ कार्तिज्ञाफ् शु॥ ९ रोज सोमवार शके १७५३
माझी सरकारात वोळख सुध्दा नाही असे जाहले आहे माझे बोलणे स्वामीपासी कोण्ही बोलून बंदोबस्त करून देविवतील असा भरंसा वाटत नाही ह्मणोन विनंती लिहिली सेवेसी शृत होय हे विज्ञप्ती
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
त्यास पत्र पाठऊन आणविले ते येण्याचे पुर्वी पेशव्याचा मोड जाला. पुणे घेतले तेव्हा तेथे राहावे तो गोखले याचा निरोप चिटणीसास आला की तुह्मी निघोन माहुलीस येणे कागदपत्र घेऊन दादासाहेब डोणज्याचे खिडीने सिहगडाखालून माझे घराकडून दम खाऊन निघोन जैतापुरास आले नतर प्रधानपत हि माहुलीस आले नतर माहाराजास वासोट्याचे किल्यावर नेणार कळले स्वामीस जैतापुराहून दादासाहेब माहुलीस आले तो माहाराजास किल्यावरून पेशव्यानी माहुलीस आणिले ते वेळी माहाराजाचे हातची हिर्याची आगठी वाहोन गमावली असे वर्तमान कळले नतर स्वामीची व माहाराजाची भेट होऊन पुढे माहुली मुकामाहून विचार करावा तो प्रसग आला नाही स्वामी जैतापुरी च होत तो चिटणीसानी मजबरोबर निरोप पुण्यास साहेबाकडे पाठविला की माहाराजास वासोट्यास नेहणार कसे करावे व हाली तह बिघाड जाहला ह्मणजे बदोबस्त करून माहाराजास राज्य द्यावे असा करार आहे या प्रसगी साहेबानी बच्याव करून माहाराजास राज्य द्यावे आज आपण कराल ते होईल बोललो ह्मणून सदरहू निरोप जैतापुरी स्वामीकडे कळवावयास मुकुदा जमेलकर याजबरोबर पाठऊन मी मला पुण्यास पाठविले मी बाळाजीपत नातुकडे गेलो सदरहू मा।र बाळाजीपतास सागितला परतु त्याणी साहेबास कळवितो बोलले बगल्यास नेहले नाही मग मी दुसरे दिवशी बडेसाहेबाकडे जाऊन परमारे भेटलो त्याणी निरोप ऐकूण खूष होऊन सागितले की आह्मी पलटणेसुधा माहुलीस येणार थोडके दिवसात बदोबस्त होईल माहाराजापासी काही सरमजामाची जमेत असली असता बहुत उपयोग होईल याची तजवीज चिटणीसास सागावी बोलले मी पुण्याहून निघून रस्त्यानी येतो तो बाळासाहेब चिटणीस माहाराज सरकारची खुणेची आगठी घेऊन बोलण्यास गेले ते निंबाच्या पारावर भेटले त्यास सविस्तर मजकूर सागितले नतर मी जातो बोलले सविस्तर मजकूर दादासाहेबास स्वामीस सागावा ह्मणजे माहाराजास कळवितील बोलले व साहेबानी विचारले की माहाराजास च नेणार किंवा आणखी कोण्हास नेणार विचारले नतर मी सागितले की माहाराजास मातुश्री माईसाहेब व आपासाहेब माहाराज व भाऊसाहेब माहाराज राणीसाहेबासुधा नेणार माहुलीस सर्वत्र आणली आहेत अशी बातमी आहे आज उद्या रात्रौ नेणार बोलून मला पाच मोहरा दिल्या त्या आणून स्वामी व चिटणीस विठलपत बाबापासी देऊन सदरहू निरोप माहाराजास विठलपत याकडून कळविला पुढे नतर महाराजसरकारास प्रधान पत घेऊन पढरीस गेले त्या सधीत माझी प्रकृती बिघडली सधीवायु होऊन पाय सुजले सा। घरास गेलो नतर बाजीराव साहेब गेले माहाराजसरकारास इग्रजबाहादूर घेऊन आले त्याकाली श्रीस्वामी व चिटणीसास विठलपतबाबास विनती केली तो स्वामीनी आज्ञा केली की हे राजकारण मोठे याजकरिता तू दाहा वर्षे फार कोणापासी बोलू नये ह्मणोन पेशजी शफत घेतली होती ती विसरलास की काय स्थिर जाहल्यावर बदोबस्त होईल बोलले नतर याजकरिता कसे करावे विचारले बदोबस्त होईल बोलले माहाराजास मुखत्यारी येर्यास पाच वर्षे पाहिजेत सागितले व पाच वर्षानतर माहाराज पाच वर्षे मुखत्यारीने वागू लागतील ते वेळी तुझा बदोबस्त होईल बोलले हे भविष्य