Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री. चैत्र वद्य ९ शके १७१६,
ता. २४ एप्रील १७९४ ईसवी.

विनती विज्ञापना. मीर पोकद अली शिकंदरज्याहा बाहादुर साहेबजादे यांस पुत्र हरमचे स्त्री पासुन छ १९ माहे रमजानी रविवारी च्यार घटिका दिवस शेष असतां जाला, नवाबास अर्ज होऊन खुषी जाली. दौलानें अर्जी पाठविला की गुलाम नजर देण्याकरितां हजर होत आहेत. रात्रीं येणें ह्मणोन हुकुम जाला. त्या प्रो येक घटका रात्री नवाब बरामद होऊन दौलाची याद केली. पागावाले वगैरे लोक हजर होऊन साहबजाद्यास पुत्र जाल्याच्या नजरा लोकांनी केल्या' राछ २३ रमजाम हे विज्ञापना.

श्री.
चैत्र वद्य ९ शके १७१६,
ता. २४ एप्रीले १७९४ ईसवीं.

विनंती विज्ञापना. दौलाचे बोलण्यांत आलें कीं वाळकु येथील जमीनदरा रुकमारडी व रमाडी याजपासी शंकरराव भोंग यांनी नगदी ऐवज व चीजबस्त ठेविली याचा पत्ता लागल्यावरून उभयतां जमीनदारास हुस्तगत करून पाटव विशई भारामल तेजवंत यास येथुन लिा. फौजे सद्धां वाळकुदे प्रांती भारामल आल्याची बातमी ऐकून जमीदार फरारी जाले, तेजवंतानी दोन हजार जभियत ज्याबज्या त्याच शोधास रवाना केली. जमीदाराचा शोध देवगड' चांदे येथे आहेत हा समजल्यावरून । भल यांनी चांद्यात रायले पुरपौत्तम यस दाहा स्वार व च्यार हरको 'गमें देऊन रवाना केले. हे चांद्यात जाऊन तेथील देवीचे नजीक डेर, .... हाता तेथे जाऊन रुकमारडी व दमारडी जमानदार कबील्यासुद्धा पाहुन तेथील अधिकारी नाना फौजदार व गंडोपंत व यादसकदेव याचे जिभे जमीनदार लाबेले त्यांनी उत्तर केले की • जमीनदार आसांपाशी आहेत सेनासाहेब सुभा याजकडे सांडणीस्वारासमागमे पत्र रखना करिता. तेथील आज्ञा येईल तशी वर्तणुक करूं, य, और बोलुन रायेल पुरुषोत्तम यांस यांनी आपल स्वार बराबर देऊन पाचकोस व पार करून दिल्ही, पुरुषोत्तम फिरोन तेजवंताकडे आला. त्यांनी येथे पाठविले. त्याचे जबानी वर्तमान ऐकावे ह्मणोन त्यास बोलाऊन रुवंरु त्याने भार सांगितला, दौला बळिले * वाळकुड्याचे जमीनदार शंकरराव याजपासीं खजाना होता तो घेऊन चांद्यांत राहिले. बजीनस तेथील अधिका-याचे जिमे केले. ये विषई सेनासाहव सुभा यांस आपलें पत्र द्यावे व श्रीमंतांकडूनही त्यास पत्र जावें. इकडील माहसबेदार असामींस त्यांनी आश्रा देऊन देवावें । त्यास लाजम नाही ' या प्रा दौलाचे बोलण्यात आले. राणछ २३ रमजान हे विज्ञापना.

[ १६६ ]                                      श्री.

सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामी गोसावी यासीः-
पो। बाळाजी बाजीराव कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन लिहित असिलें पाहिजे विशेष मौजे सांगरुळाविशीं विरुद्धतेचे आचरण धन्याशीं न करावे, सेवाधर्मास हे गोष्ट उत्तम नव्हे, ह्मणोन आपणास पूर्वी पत्र पाठविलें त्याचे उत्तर तपशिलें जे, सागरुळ द्यावयाचा करार आहे, चिकोडीकर व एसाजीराम मध्यस्त आहेत, ह्मणोन लिहिले त्याजवरून मध्यस्ताकडे येविशीचा शोध मनास आणिला त्याणी साफ सागितलं जे, दोन चार गाव धन्यानी घेतले ते कृपा करून देतात, सागरुळ एक राहिले तेही धन्याची सेवा करून आर्जऊन घ्यावें येणेप्रमाणे आह्मी बोलिलों असे ह्मणतात व चिकोडीकराचें पत्रही बजिन्नस याप्रमाणें आलें आहे तुह्मीं पत्रीं लिहिलें जे, आजपर्यंत आर्जिलें त्याचें ऊर्जित काय झालें तैं पुढें होणार ? हे गोष्ट लिहिणे उचित नाही तुमची मातबरी आहे ते धन्याचेच कृपेची आहे याउपरि सागरुळविशी वारवार उपक्रम करून विरुद्धाचरण न करावें धन्याच्या मर्जीपेक्षा सांगरूळ अधिकोत्तर नाहीं . ज्या गोष्टीने धन्याचा संतोष त्याप्रो। असावे स्वत च्या मुलखात अधिकोत्तर बेरजा घालून रोखे करिता बाबतीखेरीज गाव खेडी आहेत तेथेंही रोखे पाठविता. हा बोभाट मुलखातून धन्यासंनिध जातो. तेथून आज्ञापत्रें येथें येतात तरी अशी गोष्ट याउपरि न करावी बाबतीचा करार खावंदानी ज्याप्रों। करून दिल्हा आहे त्याप्रों। वसूल घेऊन निष्ठेनें स्वामिसेवा करावी हेच श्लाघ्य असे सारांश तूर्त मसलतीचा प्रकार आहे तो सिद्धीस पावलियावर विनंति करून विनंतीच्याच मार्गे आपलें कार्य केले जाईल सध्या उतावळीचा प्रकार सहसा न करावा बहुत काय लिहिणें. हे विनति.

श्री चैत्र शुद्ध २ शके ७१६,
ता. १७।४।१७९४

विनंती विज्ञापना. दौलाचे बोलण्यात आले की आसद अलीखान मुजफ. रुलमुलुक यांजकडे पहिले कडपे टुक्याचे काम होते. अलिकडे सुगुरजटपोळ कृष्णातीरचा तालुकाही त्याजकडे दिला. ताडपत्री ताडकरी, सिंगणमला, येलापुर हे तालुके ईसामियांकडे होते तेही सदअलीखान यांजकडे सांगितले, यवुन तेथन येकहाती बंदोबस्त तालुक्याचा आसद अलीखान यांजकडे जील, संवार पायेदळे जमियत सान मार यांची मजबुत आहे. तालुकि. यांचा बंदोबस्त खातरखा ठेविला आहे ह्मणेन बोलण्यात आले. सहा हजार स्वार व पैदल साहा हजार बारा हजार जमियत माारनिलेची आहे. रा छ, २३ रयजन हे विज्ञापना.

लेखांक १६३                                                                                                                            १६२० आषाढ वद्य ११


                                              86               63                                      

                                                                                (फारसी मजकूर)                                                                           

अज दिवांण पा। वाई ता। मोकदमानी देहाय

मौजे पसर्णी सा। हवेली                                        मौजे उझर्डे सा। हवेली
मोजे एकसर सा। मु-हे

पा। मा। सु॥सन तिसा सितैन अलफ बा। खु॥ रा। छ १ मोहरम पौ। छ २४ मि॥ सादीर जाले तेथे रजा जे दरीविले बो। नारायणभट बिन गोपीनाथभट चित्राउ जुनारदार सो। का। मा। हुजूर येऊन मालूम केले जे आपणासि 
इनाम + + + + + +

बि॥
मौजे पसर्णी सा। हवेली चावर                            मौजे उझर्डे सा। हवेली चावर
नीम ..                                                          नीम ..
मौजे एकसर सा। मुर्‍हे चावर .।२

येणेप्रमाणे दो। महसूल नखतयाती व बाजे उजुहाती बरहुकूम खुर्दखत मुकासाइयानी माजी कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा व तसरुफाती सालाबाद ता। सालगु॥ चालिले आहे हाली कारकून पा। मजकूर ताजा खुर्दखताचा उजूर करिताती नजर इनायत फर्माउन दरीबाब सरंजाम होय ह्मणौउन तरी बराय मालुमाती खातिरेस आणुन सदरहू इनाम बरहुकूम खुर्दखत मुकासाईयानी माजी भोगवटा व तसरुफाती सालाबाद ता। सालगु॥ जैसे चालिले असेल तेणेप्रमाणे दुमाले केला असे इनामदार मजकुराचे दुमाले करून अवलाद व अहफाद चालवीजे दर हर साला ताजा खुर्दखताचा उजूर न कीजे तालीक लेहून घेऊन असल खुर्दखत इनामदार मजकुरास परतून दीजे ह्मणौन रजा रजेबा। सदरहू इनाम दो। बाबहाय दुमाला केले असे भोगवटा व तसरुफाती पाहून ता। सालगु॥ चालिलेप्रमाणे सन तल मजकुरास इनाम दुमाला कीजे तालीक लेहून घेऊन असल मिसेली इनामदार मजकुरास परतून दीजे मोरतब सूद 

                                                                                  72 1

 

तेरीख २४                                                                                   माहे मोहरम
मोहरम

                                                                                                                        बार

चैत्र शुद्ध १४ शके १७१६,
ता. १४ एप्रील १७९५ ईसवी.

