Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १५
श्री.
१६८५ पौष शुा १
श्री राजाराम नरपति हर्षनिधान माधवराव बलाळ मुख्य प्रधान.
दस्तक सरकार राजश्री पंत प्रधान बता कमाविसदारान व चौकीदारान व रहदारान व बाजेलोकान व जकाती महालानिहाय. सु। अर्बा सितैन मया व अलफ. राजश्री बाळाजी जनार्दन यांचे बैल सर १५० दीडसें मौजे धामणगांव, पा अकोले, येथून गल्ला कैली खंडी १५ भरोन पुणियास आणितील. त्यास आणू देणें. हांसिलाचा तगादा न लावणें, जाणिजे. छ २९ जमादिलाखर. आज्ञाप्रमाण लेखनसीमा. बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १४
श्री ( नकल )
१६८५ पौष शुा १
राजश्री रामभाऊ डफळे गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो माधवराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद. सु। अर्बा सितैन मया व अलफ. राजश्री नरसिंगराव जनार्दन धायगुडे यांस सरंजाम दिल्हा आहे. त्याचा बंदोबस्त होणें, याजकरितां मशारनिल्हेची रवानगी केली असे. त्यास, तुह्मीं त्यांस सामील होऊन विजापूरप्रांतीं त्यास महाल दिल्हे ते ठाणीं बसवून देणे. जाणिजे. छ २९ जमादिलाखर, बहुत काय लिहिणे ? लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १३
श्री (नकल)
१६८५ पौष शुद्ध १
राजश्री सोमाजी काळे गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मअलंकृत राजमान्य स्नो माधवराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद. सुा अर्बी सितैन मया व अलफ. विजापूरप्रांतीं सरंजाम राजश्री नरसिंगराव जनार्दन यांस दिल्हा आहे. त्याचा बंदोबस्त राहणें. त्यास, मशारनिल्हेस ते प्रांतीं रवाना केला असे. तरी तुह्मीं त्यास सामील होऊन, ठाणे बसवून देणें. जाणिजे. छ २९ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें ? लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३३६
श्री
सौजन्य राजमान्य राजश्री कानोजी नाईक देसमुख तपे भोर किले रोहिडा गोसावियासि त्रिंबक कान्हो हवालदार पा। वाई हर्ची दाद उपरि हजरत खान अजम साहेबाचा कौल पाठविला असे तरी तुह्मी कोणे बाबे मुलाहिजा न करिता कागद देखता च बहुत सिताबीने स्वार होऊन जमेत घेऊन एणे हे मसलत तुह्मी फते केलिया तुमचे सरफराजी असे ए विसी पहिले हि तुह्मास कागद लिहिला असे त्यावरून कळो आले असेल बहुत सिताबीने स्वार होऊन एणे एथे माणसाचे खर्चाचे हि सरजामी होईल मर्दाने खलक घेऊन एणे आह्मी तायघाटाहून हि पुढे स्वार होऊन गेलो असो बहुत सिताबीने एणे हे कि। छ ३ रजबु रोटी आह्मापासी आहे ते ऐथे आलियावरी देऊन हे कि॥
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १२
श्री.
पो १५ जिल्काद.
१६८५ भाद्रपद वद्य ८
राजश्री मोरोजी शिंदे नामजाद तालुके रत्नागिरी गो यांसिः-
अखंड़ितलक्ष्मीआलंकृत राजमान्य स्नो माधवराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद. सुा अर्बा सितैन मया व अलफ. बा देणें धर्मादाव. वो केशव भट गोखले, वास्तव्य मौजे सोमेश्वर, ता हरचिरी, यांजकडून मौजे मजकुरीं श्री सोमेश्वरास नित्य एक एकादशनी करविली. त्याबा दक्षणा साल गुा ची रु ७५ पाउणसे एक सालाची तुह्मांकडून देविले असे, तरी तालुकेमजकूरपैकी पावे तें करून, पावलियाचें कबज घेणें, जाणिजे. छ २२ रबिलावल. बहुत काय लिहिणे? लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३३५
१५७१ भाद्रपद शुध्द ११
फारसी मजकूर
अज रख्तखाने खुदायवद खान अलीशाह खा। अफजल खा। माहमदशाही खुलिदयामदौलतहू बजानेबू कारकुनानी प्रा। वाई बिदानद सु॥ खमसैन अलफ जोहरखोरे हणमतराऊ काबीज आहेत हाली मा। कान्होजी जेधे यास दिधले आहे ते खासा येऊन काबीज करितील करू देणे त्यास मुकासा मर्हामती केला आहे दुमाले करणे पा। हुजूर मोर्तब सुद
तेरीख ९ रमजान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ११
श्री.