सागितले होते च तो बडे साहेब करज्याचे बागेत आले ते काली सर्वांचे ह्मणणे पडले की आह्मी राजकारण केले तेव्हा मी पुण्यास विश्वनाथराव याजबरोबर गेलो होते तेथून मला चिटणीसानी आणविले आणि बडे साहेबापासी भेटविले ते काळी विठलपत बाबा व आमात्यपत व चिटणीस व बाळाजीपत नातू आसे होते साहेबानी विचारले की तू चाकर कोणाचा मग मी उत्तर केले की चाकर चिटणीसाचा चाकरी सरकारची केली आहे ते वेळी मी विनती केली की माझा बदोबस्त करून द्यावा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
तूर्त तुह्मास पुरा आश्रय हि तेथे कोणाचा नाही व ही मसलत सेवटास न्यावी सर्व दौलत स्वामीची च आहे ते जे करितील ते आमचे कल्याणाचे च करतील हा भरसा मला आहे सदरहू निरोप बाबापासी आला त्याणी सागितला नतर विठलपतबावनी मला बोलाऊन सदरहू आज्ञा आली ती सागून पुन्हा चार साहा घटका गेलियावर मी काय सागितले ते मला पुन्हा तुह्मी सागावे मग मी बाबानी सागितल्याप्रमाणे सागून बाबास मी बोललो की आपण मला आणखी एकवार सागावे नतर त्याणी सागितले की मी सागितल्याप्रमाणे आहे बातमी फार नाजूक जिवावरील आहे बहुत तजविजेने राहावे आणि लाहान माणसाची सगत असल्यास करू नये कारण माणूस स्नेह्यापाशी बोलले त्यात ही गोष्ट निघाली ह्मणजे घात होईल नतर मी विनती केली की येविसी आपण सहसा काळजी करू नये प्राण जरी गेला तरी बोलणार नाही हा भरवसा आपणास बोलून दाखऊ तो काय आपण काही काळजी करू नये नतर आमची खातरी जाहली आहे परतु आपण मात्र जपून राहावे काशीपताची बातमी फार आहे किल्यावरून येणाराची बातमी ठेवितात मग मला बोलले सर्व पार करणार स्वामीचे पाय आहेत माहाराज राज्य करू लागल्यावर तुझे वतन सोडून बदोबस्त करीन ह्मणोन शफत कुलस्वामीची दिल्ही नतर निरोप दिल्हा की चाफळास जाऊन सदरहू मजकूर श्रीस्वामीस व चिटणीसास सागितले ऐकून बहुत सतोष जाहला नतर पुन्हा दोन महिन्यानी मला पुण्यास पाठविले आणि साहेबास सागावे की किल्यावर पेशवे याणी महाराजास फार अडचण करितात मोठे संकटात आहेत याचा विचार काय करावा नतर साहेबास जाऊन सदरहू मा।र सागितला त्यानतर त्याणी चिठ्या पावल्याचा मा।र विचारून बोलले की बाजीराव साहेब याचा बिघाड तहप्रकर्णी पेशव्याकडून जाल्यावर माहाराजासी दोस्ती पुरी करणे किंवा कसे सागणे ते सागू बोलले नतर बोलणे निसरडे पाहून मी उत्तर केले की अशा सागण्यानी बचाव कसा होईल बदोबस्त करून देतील हा भरवसा आह्मास फार आहे नतर सागितले की बाजीराव साहेब यानी तहाचा बिघाड करण्याचा इरादा तूर्त केला आहे बिघाड लौकर च होईल सागावे फिकीर न करणे बोलून निरोप दिल्हा सदरहू निरोप स्वामीस व चिटणिसास व विठलपतबाबास कळविला नतर किल्यावर कृष्णाबाई व नारोळकर याजपासी सागून पाठविला त्याचा निरोप पुन्हा आला नाही सा। उपाध्ये व नरसू काकडे याजसमागमे सरकारास सदरहू बातमी पावती करण्यास बाबानी सागून मला परत जावे सागितले मी परत गेलो दादासाहेब बाळासाहेब व चिटणीस पुण्यात च होते तो पुढे वैशाखमासी साहेब याणी पुण्याभवता पलटणचा वेढा दिला किले वगैरे घेतात असे दादासाहेबास कळले नतर मजबरोबर साहेबास सागून पाठविले की हाली बाजीरावसाहेबाचा व आपला बिघाड आला पुढे कसे करता त्याणी सागितले की आह्मी किले वगैरे घेतले त्याची मु॥ त्याणी केली आहे तुह्मी माहाराजास कळवावे नतर मी सातारियात येऊन विठलपतबाबास सदरहू मा।र सागून किल्यावर बातमी पोचविण्यास फार अडचण आहे बाबानी सागितले दाजी नारोळकर व नरसू काकडे याजपासून युक्तीने कळवितो बोलले मी निघून पुण्यास चिटणीसाकडे स्वामीची भेटी घेऊन गेलो तो पुढे काही दिवसानी बाजीरावसाहेब याणी बिघाड करून लढाई होऊन बाजीराव साहेब सासवडास गेले त्या सधीत बाळासाहेब चिटणीस बोरगावी गेले होते
