Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४३७
श्रीरामजी. १७१८ माघ शु।। ५
( जयपूर प्रकरणीं पत्रें. राजा यास सरकारचे. )
अपरंच. कागद आयो. समाचार मालुम हुये. हमेषा पत्र लिषायके संतोष करजो. ओर समाचार रावसंभुसिंघजीके कागदका जवाब राजश्री रायाजी पटेलने दीया हे, तीसपरसें जाणजो.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १८ १५८९
तकरीरकर्दे बे॥ मल्हार बाबाजी व तिमाजी मल्हार व त्रिंबक गोमदेऊ व रामाजी बाबाजी देसपांडिये प॥ सुपे सु॥ समान सितैन अलफ तकरीर केली ऐसी जे सामराम काटे व सभाजी काटे देसमुख व मोकदम क॥ सुपे हरदोजण कसबाचे मोहर + + दर भांडो लागले हरदोजण काजी व देसपांडिये याचे गोहीवेरी राजी जाले राजीनामे लेहोनु दिधलेयावरी आपणास सफत घालून पुसिले तरी मलिकाचे कारकीर्दीस याकूदखान यासी जागीर जाली ते वख्ती देसमुखी काटियानी घेतली यावेरी मंबाजीराजेयाचे कारकीर्दीस मोहर जाली आहे यावेरी असतखानाचे + + + + + + + देसमुखी घेतली दीढ दोन वरिसे देसमुखी कसबेकरी केली त्यावेरी मागते काटे हुजूर जाउनु देसमुखी करू लागले यावेरी शाहाजी राजे व सीवाजी राजे जागीरदार जाले तीन च्यारी वरसामधे मोहर केली असे हे लिहिले सही
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४३६
१७१८ माघ शु।। ५
(संभुसिंगजीस सरकारचे.)
अपरंच. कागद तुह्मारा आया. समाचार मालुय हुये. दोनो दरबारका वेव्हार सुदामतसें चला आया तिसी त-हे जाणो. दुसरी बात नही. ओर समाचार राजश्री रायाजी पटेलके कागदपरसें जाणजो.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४३५
१७६८ माघ शु।। ५
(पाटील यांचें पत्र संभुसिंघास.
अपरंच ( राजश्री बालुबातात्याके नामे )
कागद पठायो सो पोंहचा. समाचार वाचा. तीसपर दोने दरबारका बेव्हार सुदामतसे चला आया तिशीमाफक चला जाय, यही मंजूर हे. छडी फोजमे सरदारासुंवा करनेल डिभइएमार्फत करार ठेहेरे तिसमुजब अमलमे आयेसें बेव्हारकी वृध्धी जाणोगे. श्रीमंत पेसवासाहेबकी दोलतका बंदोबस्त हुवा. सवारी हिंदुस्थानमे जलदीही आवेगी. हमेषा कागद लिषते रहोगे.
इहा सरकार ते लिषो आयो तीसमुजव इहाकी पुषताई हे. ओर राजदरबारसूभी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४३४
( कासिराज.) १७१८ माघ शुद्ध ५
अपरंच. राजके तरफसे येक पत्र आगे. दुसरा हाल योंकर दोनोही पत्र आये, सो पोहोचेके समाचार मालुम हुये. अंत:करणसे मिलाफकी उमेद हे. सों श्रीमंत राजश्री पंतप्रधान गादीपर कायम होयके श्री महाराज नृपती के तरफसें षिलत इनायत हूये. अब बिचार हिंदुस्थानहीके अवनेका हे. वस्त्र पटायेसो राय-ब्रिजलालकी मारफत पोंहोचे. हमेसां पत्र भेजकें संतोष करोगें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४३३
श्रीरामजी १७१८ माघ शुद्ध ५
अपरंच. पाती आई. समाचार मालूम हुये. श्रीमंत रा। पंतप्रधानकै नामे दुये षलीता पठये सो मुबमुहजुरमे गुजोरो करि, लिषेमुजब हकीकत अलीबाहादुरबाबत मुफसल जुबानीतें जाहर कीवी. श्रीमंत राजश्री रावसवाईबाजीराव पेसवाईभरेके गादीपे कायम होई. श्रीमन्महाराज नृपतीकी तरफसे षिलत इनायत हुये. अब तमान सलतनतको बंदोबस्त जलदीही आठचारि दिनमे होतुहे. राजके लिषेमुजब सिरकारमाहें रदबदल करि बंदोबस्तको जुबाब–सवाल लिषवेमे आई, तौ पातसाइभरेमे राजको दषिनको सुबा करिजाने हें. सो बाहीमुजब दोइतरफसु बेव्हारु चलो जातु हे. सुदामतसुं घरोबो इकलासु चलो आऊत है, तामे दुसरी बात न्ही जानवी. आर समचार कँबर बिक्रमके लिषेते जानिवेमे आई है. सिरकारी माहालमाहें छेडाछेडी न्ही करोगा. छ ४ साबान, सबा तिसेन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४३२
श्रीरामजी. १७१८ माघ शुद्ध ५
