पत्रांक ४६७
श्री ( नकले ) १७१९ भाद्रपद शुद २
राजश्री दारकोजी बाबळे गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रो दौलतराव शिंदे रामराम विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. पो नेमावर पंचमहालपैकी काटाफोडा व सत्वास व पाणीबिडवाचे गांव वजा करून पो मा।र व तो राजोर व तो हरणगांव येथील फडणिशीची आसामी, राजश्री आपाजी मुधाजी कुळकर्णी श्रीगोंदेकर यांचे पुत्र खर्ड्याचे लढाईत जखमा लागोन मत्यु पावले, ऐसें जाणून दरखी असामीची नेमणूक सालीना बारमाही वेतन रुपये ३०० एकूण तीनसें सालमजकुरापासोन देऊन ही सनद तुह्मांस सादर केली असे. तरी मा।रनिल्हेचे हातें दप्तरचें कामकाज घेत जाऊन सदरहू तीनसें रुपये सालमा।रापासून सालदरसाल वर्षपरंपरा पाववीत जाणें. पट्यापैकीं मजरा पडतील. शिवाय जमीन बिघे सुमारी ६० साठ इनामी व गावगनां भेटी परभारें देवीत जाऊन, फडणिशीचा कानूकायदा चालवीत जाणें, ही सनद मा।रनिलेस वहिवाटीस द्यावी. रवाना छ १ माहे रोवल सु।। समान तिसैन मया व अलफ, बहुत काय
लिहिणें ? हे विनंती. मोर्तबसुद.