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
ती किती सागू बोलले मग साहेबास सागितले चिटणीसास आमचा सलाम सागावा आणि नातूस बोलले की तुह्मी जावे उठतेवेळेस बोलले आणि कारकून आला आहे तो येथे असू देणे तुह्मी जावे आमच्या खान्याची वेळ आहे त्याजवरून मला तेथे ठेऊन नातू गेले मग मला विचारले की काय बोलावयाचे आहे ते साग नतर चिठी पायातील सोडून मी काढून दाखविली साहेब बहुत खुष होऊन आछया किया बोलून नतर किल्याचे दरवाज्यास धरले वगैरे जाला मजकूर सागितला हा ऐकून बुकावर माझे नाव लिहून घेतले मजकूर ऐकून पाच मोहरा बक्षिस दिल्या जाणे ह्मणोन सागितले मग मी बोलिलो की मी येथे आल्याची वोळख मजपासी द्यावी बोललो नतर त्याणी इग्रजी आक्षराची चिठी लिहून दिल्ही आणि मतलब सागितला की माहाराजाची चिठी पावली आमची आता खातरी जाहली बोलले व माहाराजाची चिठी हि मागितली ती परत दिल्ही आणि नातूस चिठीचा मजकूर न सागावा त्यास भेटून जावे साहेब बोलले मग मी बोललो की त्यास सागतो की साहेबानी विचारले की स्वामी हे कोण त्यास मी सागितले की माहाराजाचे गुरु त्याणी ऐकून पादरी मात्र बोलले आणि टोपी डोईची काढून सलाम सागितला चिटणिसास हि सागितला व विठलपत कोण हे विचारले नतर मी सागितले की ते फडणीस असे बोलतो साहेबानी ही ओळख बाळाजीपतास देणे जाहल्यास द्यावी नतर बहुत खुष जाहला आणि बोलला की माहाराज सबका धणी आहेत नंतर निरोप घेऊन निघालो चिठ्या तेलात भिजऊन लाखेची गोळी पोकळ युक्तीने करून ती गोळी चुनाळात घालून खाली वर चुना बसवून मग बाळाजीपंत दादाकडे गेलो त्याणी एकीकडे नेऊन विचारिले की साहेबानी आणखी काय तुला पुसिले मग सदरहू मजकूर सागितला नतर निरोप घेऊन येत असता शिरवळचे नदीवर आलो तो तेथे शिपाई याणी आडविले वाटसरू लोकाचे झाड्याबरोबर माझा हि झाडा घेऊ लागले ते वेळेस बालाजी नातू याणी चिठी दिल्ही ती बटव्यात होती झाडा देतेवेळेस आधी जलदी करून तोडात घातली तबाखू खाल्याचा बाहाणा करून चिठी खाऊन झाला दिल्हा तेथून निघोन भिकारीयाचे सोग दाखऊन श्री माहादेवाकडून चाफळास श्रीस्वामी व दादासाहेब चिटणीस व रगोपत दादास भेटलो आणि चिट्या स्वामीपासी देऊन तेथे दोन दिवस राहिलो नतर स्वामीनी व चिटणीसानी चिठ्या ठेऊन घेऊन मला सदरहू मजकूर कळावा याकरिता राजश्री विठलपतबाबाकडे पाठविले सातारियास बाबाचे घरी सध्याकाळी येऊन भेटलो सविस्तर जाहाला मजकूर सागितला ऐकून सतोषी होऊन मला पोटासी धरले फार मेहनत केली बोलून जाला मजकूर सर्व माहाराजास कळवावा मी बोललो नतर तात्या नारोळकर व दाजीबा उपाध्ये यास बोलाऊन आणून कचा मजकूर सागून किल्यावर सरकाराकडे पाठविले नंतर त्याचे बरोबर माहाराजाची आज्ञा निरोप आला की चिटणीस वगैरे पुरातन सरकारपदरचे या समई सेवा करून दाखवावी परतु आपला बचाव करून करणे ते करावे व स्वामीस ही विनती करावी की श्रीची प्रार्थना करावी याप्रमाणे श्रीमत मातुश्री माईसाहेब व माहाराज बोलले कोबाड यासी पडला हे पेशजी केले च आसेल हाली आह्मापासी राजकारण प्रकर्णी काही कागद साधनी वगैरे होते ते कागद आह्मास आदेशा येऊन सारे खोलीस एकीकडे बसून जाळून पाणी करून टाकिले अशी अडचण आहे तरी जपून अगावर न येता सावधगिरीने जे करणे ते करावे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
