Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४४४
श्री १७१८ फाल्गुन वद्य ५
सरकारचें पत्र राजश्री जगन्नाथराम यासी जेः पेशजी इकडे कारभारी कैद केले. त्या आवईमुळें राजश्री लक्ष्मण अनंत फौजेंतून निघून ब्रह्मवर्ती गेले. त्यास, त्याजकडे सरकारचा पैसा कांहींच नाहीं. हाली सरकारांतून त्याची खातरजमा करून आणविले आहेत. त्यांस, पहिलेप्रमाणें कामकाज तुह्मी ते मिळोन करित होतां, त्याप्रो ते लस्करांत आले ह्मणजे करीत जावें. सरकारचीं पत्रें त्यांस पोहचलीं, म्हणजे मा।र्निले लस्करांत यावयाचा उद्योग करतीलच. त्यांस, पुढें तुह्मी जाऊन घेऊन यावें. आग-याचा किला त्याजकडे पाहिला होता. त्याचा बंदोबस्त त्याचा ते राखतील, सरकारांत त्याजविसीची खातरजमा आहे. तेथील हिंदुस्थानचा बंदोबस्त पूर्ववतप्रमाणें तुह्मी व त्यांणीं मिळोन करित जावा. ते लस्करांत आल्यावर आग-याच्या सनदा त्यांचे नांवें पाठवितों. तवपर्यंत किल्याची घालमेल तुह्मी न करावी. ते आल्यावर बंदोबस्त करतील, म्हणोन पत्र.
परवानगी समक्ष कृष्णाजी व धोंडीबा जामदार. छ १७ रमजान, सन सवा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४४३
॥ श्रीरामजी ॥ १७१८ आश्वीन वा ७
सीताराम जी
सिधि श्रीमाहाराजाधिराज अलीजाह माहाराजा श्रीसूबेदार दोलतीरावजी सीदे जोग्य. लिषतं. माहाराजाधिराज माहाराजा श्री सवाई प्रतापसिंहजीकेन श्री बंच्या, ऐंठाका समाचार श्री जीकी कृपासूं भला छें. राज्यकी सदा भला चाहिज्ये. अपरंच. कागद-समाचार आयां. घणां दिन हुबा सो लिषावो कराजो. ओर समाचार राव स्यंभूसिंघजीका लिष्यांसूं जाणालो. मिती काती बदि ७ संवत १८५३.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४४२
॥ श्री ॥ १७१८ फाल्गुन वद्य ६
श्रीमंत महाराजैधिराज माहाराजै आलीजाह दौलतरावजी सिंदे बहादुर साहेबजी योग्यः--
माहाराज चेतसिंह-बहादुरका आसिर्वाद. अपरंच. कृपापत्र दरजवाव पत्रके पौंहचा. अत्यंत षुशी व सरफराजी हासिल हुई. इहांकी सूरत आपने करजदारी व जेरवारी अहवाल कहाँ तक विनंती करै-वकत मुलाजमतके विनती करेंगे. इन दिनौमो फौज सरकार की दतीआसें अकबराबादको गई, सो जो सरकारसै जागीर इनायत भई है उसी रस्ते गई. गांव पायमाल हुए जिरात समेत. सो सरकारमो विनतीपत्र यह भेजाहै. माहाराजका भरोसा हमको सब सूरतसै है. मिती चैत्र वद ६ संवत १८५३ * बहुत का लीखै. आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४४१
श्री. १७१८ माघ-फाल्गुन.