विनंती विज्ञापना. दौलाचे बोलण्यांत आलें कीं " येलदगल, वरंगळ, नलगुंडा वगैरे तालुकयाचे काम ईसामियां यांस सांगोन तालुक्याचे बंदोबस्ताकरिता त्यांस तेथे पाठविल्या पासोन तालुक्याची लावणी व आकार ईसामियाने खातरखा केला. परंतु जमी' वगैरे मुफसद फार आहेत त्यांची तब होऊन तालुका निर्वेध जाला : '. याजकरितां इंग्रजी दोन पलटणे कडपे प्रांती गंजीकोथ्यापासीं होतीं ....गजेंद्रगडचे बंदोबस्तास रवाना केली होत. ती पलटणे येलगंदलाकडे आणवून ठविली आहेत. येक हजारा सवाराचीही जमियत आहे. या उपरी मुफसदाचा खलल न होतां तालुक्याचा बंदोबस्त होईल'' याप्रा यांचे बोलण्यांत आलें, आणी बोलले की, 'देवगड चादेंही तेथून जवळ आहे.' म्हणोन हसत हसत बोलले. यांतील तात्पर्य तिकडील रुखावर दबाब. ॥ छ २३ रमजान हे विज्ञापना

लेखांक १६२                                                                                                                            १६१५ भाद्रपद शुध्द ३


                                                                                63                                      

                                                                                (फारसी मजकूर)
                                                                             सरकार खालसे सरीफ

बो। माहाकोजी वलद मुधोजी पाटील मौजे बापेगाउ सा। हवेली पा। वाई सु॥सन हजार ११०३ माफीक सन ३७ जुलूसवाला कारणे                 साहेबाचे बंदगीस लिहून दिल्हा मुचलका ऐसा जे संभाजी वलद कृस्णाजी पटेल पोल व तुकाजी वलद यमाजी पातगुडा पटेल मौजे कवीठे सा।मजकूर यास आपण मालजमान व हाजीरजमा असो हाजीर करू न सको तरी त्याचा मुतिदयाचा जाब करून देऊ हा मुचलका सही

तेरीख १ माहे मोहरम
सन ३७ जुलूसवाला

श्री
चैत्र वद्य ९ शके १७१६,

तो २४।४।१७९४ इ.

विनंती विज्ञापना ऐसीजै दौलाचे बोलणे जाले हा मार स्वामीस लिहिलो याजवेगळ कांही माार आढळांत आला तो राजश्री गोविंदराव भगवंत यांस लि।। अहे. सेवेत विनंती करतील त्यावरुन ध्यानात येईल. राय छ २३ रमजान हे विज्ञापना,

श्री
चैत्र वद्य ९ शके १७१६. 

ता. २४ एप्रिल १७९४ इ०.

विनंती विज्ञापना ऐसीजे. दौलाचे सांगितच्याप्रमाणे पुरवण्या स्वामीस लिहिल्या. याची उत्तरे समर्पक गोड आणि दाबाची लि। यावी. याचे कारण मला हे पुसतील की तुम्ही पत्रे लिहिली त्यांची काय उत्तरें आलीं ? तेव्हां मला पत्रे दाखवावी लागतील यास्तव विनंती लिहिली आहे. तर छ २३ रमजान हे विज्ञापना.

श्री
चैत्र वद्य ९ शके १७१६.
ता. २४ एग्रील १७९४ ईसवी.

विनंती विज्ञापना ऐसीजे. पातषाहींतील मजकुर बोलत बोलत दौल, बोलिलें कीं पातघाहा इंग्रजाचे पुठ्यांत शेरावयास करतो. कारण काय त्यास कितेक दिवस इंग्रजापासीं बंगाल्यांत पातशाहाचे राहणे जालें होते ते वेळेस त्याचे मुदारातीचे सुखाचा अनुभव त्यास आहे. प्रस्तुत खाया खर्च वेगळ हैराणगत कैदे सारखा आहे. रडणें भेकणे नित्य चालले आहे त्यास पातशाईची थोडीच आशा आहे ? खायास खर्चास आराम इतके असले म्हणजे संतोष. याजकारतां येखादे वेळेस इंग्रजांनी लालुच दाखवली तर उठोन जाईल. ही येक कवाईतच आहे" म्हणोन बोलत होते.
छ रमजान हे विज्ञापना,