ज्यांणी जमिनीची सनद घेतली असेल त्यास निमेप्रमाणे द्यावी. कलम १.
ज्याणीं गांव मुकासे द्यावयाच्या सनदा आणिल्या त्याचा प्रकार. ज्यास गांवसेर सारिखे असतील त्यासच द्यावे. वरकडास ऐवज मात्र द्यावा. कार्यभाग जाणून. कलम १.
खारापाटण महालांतील चौकशी मनास आणितां इदलशहाचे फरमान व थोरले शिवाजी महाराज यांचीं पत्रें भोगवटियासीं घेऊन वतनदार ह्मणवीत होते त्यांची दरखोरी करितां-
१ रामाजी हरी कुलकर्णी पोंभुर्ले यांच्या वडिलांनीं खारेपाटण महालचीं देसगतचीं राजपत्रें व फर्मान घेतलें; परंतु याचा भोगवटा अव्याहत नाहीं. वर्षे तूट जहालीं. सबब पत्रें खोटीं. कलम १
जबानीई सुबाजी बिन हुसनजी नीll मुखरी दाखल मुखरी मुकादम याचे नकल जाहले. त्यास वर्षे ६२ बासष्ट झाली. इतकेत भालेराई जाहाली. तेव्हां कोणी वतनदार गांवीं नाहीत जो भेटेल तोच वतनदार ह्मणून मारीत आणावे वसूल घेत. रोखा पोखा कौल करार त्याच्याच नावचा वतनदाराचा उजूर नाहीं ते समयीं दादन मुखरीच्या निसबतीने सेवा केली.
ते वेळचीं पत्रे.
माझे नांवची आहेत ऐशी हे राजगत भोगली आहे. पत्रे रूप करणार धणी समर्थ आहेत पत्रें भोगवटीटी. मी वतनदार नव्हे, परंतु मुखरीचा ऐसा ह्मणवीत आलों आहे याबा। हे सुबाजी व मुखरीचा गुमस्ता ह्मणोन पत्र करून दिल्हे आहे. कलम १
थोर कार्य असल्यास रु।। १६, नजर पातशाह १०, मुनसी ३, अर्जबेग ३
याप्रमाणें फरमाचा बंद शिवशाईंत जाहला आहे. कलम १.