विशेष खबर, जमाशाहाची फौज लाहोरास आल्याची खबर आल्यामुळें तुह्मीं तावार लि।।. त्यास, सिखाची जमीयेत पहिल्यापासून भारी. व मुलूक सिखा-खालीं. तो येकदांच सोडून देऊन मार्ग देतील हें कसें घडेल ? गरमीचे दिवस जवळ आले. त्यापक्षी दिल्लीप्रांतें येऊन माघारें जाणेंयास बहूत कठीण. तेव्हां दिवस राहिले नाहीत, हाही आंदेशा आहे. दिल्लीप्रांतीं छावणी करी, तर वांचेल कसा ? ज्या गोष्टी मागें कधीं घडल्या नाहींत, तेव्हां आतां तर दुरोपास्थ आहेत. सबब कीं, तीस-पस्तीस पलटण आपलें व फौज व इंग्रज-नवाब-सुधा अनकूळ आपल्यास करून घेतात. हें पेशजी पामर साहेबासी तुह्मासी बोलणें जालेंच होतें. त्याचा मुलूक व जागा व दौलतीची रयासत, त्यापक्षीं त्यास काळजी कमी नाहीं. आपण मोह-यावरी. यामुळें तेच तुमची खातरजमा करून अनकूल होतील. तेव्हां, आपण घाबरे होऊन त्याच्या गळा पडूं लागल्यानें सुबिकी दिसेल, याचा अंदेशा तुह्मी करून बोलणें व्यर्थ व लिहिणें तें समजून बोलावें. खानासहि दिल्लीप्रांतीं सालमजकुरीं येतो ऐसेंच नजरेस आल्यास पकेपणें लिहिणें. तेव्हां श्रीमंताच्या कानावरी घालून पोख्तच पैरवी केली जाईल. तुम्हाकडील फौजेची तारंबल आहे, त्याची खर्चाची तजवीज करणें ते करणियांत येते. असें हाली पामरसाहेबास पत्र लिहिलें आहे. प्रविष्ट करून, उत्तर घेऊन पाठवावें. त्याचा आपला सरंजाम येकत्र होऊन मसलतीस पोहचल्यावरी, शाहाचा तो मजकूर किती आहे ? असो. येथील मोहिमेचें काम आटोपत आलें आहे. चिंता नाहीं. दुसरेः- यशवंतराव सिंदेयाविसी तुमच्या लिहिणेंयांत येतें कीं, अखेरसालपर्यंत त्याजकडे सालजाब असावा. ऐसियास, तुह्मास एकदोन वेळां पेशजी लि।। होतें कीं त्याजकडून पातशाहाची रजावंदी होत नाहीं. त्याच्या घरांत बंदोबस्त नाहीं. पैका तुह्मी घेतला असेल तर कर्ज घेतलें असेल, पातशाही खर्चाचे नेमणूकेतून यैवज घेऊन, पातशाहाच्या खर्चात कमती पडून, फायेदा व्हावा ऐसें तर केलेंच नसेल, त्यापक्षीं पातशाहास हैराण करणें ठीक नाहीं. यास्तव हुजूर बंदोबस्त करून, तुह्मास पत्रें लि।। आहेत. त्याअन्वयें येशवंतराव सिंदे यास तुह्मी ताकीद करून, येथील बंदोबस्त करून दिल्ह्याप्रमाणें खुलासा करून देवणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २१ १६०९ वैशाख
तुमार वासिलाती अमल खालेसे शरीफे प॥ सुपे स॥ जुनर सुबे औरंगाबाद उरुफ दखन सु॥ सन १०९६ तहसील व तहवेल बमारुफाती सेखमहमद बकर दिवाण प॥ मजकूर इ॥ छ माहे त॥ छ माहे अखैर साल मो। वसूल रुपये ६५५७॥.
द॥ देसपांडिये
पा। मजकूर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २० १६०८ ज्येष्ठ शुध्द १
दा। बे मोकदम मौजे पणदरे पा। सुपे सु॥ सन हजार १०९५ कारणे साहेबांचे बादगीस कतबा लेहून दिल्हा ऐसा जे आपणावर साहेबाची बाकी रु॥ १८ राहिले आहेत ते आपण रोजा ८ देऊन हे लिहिले सही छ २९ जमादिलाखरी पाठउनु देउनु हे लिहिले सही
निशाणी नांगर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४४०
श्रीशंकर. १७१८ माघ वद्य ११
यादी येणेंप्रो पत्रें द्यावीं.