१६८५ श्रवणैवद्य १४
राजश्री मोरोजी शिंदे तालुके रत्नागिरी गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो माधवराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद, सु। अर्बसितैन मया व अलफ. मौजे कडवाब, ता संगमेश्वर, प्रां राजापूर, हा गांव राजश्री नारो पंडित प्रतिनिधि यांचा खासगीचा गांव. तेथें मोरो गोविंद कमावीसदार पंडित मारनिलेनीं पाठविला आहे. त्यास, किल्ले प्रचीतगडचा उपसर्ग लागते. याजकरितां कमाविसदारमार यांस किल्ले भवानगडीं जागा देणें व हरएकविषीं कमाविसदारास व मौजेमास किल्ले प्रचितगडकरी यांचा उपसर्ग लागों न देणें, जाणिजे. छ २७ सफर, बहुत काय लिहिणे ? लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १०
श्री.
१६८५ श्रावण वद्य ११
पोरा श्रावण वद्य १४ मंगळवार सवाप्रहर दिवस.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री बाळकृष्ण दीक्षित स्वामीचे सेवेसीः-
विद्यार्थी कृष्णराव बल्लाळ सां नमस्कार विनंति उपरी येथील वर्तमान श्रावण वा ११ मुक्काम वरवाडी खुर्द, पो पैठण, जाणून स्वकीय लेखन केलें पाहिजे. विशेष. कृपा करून पत्र पा तें पावलें. मोंगलाई लढाई होऊन मोंगलांचा पराभव जाहल्याचा संतोष जाहला, ह्मणून विस्तारें लिहिलें. ऐसियास, सर्व आपले व देवब्राह्मणांचे आशीर्वादाचे फळ! पुढेहि जें होणं तेंही आपलेंच कृपेनें होईल. भेडालें व काठीपिंपळगावाविषयीं लिा. ऐसीयासीं प्रस्तुत गांडापुरास कोण कमावीसदार नेमिला नाहीं. त्रिंबकपंत तूर्त मोंगलांचे अमिलास धरावयाकरितां पा होते. त्याणीं त्याचें पारपत्य केलें. मार्निलेस बेलाऊं गेलें आहे. तेहि लौकरीच येतील. आणि मार्निलेसही पत्र रा बापूचे लिहून पाठविलें आहे. तें त्यास प्रविष्ट करावें. ह्मणजे ते आपले गांवास उपसर्ग लागों देणार नाहीं. श्रीमंताचहि पत्र स्वामीस आहे. त्यांत श्रीमंताच्या हातच्या वळीं आहेत. बहुत काय लिहिणें? लोभ असो दिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३३४
१५७१
फारसी मजकूर
अज रख्तखाने खोदायेवद खान आलीशान खाने अजम अफजलखान माहामदशाही खुलिदयाम दौलतहू ताहा काहानोजी जेधा बिदानद के सु॥ सन खमसैन अलफ तुमचे बाबे मशहुरुल अनाम तिमाजी पाडित व त्रियबक पडित लिहिले होते यावरून मालूम जाले तरी तुह्मापासी जे जमायत असेल ते घेउनु येणे पनास घोडियाचे सरबारगी तुह्मासी दिधले असे बरलेख पाहुनु सरजामी करू देऊ याखेरीज पाईचे खलक जे आणाल त्यासी चाकर ठेउनु व दरसाली लोक आणाल त्यासी अडिसेरी देऊ पेशजी तुमची सरफराजी केली होती हाली सरफराजी बहुत करू तुह्मी सिताब स्वार होउनु पडित मशारनुलेपासी जाणे कोण्ही बाबे शक अदेशा न करणे कौल असे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ९
श्री.
