लेखांक २६ १६१४ भाद्रपद वद्य ७
(फारसी मजकूर)
ता। मोकदमानि व रयानि मौजे सिरसोफळ प॥ सुपे सा। जुनर सुबे खजस्तेबुनियाद सु॥ सन ११०२ बिदानद की सुरो मायदेऊ जपे यासि दुमाले दरवजा करून दिल्हा ऐसा जे मौजेमजकूरचे कुलकर्ण व जोतिस अष्टाधिकार याबदल माहादाजी रखमागदाचे वडील कोनेर कृस्ण व परसो विस्वनाथ ठोबरा पेसजी अमल शाहाजी भोसले अदलशाही हरदोजण भांडत होते ऐसियासि दिव हरदोजणी केले त्यास हरदोजणाचा दिवी निवाडा जाला नाही ह्मणौऊन कुलकर्ण व जोतीस अमानत करून देसपांडियाचा गुमास्ता चालवीत होता ऐसियासि ज्याहापन्हा कबलेगाही अहमदनगरास आले ते वख्ती सुरो मजकूर खानवालाशान फकरुदीखान फौजदार थानेमजकुरास आले होते त्याजपासी उभा राहिला की आपले वतन आहे त्याजवर फकरुदीखानाचे अमली सुरोमजकुरास महजर करून दिल्हा त्यास मौजे मजकूर सन -------------- मधे वसाती जाले ऐसियासि थानेमजकुरास खानवालाशान पाहाडखान फौजदार आले त्यास सुरोमजकूर उभा राहिला त्यावर खंडोजी व मेऊजी व अंबाजी आटोळे गौंड मोकदम मजकूर यानी अर्ज केला की माहादाजी रखमागद व विसाजी परसराम ठोंबरा हे पेसजी भाडत होते इ. इ. इ. छ २० मोहरम सन ३६ जुलूसवाला