पत्रांक ४६५
श्री ( मसूदा ) १७१९ वैशाख शुद्ध १५
कर्जरोखा शके १७१९ पिंगल नाम संवत्सरे वैशाख शु।। १५ ते दिवशी खत लिखिते धनकोनाम राजश्री बाळाजी जनार्दन फडणीस यांसीं रिणकोनाम रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा, मु।। पुणें, आत्मकार्यालागीं पर्वतसंबंधें मुद्दल घेतले रु ३००००० तीन लक्ष चांदवड छापी सुलाखी. यांस व्याज दरमहा दरशेहे रु।। १ एकोत्राप्रमाणें बिनसुट. मार्गशीर्ष वद्य १ या मुदतीस मुद्दल व्याजसुद्धां, ऐवज चांदवड, पुणें याचें मुकामीं देऊं. हा रोखा लिहून दिल्हा, सर्व हस्ताक्षर खुद्द.
साक्ष.
१ नारायणराव वैद्य. १ गोविंदराव पिंगळे.
१ श्रीधर लक्ष्मण. १ कृष्णराव माधव.