पत्रांक ४६६
श्री १७१९ आपाड शुद्ध ९
नेमणूक. सरकार राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा सु।। समान तीसेन मया व अल्लफ, सन १२०७. राजश्री आनंद बाबूराव यासीं, सालीना बमय पालखी, रुपये ३००० तीन हजार याचा दरमहा रुपये अडीचशेंप्रमाणें इ।। छ १३ माहे शवाल सन १२०६ पासोन सिलेखान्याकडून पावत जाईल. शिवाय कारकून आर ३ तीन, नि।। राजश्री नारायण बाबूराव, दर असामीस रु।। दोनशेंप्रमाणें सालीना रु।। साहाशें खासा स्वारी व-हाडप्रांतीं गेलियावर नेमणूक करून देण्यांत येईल, सदरहू प्रों करार, छ. ७ मोहरम, सन मजकूर,