पत्रांक ४६८
श्रीलक्ष्मीकांत. १७१९ भाद्रपद शुद्ध ७
आज्ञापत्र सेनाधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा ता।मोकदम मौजे वांयगांव पा धुगांव प्रांत वराड, सु।। समान तिसैन मया व अल्लफ, सन १२०७ मौजे मजकूर हा गांव सन मजकूरचे अवल सालापासोन सरकार हिस्सा राजश्री नारायण बाबूराव वैद्य यांसी इनाम दिल्हा असे. तरी मशारनिलेसीं रुजू होऊन सरकारहिश्शाची अंमल देणें. जाणिजे. छ ६ माहे रो।।वल मोर्तबसूद, बार.