ती चिठी मी सातारियात येऊन श्री मगलाईचे देवीचे दर्शनास जातो ह्मणून मजकुरी किल्यावर चौकीदारास सागून गेलो तेथे चिठी तात्या उपाध्ये नारोळकर याजपासी दिल्ही नतर माहाराजापासून सरकार चिठी त्याणी आणून मजपासी दिल्ही ती चिठी खाली येण्याबद्दल पायास कुतरे चावले असा बाहाणा करून पायास भोक पाडून जखम करून रक्त न पुसता व ता। चुना लाऊन काही झाडपाल्याची पेड पायावर बाधून ती चिठी खाली आणीत असता कासीपत बेदरशहराहून किल्यावर येता तो माझी दरवाज्यास गाठ पडली त्याणी दरवाजेवाले यास शिव्यागाळी देऊन हा गोसावी कोठून आला आणि कोठे जातो विचारून झाडा घेऊ बोलला की हा फितुरी आहे गोसावी नव्हे बोलून पाहर्यात ठेविले आणि वरत गेले तेथे जाऊन कारकून पाठऊन झाडा आणखी आपले रुबरु घेतला आसता पुन्हा घेऊन जरब जाऊन चौकसी केली नतर डोलच्या वाड्यात पाठविले तेथे हि चौकशी केली परतु काही ठिकाण लागले नाही सबब चिचेच्या फोका आणून मारतो बोलून बेडी हि आणू अशी जरब दिल्ही परतु कोणाचे नाव न घेता काही कबूल जाला नाही तो हे वर्तमान जैतापुरास राजश्री विठलपत बाबाजीस सागून पाठविले वर्तमान कळता च श्री स्वामी व चिटणीस व रगोपत दादा स्नान भोजन टाकून दोन दिवस एक जाग्यास विचार करीत बसले तो तेथे मी काहीच ठिकाण लागू न देता पाहर्यात होतो मग दुसरे दिवशी गोसावी भिकारी याजपासी काही नाही वेडा आहे ह्मणोन सोडून दिल्हे नतर मी माहुलीहून जराड्याचे डोगराकडून सध्याकाळी जैतापुरी रात्री जाऊन स्वामीस व चिटणीसास व रगोपतास भेटलो नतर स्वामीनी मला पोटासी धरून नेत्रातून पाणी आगावर टाकिले फार श्रमी सर्वत्र जाहले आणि बोलिले की आज कासीपतानी चिचेच्या फोका व बेडी वगैरे जरब देणे ती दिल्ही परतु तू कोणाचे नाव न घेता सर्वांचा बचाव केलास व माहाराजाची हातची चिठी पायाचे मणगटास बाधून आपली ही गोष्ट श्रीनी मोठी केली बर माहाराजाचे पायास तू मळ लाविला नाहीस मोठे सकटातून पार पाडिलेस नाहीपेक्षा प्राण चिटणीसानी व आह्मी व ज्याची नावे कळती त्याणी देणे आला होता विठलपंतबाबा इत्यादि तू आज वाचविलेस बोलून ये वेळेस बक्षिस तुला काय द्यावे बोलले मग मी उत्तर केले की मला वतन सचिवपताकडून घेऊन देतो ह्मणोन पेशजी वचन दिल्हे ते सोडून देण्याचे वचन आपण व चिटणीस व बाबाजी दिल्हे त्याप्रमाणे कार्य सिध्दि जाहलीयावर द्यावे नतर श्रीस्वामीनी श्रीरामाची पुजा करतेवेळी शफत वाहून तुळसी देवावरी दिल्या आणि सागितले की हे वचन आज माहाराजानी च दिल्हे असे समज हे वचन माहाराज चालवितील तुझे वतन हरप्रयत्न घेऊन देऊ बोलले व चिटणीसाकडून व बाबाकडून हि वचन रगोपत दादाचे साक्षीने देविले नतर पुण्यास बडे साहेबाकडे पाठविले बाळाजीपत नातू याजकडे जाऊन भेटले तेथे चिठीचा मजकूर कळऊ नये साहेबास मात्र कळवावा असे सागितले होते साहेबाचा चपराशी वोळखीचा पेशजीचा होता त्याजकडून आधी साहेबास सागितले की नातू गेल्यावर मागे मला ठेवावे मला मात बोलावयाची आहे सागून ठेऊन मग बाळाजीपत दादाबरोबर जाऊन गारपिरावर भेटलो आणि निरोप सांगितला की माहाराजास फार आडचण केली आहे