लेखांक २७ श्री १६१५ माघ वद्य ८
स्वस्ति श्रीराज्याभिषेक शके २० श्रीमुखनाम संवत्छरे माघबहुल अष्टमी सौम्यवासर क्षत्रियकुलावंतस श्री राजाराम छत्रपती आणि वेदमूर्त जोसीराव यांचे
पुत्र गणशे जोसी व विनायक जोसी गोत्र भारद्वाज आश्वलायन सूत्र यासि दिल्हे वृत्तिपत्र ऐस जे तुह्मी बहुत विद्यावत जोतिषशास्त्री निपुण आणि वेदशास्त्रसंपन्न ऐसे जाणोन श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थ सहिरण्योदक धारापूर्वक तुह्मास इनाम मौजे नेरे ता। हवेली परगणे पुणे देह १ एक रास कुलबाब कुलकानू देखील हालीपटी व पेस्तरपटी जलतरुपाषाणनिधिनिक्षे पडिले पानसहित खेरीज हकदार व इनामदार करून गाव चतुःसीमप भूमि पूर्वमर्यादेप्रमाणे इनाम दिल्हा असे तुह्मी आपले स्वाधीन करून घेऊन तुह्मी व तुमचे पुत्रपौत्रादिवंशपरंपरेने अनभऊन सुखरूप असणे यासि जो कोण्ही अन्यथा करील त्यास धमशास्त्रीची वचने श्लोक
दानपालनयो र्मध्ये दानात्स्त्रेयोनुपालनं ॥
दानात्स्वर्गमवाप्नोति पालनादच्युतं पदं ॥१॥ छ
स्वदत्ता दुहिता भुमि पित्रुदत्ता तु सोदरि ॥
अन्यदत्ता भवेन्माता यो हरे त्रिषु संगमा ॥१॥ छ
ऐसी पातके जाणोन तुह्मास इनाम चालवितील निदेश समक्ष
संमत मंत्री संमत सचिव
सुरू सूद बार