[ ६१७ ]
श्रीशंकर. शक १६५४ चैत्र शु॥ १
० श्री ॅ
मंगलमूर्तिचरणीं
तत्पर नारो शंकर
निरंतर.
राजश्री राऊ तेजकर्ण मंडलोई कुवर न्याहलकर्ण पा। इंदूर गोसावी यासी--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। नारो शंकर दि॥ मलारराउ होळकर व मलार गोपाळ दि॥ राजश्री राणोजी सिंदे नमस्कार. सु॥ इसन्ने सलासिन मया अलफ. ऐवज पा। मजकूर बा। खंडनी सन ११३९ पैकी रुपये ५००० मोबलग पांच हजार गु॥ गोविंद रामाजी पोहचले. हिसेबीं मंजूर असेत. जाणिजे. रा। छ २९ रमजान.
मोर्तबसुद
स०० १७८६