१ हवेली उज्यन येथील कमावीसदार यांसि पत्र द्यावें कीं मौजे आजनोडी हा गांव राजेश्री राघो नीळकंठ याजकडे आहे. त्यास, तुह्मी घासलकडीविसी वगैरे उपद्रव देतां, ह्मणोन कळलें. त्यास, याचे गांवास घासलकडीविसी वगैरे उपद्रव न देणें. याचा हरयेकविसी मौर करीत जाणें. येणेंप्रों पत्र.
१ राजेश्री आंबाजी इंगले यांसि पत्र द्यावें की, प्रे।। मुराबाद येथील फडनिसीची आसामी राजेश्री सदासीव आपाजी याची आहे. त्यासि, सालमारीम दीकत करितां, ह्मणोन कळलें. त्यास, याचे आसामीविसी दिकत न करणें, पेशजीप्रें।। चालत आली आहे त्याजप्रों चालवणें. येणेंप्रों पत्र द्यावें.
------
२
( * सदरहू अन्वयें दोन ताकीदपत्रें द्यावीं. छ २४ साबान, सबा तिसैन.)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४३९
श्री १७१८ माघ वद्य ५
दत्तक सरकार राजश्री दौलतराव शिंदे ता। कमासदारान व ठाणेदारान व चौकीदारान व
रहदारान व बाजेलोकान व जमायेत मा सु।। सबातीसैन मया व अल्लफ, राजश्री रामजी पाटील सिंदे यांजकडील माणसें पो नेवासें येथून तेल तूप वगैरे सरंजाम, उंट नफर साहा भरून खेपा दोन लष्करत आणतील. त्यांस मार्गी हसिलांविसीं मुजाहीम न होतां, रात्रीं चौकी पहारा देऊन, आपलाली हद्दपार करून देत जाणें. जाणिजे. ४. साबान, मोर्तबसूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १९ १५९१ ज्येष्ठ वद्य १३
श्रीसके १५९१ सोम नाम सवछरे जेस्ट वदि त्रोदसी वार मंगळवार तदिवसी धनको नाम असकर्णजी साहूकार यास रिणको नाम तिमाजी मल्हार व त्रिंबक गोमदेऊ देसपाडिये प॥ सुपे सु॥ सबैन अलफ आत्मसुखे परवतसमधे घेतले रु॥ ५० पनास यास कलतर दर माहे दर सदे रु॥ ६ सा प्रमाणे मुदल व कलतर साहा देसी परदेसी देउनु हे लिहिले सही छ २४ मोहरम
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४३८
श्री. १७१८ माघ शु।। ६
यादी आन्याबा जाधव यास पत्र रघुनाथराव नेरलेकर साळोंखे याचे कामाविसीं.
मौजे नेरले प्रां। कराड हा गांव सदहू रघुनाथराव --------------------------------
याचे पाटीलकीचा आहे. तेथें श्रीमंत पंतप्रधान याचा अंमल बाबती वगैरे.
१२०० देशमुखी व सरदेशमुखी.
५०० इनाम जमिनीबाबत.
-------
१७००
येकूण सत्रासे रुपये सालीना अंमल आहे. तो ऐवज सरकारांतून आपल्या बेहडियांत वजा घेऊन, मशार्निले यांच्या कुटुंबास नेमणूक करून द्यावयाचा करार कैलासवासी श्रीमंत पाटीलबावा यांचा आहे. त्यास श्रीमंत नाना यांच्या कानावर घालून सरकारांतून सनद करून रघोजी साळोंखे याचें नांवें घ्यावी आणि ठाणें क-हाड येथें आमलदार यांस पत्र देऊन ऐवज दरसाल मा।रनिलेकडे चालवणें, म्हणोन पत्र. येकूण सनद व कमाविसदार यास एक पत्र, म्हणोन या कामाविसी आन्याबा जाधव यास पत्र.
पा। खासा रसानगी बुगाजी जामदार की,
रा। नानांच्या कानावरी घालुन, गांव सरकार अंमल असेल तो आपलेकडे करऊन देवणेंविसी चिठी द्यावी.
छ ५ साबान, सबासितैन.