Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ८
श्रीशंकर
१६८५ ज्येष्ठ शुद्ध ५
श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसीः-
चरणरज मेघःशाम कृष्ण कृतानेक सां नमस्कार विनंती येथील कुशल ता ज्येष्ठ शुद्ध ५ पावेतों मुकाम पुणें सुखरूप असों. विशेष. बहुत दिवस जाले, स्वामीकडून आशीर्वादपत्र येऊन सांभाळ होत नाहीं. तरी ऐसें न करावें. सदैव आज्ञापत्र पाठवून सेवकाचा परामृश करीत असावें. यानंतरी इकडील राजकी वर्तमान तरीः श्रीमंत राजश्री पंत प्रधान मिरजेवरी आले आहेत. मिरजेस वेढा च्यार रोज बसवून, चौथे रोजीं फत्ते करून, आपलें ठाणें बसावलें, ऐसें वर्तमान आहे. सेवेसी श्रुत होय, ह्मणून लिा आहे. पुढें जें वर्तमान होईल त्याप्रमाणें सेवेसी लिा पाठऊं. वरकड वर्तमान यथास्थित असे. सर्व प्रकारें अभिमान स्वामीस आहे. बहुत काय लिहिणें ? कृपा असों दिजे. हे विनति.
हेंच पत्रीं श्रीमंत रा गोविंद दीक्षित व ती रा। रामचंद्र दीक्षित स्वामीचे सेवेसीं साष्टांग विनंति लिा परीसिजे. कृपा लोभ असों दिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३३३
१५५९ आश्विन शुध्द ८
फर्मान हुमायून शरफ सुदुर्याफत बजानेब कारकुनानी किले रोहिडा की अज सु॥ समान सलासीन अलफ दरीविला बदरगाह वालाज्याह रोशन गरदीद के कान्होजी जेधा देसाई तरफ भोर किले मजकूर मशकत कराव्या कतसीर केली नाही व पुडासी दफे केले त्यावरून अजरामराहीम पादशाहाना व फरत अवातीफ खुशरवाना मौजे तिचखलगाऊ तपे मजकूर दरवझ इनाम कान्होजी देसाई मजकूर मराहमत फर्मान देविले असे मेबायद के देहमजकूर मालूम बाद व कुल उलीह्मात दुबाला करणे बाद ऊ अवलाद व अहफाद त्यासी रवा करणे तालिक लेहून घेऊन असल फर्मान फिराऊन देणे बरहुकूम दुबाला करणे तेरीख ६ जमादिलोवल
परवाना हुजुरु अशरफ अकदस हुमान आला बा एकलासखान अलीशान सादतशान रफिअकदर बदमकान एखलासखान वजीर हुकुमत
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ७
पो छ १७ जिल्हेज,अर्बा
श्री.
१६८४ माघवद्य ९
राजश्री मोरोजी शिंदे नामजाद तालुके रत्नागिरी गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो। माधवराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद. सु। सलास सितैन मया व अलफ. विसाजी केशव मुकादम, ता फुणगुस, यांणीं हुजूर विदित केलें कीं:-मौजे डावखोल, ता मजकूर, येथील खोतीच्या वतनाचा कजिया पेशजीं मांजरेकर सांवत यांचा व आमचा लागला. त्याचा निवाडा च्यारी दिवाणांत होऊन आह्मीं खरं जाहलों. त्या प्रों कागदपत्र १ करावयास हरकी व खर्चर्वेंच जाहला. तो आमच्या भाऊबंदांनी व आह्मीं यथाविभागें पैंका देऊन आपापला विभाग खोतीचा अणभाऊं लागलों. त्या तक्षीमदारांपैकीं रामाजी नारायण मुकादम आपल्या सदरहू विभागाप्रों पैका न देतां खोतीचा उपभोग विभागाप्रमाणें करितों. त्यास पैका देवावयाची आज्ञा जाहली पाहिजे, ह्मणोन, त्यावरून, तुह्मांस हें पत्र सादर केलें असें. तरी सदरहू मजकूर मनास आणून, वाजवी त्याचे विभागास पैसा आला, तो न देतां वांटा खातो, या प्रमाणें असलियास रामजी नारायण यास ताकीद करून विभागा प्रमाणें पैका देवणें, जाणिजे. छ २२ रजब. बहुत काय लिहिणें? लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६
श्री.