अपरंच. राजश्री पंडत बालुवा–तांत्याके नामका कागद पठायो सो पोंहोचा. समाचार मालुम हुवा. तीसपर दोनो दरबारका वेव्हार सुदामतसुं चलो आयो, तीणीमाफक चलो जायया, ई मुनासबहे. छडी फोजमा हे सीरदांरांसुं वाकर्नेल डीभाईकी मारफत करार ठेरनेमें आयो, सो उणाको लिषते सरिकारहें आयो, जींसिवाय दुसरी बात न्ही. राजदरबारसुं करार ठेहे-यां मुजब पुषताई रीयामें दो वुत्रफकी दुरुसताई जानोगा. हिंदुस्थानकी मुषत्यारी सीरकारसुं पंडत राजश्री जगुबाबापूकी त्रपू हे उणा हे पन सरकारसुं लीष रेहे. सारोज वाप उणासुं करोला. श्रीमंत राजश्री पेसवासाहिब की सिरकारको सारीत्रहे बंदोवस्त हुवो, अब हजुरसुं सीकहुयापर सवारी हिंदुस्थान-माहे जलदी हि आवेगी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४३१
श्री १७१८ माघ शुद्ध ४
सेवेसी सा। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ता। माघ शु।। ४ जाणोन स्वकीय कुशल लिहीत गेलें पा। विशेष. राजश्री नारोपंत आवटी यांचा कारकून धरोन किल्यास नेला, ह्मणोन वर्तमान राजश्री चिंतो वामन देशमुखचे घरीं मशारनिल्हेकडील कारकून याणी सांगितलें. त्यावरोन देशमुखांनीं सांगितले कीं, दोही किल्ल्यांचा सरंजाम जप्त करावा, मागोन सनदहि देतों. याप्रों उत्तर झालें. त्यावरोन आवटी याजकडील कारकून यांणीं कोपरगांवास आवटी यांस लिहून पाठविलें. व रायगड वगैरे किल्ले येथील सिबंदी दोन हजार आणावयाकरितां जासूद पो. हें वर्तमान आह्मांस कळलें. त्यावरोन आपणांस लिहिलें आहे. तरी, मारनिलेचा कारकून धरून न्यावयास कांहीं समंध दिसत नाहीं की, कलीचें आकसांमुळें धरोन नेला असल्यास चिजबस्ताची पावती घेऊन कारकून यास सोडून द्यावें. यांतील कारण ह्मणाल तरी, आवटे यांची भीड यजमानांस किती आहे व अगत्य किती आहे, हें आपल्या ध्यानांतच आहे. त्याहीमधीं मशारनिले गैरसंधी कटकट करितात, हेंहि नाहीं. सरकार-सनदे-वरोन जें करणें ते करतात. त्यापक्षीं तुमचे आच्यारास दोष येईल. आपला पक्ष कमी आणी सारे कारभारी पाणी घेऊन उभेच आहेत. याजकरितां आपणास जें करणें तें सरकारांत विनंति करोन करावें, हें चांगलें. चुरस वाढऊन, कलागत केली असतां, यश येईल, असें कोणाचे विचारास येत नाहीं. येविसी राजश्री माहादाजीपंतांनी कच्चा मा।र लिहिला आहे. त्यावरोन ध्यानास येईल. सारांश, पुर्ता विचार चित्तांत आणोन, चांगले दिसेल तें करावें. गडकरी यांजकडे रा। यसोबा कळके याचा ऐवज यावयाचा, त्यांची यादी पूर्वी पो आहे, त्याप्रों रु।। पाठवून द्यावे. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४३०
॥ श्री ॥ १७१८ माघ शुद्ध २
यादी विनंति बहुलचंद जाट जोतिसी वास्तव्य पो राजकड याची. पोंमजकुरीं आमचें वर्षासन रु।। ९० नवद आहे. येविसीची सनदहि आह्माजवळ आहे. त्याप्रमाणें वर्षासन आह्मी आपलें पावीत अस्तो. आतां सालगुदस्तां रा। प्रतापसिंग याणीं एक साला रु।। नवद दिल्हे नाहींत. म्हणून ताकिदपत्र दिल्हे पाहिजे कीं, भटजी मजकूर याचे वर्षासनाचे रु।। पूर्वपासोन चालत आले आहेत त्याप्रा हाली सालगुदस्ताचे राहिले ते भटजी मजकूर याचे यास देणें. फिरोन येविसीचा बोभाट येऊं न देणें. म्हणून पत्र.
सदरहू विप्राकडे पैके द्यावे. छ १ साबान, सबा तिसैन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४२९
श्री १७१८ पौष वद्य ३०
यादी रघुनाथपंत आसरवाले यांस पत्र जेः--पायागडचे पोतनीसाच्या आसामीचे वेतनाविसी बलवंतराव महादेव यास तगादा करितां ह्मणोन हुजूर विदित जाहलें. त्यास, तेथील वेवाट रघुनाथ रागचंद्र यांच्या हातें होत आली आहे. ते येथें येणार आहेत. ते आल्यावर फडशा करून देतील. आसामीच्या ऐवजाविसीं बलवंतराव महादेव यास तगादा न करावा. ह्मणोन पत्र १
सदर्हूअन्वयें ताकीद द्यावी. छ २८ रजब, सबा तीसैन.