१६८५ श्रावण वद्य ९
तीर्थस्वरूप राजश्री लक्षुमणपंत दादा स्वामी वडिलांचे सेवेसीः-
अपत्यें बाबूराव विश्वनाथ वैद्य चरणावरी मस्तक ठेवून शिरसाष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील क्षेम ता श्रावण वद्य ९ पावेतों मुा वांई समस्त सुखरूप असों. यानंतर. तुह्मांकडून बहुत दिवस कागदपत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. आह्मीं रघोजी पांड्या याजबा पत्रें पाठविलीं, त्यांचे प्रतिउत्तर येत नाहीं. तर, ऐसें नसावें. सदैव पत्नीं संतोषवीत असावें. यानंतर इकडील वर्तमान तरः तीर्थरूप राजश्री नाना व मातुश्री काकी श्रीगणपतीस सेवेबद्दल आहेत. त्यास कांहीं गूण अद्याप नाहीं. सुखरूप आहेत. वरकडे मार तरः या प्रांतें दंगा जाला. त्यामुळें कोणाकडील पैसा येत नाहीं. राजकी वर्तमान तरः श्रीमंतासीं व मोंगलासीं लढाई राक्षसभुवनापासीं जाली. मोगलास बुडविला. मोंगल पळोन आवरंगाबादेस गेला आहे. त्याजपाशीं च्यार हजार फौज आहे. त्याजकडील विठ्ठल सुंदर वगैरे मातबर सरदार पांच सात असाम्या पडल्या. श्रीमंत पैठणापाशी आहेत. वरकड इकडील वर्तमान अधिकोत्तर ल्याहावे, ऐसें नाहीं. सालगुदस्त येथून हुंड्या केल्या होत्या. यमाजी कारंजकर व लक्ष्मण शेट कारंजकर यांच्या. त्यास, त्यांनी रुा येथें थोडेबहुत वारले. त्याचा हिशेब करावा लागतो. त्यास, त्यांना कोणे मित्तीस रुा पावलें ते येथें लिहिलें आलें नाहीं. तर, ते मित्ती लिहून पाठवणें. तीर्थस्वरूप राजश्री नारोपंतकाका यांचे विद्यमानचे रुा हजार, रा गंगाधर भट चिपळूणकर यांचे देणें होतें तें, आह्मीं येथे व्याजसुद्धा त्यांस प्रविष्ठ केले. तुह्मांस कळावें म्हणून लिहिलें आहे. त्या प्रांतीं कोणाकडील ऐवज येतो र्की नाहीं, हे कांहीं कळत नाहीं. तें सविस्तर लिहणें. तुमचें घरीं समस्त सुखरूप आहेत. सविस्तर वर्तमान मुखवचनें बाबू सांगतां कळों येईल. मोहरीच्या देवालयाचे काम समाप्त जाहलें. शिखरास अस्तरगिरी होत आहे. दोन तीन महिन्यांत तयार होईल. राजश्री गमाजी यमाजी यांची व नरसिंगराव पागा यांची लढाई कराडावर जाहली. गमाजीचा मोड जाहला. दांतेगडावर पळून गेला आहे. वरकड पुणेंयांत छपरें व कांहीं घरें लोक बांधत आहेत. वाईंची खंडणी लोकांनी दिल्ही. परंतु आम्हांस पैसा देणें पडला नाहीं. तुमच्या घरास खर्चास रुपये शंभर देविले आहेत. कळले पा. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असों दिजे. हे विनंति. नारो गणेश दामले यांचे हुंडीचे रुा तेथें कोणे मित्तीस पावले, हें सविस्तर मित्या लिहून पा. हे विनंति.