१६८४ कार्तिक वद्य ४
राजश्री आपाजी पायगुंडे गोसावी यांसि:-
आशीर्वाद. सु। सलास सितैन मयावअलफ. तुमचे फौजेचा पैका पावला असतां अद्यापि येत नाहीं ! तीर्थरूप राजश्री दादासाहेंबांचे कुच नगराहून होऊन चारोळ्यास मु। आले. आम्हांस त्यांस दाहा कोसांची तफावत आहे. या प्रसंगी तुम्हीं जवळ असावें. हल्लीं पत्र लिहिलें असें. देखत आज्ञापत्र जितके लोक जवळ असतील तितक्यांनशीं जलदीनें येणें. नालबंदी घेऊन लोक गेले असतील, त्यांसहि बोलाऊं पाठवणें. तुम्हीं पत्रदर्शनीं निघोन हुजूर येणें. एक क्षणाचा दिरंग न लावणे, जाणिजें. छ १८ राखिर-लेखनसीमा.
पेशा छ १९ रा।खर, सायंकाळ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५
श्री.
१६८४ भाद्रपद वद्य ९
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री लक्षुमणपंत स्वामी गोसावी यासि:-
सेवक महादजीराम बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ता भाद्रपद वा ९ मा पुणें कुशल असों. विशेष........इकडील मजकूर तर राजश्री रामभटबावा व राजश्री बाबूराव व राजश्री रामचंद्रपंत ऐसें पुणियास आले आहेत. श्रीमंताची भेट जाहली. अद्यापि जाबसाल कांहीं नाहीं. रा। पंतसचिव यांजकडीलहि प्रकार पूर्ववतप्रमाणेंच आहे. XXX येथील मजकूर तर राजकीः- राजश्री त्रिंबकराव मामा कारभार करीत असेत. श्रीमंत राजश्री दादासाहेब नाशकास गेले आहेत. समागमें फौजे दोन हजार असे. अविंव बेदरी आहे. आधिकोत्तर लिहावें ऐसें नाहीं. यानंतरीं: तुझांकडून रा पिराजीनाईक निंबाळकर यानीं रुपये साहा हजार चैत्रमासींच देविले आणि आपण लिहिलें, गडकरी यांची वीस हजार रुपयाची रा नाईक निंबाळकर यांनी चिठी पाठवून दिल्ही. X XXXX. रा निंबाळकर याची......श्रीमंताकडे च्यार हजार फौजेनिशीं जाहली. आणि बारा लक्ष रुपये घ्यावे ऐसा करार जाहला. प्रस्तुत हालीं दोन लक्ष रुपये दिल्हे व लाख रुपयांचा सरंजाम देणार. येणेंप्रमाणें करारांत आले आहे. रा नाईक निंबाळकर दोन हजार फोजनिशीं येथें आहेत. यानंतरी र। रघोजी करांडे याजकडे ऐवज येणें. त्यास, ते प्रांतीं अनंतशेट कोलकहि गेला असे. इ.ई. इ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३३२
१५४८ आश्विन शुध्द १
फारसी मजकूर
देसमुखानी ता। रोहिडा बिदानद सु॥ सन सबा इशरैन व अलफ हुजूरून आगा हैदर ते तरफेसी बदल मसलतीस पाठविले आहेती तरी तुह्मी त्याचे ताबैन असोनु मसलतीस मदती असणे
तेरीख २९ जिल्हेज (मोर्तब)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४
पो छ १९ सफर आश्विन शु०१
श्री.
