लेखांक १६२ १६१५ भाद्रपद शुध्द ३
(फारसी मजकूर)
सरकार खालसे सरीफ
बो। माहाकोजी वलद मुधोजी पाटील मौजे बापेगाउ सा। हवेली पा। वाई सु॥सन हजार ११०३ माफीक सन ३७ जुलूसवाला कारणे साहेबाचे बंदगीस लिहून दिल्हा मुचलका ऐसा जे संभाजी वलद कृस्णाजी पटेल पोल व तुकाजी वलद यमाजी पातगुडा पटेल मौजे कवीठे सा।मजकूर यास आपण मालजमान व हाजीरजमा असो हाजीर करू न सको तरी त्याचा मुतिदयाचा जाब करून देऊ हा मुचलका सही
तेरीख १ माहे मोहरम
सन ३७ जुलूसवाला