श्री. चैत्र वद्य ९ शके १७१६,
ता. २४ एप्रील १७९४ ईसवी.
विनती विज्ञापना. मीर पोकद अली शिकंदरज्याहा बाहादुर साहेबजादे यांस पुत्र हरमचे स्त्री पासुन छ १९ माहे रमजानी रविवारी च्यार घटिका दिवस शेष असतां जाला, नवाबास अर्ज होऊन खुषी जाली. दौलानें अर्जी पाठविला की गुलाम नजर देण्याकरितां हजर होत आहेत. रात्रीं येणें ह्मणोन हुकुम जाला. त्या प्रो येक घटका रात्री नवाब बरामद होऊन दौलाची याद केली. पागावाले वगैरे लोक हजर होऊन साहबजाद्यास पुत्र जाल्याच्या नजरा लोकांनी केल्या' राछ २३ रमजाम हे विज्ञापना.