१६८४ श्रावण वद्य ७
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाबूराव कोनेर स्वामीचे सेवेसीः-
पो माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मीं पत्र यमुनापलिकडचे मुकामचें पाठविलें तें प्रविष्ट जालें. सुजातदौलाकडील वगैरे कित्तेक मजकूर लिहिला तो सविस्तर कळला, ऐशियास, तुह्मीं प्रस्तुत सुजातदौलाजवळ आहा, हें उत्तमच केलेंत. सारांश, सरकारचीं ठाणीं गेलीं आहेत तीं हस्तगत...... ऊन, राजेरजवाडे वगैरे संस्थानिक यांस साहित्यपत्र व तुमच्या पत्राचे समर्पक उत्तरहि पाठविलें जाईल. जाणिजे, छ २१ मोहरम, सु। सल्लास सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३
श्रीलक्ष्मीव्यंकटेश.
१६८३ फाल्गुन शुा ४
कर्जरोखा शके १६८३ वृशानाम छंवछरे फाल्गुन शुध पंचमी ते दिणीं खत लिखीते धनका नाम रा बाबूराव विश्वनाथ यासीं रिणको नाम साबाजी भोसले, सुा इसन्ने सितैन मया व अलफं, ऐसाजे. आत्मकार्यास कर्ज घेतले मुद्दल रुपये ९५० अक्षरीं नवसें पन्नास. यासीं व्याज दर सद्दे २ दुहोत्रा प्रा देऊन. हे रुपये दीढा महिन्यांनी देऊन, रु। जाल्हन्यांत देऊन; अगर जाल्हन्याची हुंडणावळ देऊन. ता। छ ३ माहे शाबान. रोखा लिहिला. सही. मोर्तबसूद.
सदरहू उगणी धनी महादजी कृष्ण काणे. मुदतीं न दिले तर आपण खुद्द देऊं, यजमानाप्रों देऊन, दोन महिन्यानें देऊन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३३१
१५४६ कार्तिक शुध्द १४
अज रख्तखाने खु॥ मा। शर्क मा। अबर खुलीदयामदौलतहू बजानेबू कारकूनानी ता। रोहिडा बिदानद सु॥ खमस इशरैन अलफ हेजिब देसमूख तरफ भोर ता। मजकूर हुजूर मालूम केले जे तरफ मजकुरीच्या देसमुखास इसाहती मौजे अबोड व इनामती व हकलाजिमा व देसकुलकर्नी यासि इनाम व हकलाजिमा व मोकदमास इनाम व हकलाजिमा गहदम सालाबाद पिढी दर पिढी कारकिर्दी दर कारकिर्दी भोगवटा तसुरफाती चालिले आहे व पेसजी साहेबाचे कारकिर्दीस चालिले आहे खु॥ आहे हाली कारकुनु ताजे खु॥चा उजूर करिताती खुर्दखत होव ह्मणौनु तू मालूम केले तरी देसमुखासी इसाहती मोजे अबाडे व इनामती व हकलाजिमा व देसकुलकर्नी यासि इनामती व हकलाजिमा व मोकदम गावगना यासि इनामती व हकलाजिमा गहदम सालाबाद पिढी दर पिढी कारकिर्दी दरकारकिर्दी व पेसजी खुर्दखत रा। इजानेबू ता। इसने भोगवटा तसुरफाती जैसे चालिले असेली तैसे चालविजे तालिक घेउनु असली फिराउनु दीजे मो।
रुजू सुरनिवीस
तेरीख १२ माहे मोहरम
मोहरमु सुरु सुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २
श्री.
१६८३ पौष शुद्ध १०
वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिवदीक्षित स्वामीचे सेवेसीः-
विद्यार्थी माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. निजामअल्लीखान यासी लढाई होत असतां जेर होऊन, त्यांणी सल्याचा संदर्भ लाविला. तेव्हां, नबाब मोगलअल्ली व राजश्री रामचंद्र जाधवराव तिकडून फुटोन आले. त्याची जागीर चाळीस लक्षाची निजामअल्लीखान याजपासून घेऊन सला केला. ते-विसीचें वर्तमान राजश्री स्वामीस सविस्तर विनंतिपत्र लिहिलें आहे. पत्रे प्रविष्ट करावें. जाणिजे. छ ९ जमादिलाखर १ बहुतकाय लिहिणे ? हे विनंति.