Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री. चैत्र शुद्ध १४ शके १७१६,
ता. १४ एप्रील १७९४ ईसवी..
विनंति विज्ञापना. निर्मळ वगैरे माहाल बाबत स्वराज्याचा यैवज नवाबाकडून सालाबाद अवरंगाबादेवर तनखा येतो त्याप्रमाणे सन १२०२ सालची बाकी व सन १२०३ सालचा येवज येणे याजकरितां दौलास निकड केली की सालें गुजरोन गैली सरकारचे यैवजाची तुनखा द्यावी. दौलांनी राजाजीस तनखा बा। यैवज जफरुदौला या माहोलचा देणे किती याचा फर्द करून समजावणे म्हणोन सांगितले. राज्यांजीनी फर्द तयार करून दिली, सन १२०२ साल पैकीं दीड लक्ष आलेसे हिशोबी पेशजी तनखा यैवजी दिल्ले ते वजा करून सन १२०३ पैकी आलेले हिशेब दीड लक्ष द्यावयाचे जमा करून सालाबादी तेरा हजार सरंजामी वगैरे याजकडे दुसाला देतीबार सवीस दजार दौनसे व परवणी, लोहगांव, आवढे, ठाकळी, पांचळेगांव वगैरे महालांत स्वराज्याकडील अमलदानी वसूल येक लाख सताव स हजार आठसे घेतला आहे. तो वजा करून बाकी एवज राहिला त्याची तुनखा। तयार करून देवितों वैसे याचे बोलणे.' याचे उत्तर आह्मीं कैलेंक जफरुदौला बाबत महाल यैवज सरकारांत येतो. परभारें माहाल सरंजामी वगैरे सरकारचे अंमलदारांनी यैवज घेण्याची आज्ञा सरकारांतून नाही. त्या पक्ष स्वराज्याकडील अमंलदार पैका घेणार नाहीत. कोण मामलेदाराने यैवज घे. तला त्याच्या रसीदा दाखवल्या ह्मणजे सरकारांत विनंती लिहिता येईल याचे ह्मणेक श्रीमंताकडील म मलेदारांनी येवज जबरदस्तीने घेऊन रसीदा अ. म लस दिल्या नाहीत. रोशनखां वगैरेंनी पत्रे व यैवज दिल्याचे जमाखर्च पाठविले आहेत त्यावरून हे लिहिले? आम्हीं सांगितले की रसीदाच नाहींत त्या पक्षीं मामलेदारांनी यैवज घेतला कशावरून समजावें ? दौलाचे बोलण्यांत की आह्मीं रोसनखा वगैरे जागिरदारास इनामतनामे पाठविले आहेत, की ज्या कमाविसदारांनी महाल यैवज घेतला त्याजपासोन रसीदा घेऊन पाठेवणे. रसोदा आणविल्या. येतील. या प्रमाणे याचे बोलणे. त्यास सदरह प्रों, वैवज वजा करून तनखा दौवतात त्यास थे विषई आज्ञा जसी होईल त्या प्रमाणे मांस बोलण्यात येईल. राछ १७ रमजान हे विज्ञापना,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १६० विष्णु १६१३
०॥ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो बाजी भोसले मोकदम मौजे वेळुवळी सुरली व पिपरी सा।कोरगौ रामराम विनंती सु॥ इसने तिसैन अलफ तुह्मापासून उ॥ पैके खतावरून लेहून घेतले होते चावर ३ तीन घेतली होती त्यास तुह्मी पैके रा। अंताजी नाईक पिसाल देशमूख प्रा। वाई व चापसेटी सेटिया कसबे वाई याचे गुजारतीने पैकेआमचे दिल्हे वतन लेहून घेतले होते ते तुमचे तुह्मास करार होय आह्मास काही तुमच्या वतनासी समंध नाही देशमुखाचे गुजारतीने लिगाड लिहिले तुमच्या वतनासी काही समंध नाही तुमचा घरी कागद वतनाचा घेतला होता तो रद असे तुह्मासी काही लिगाड नाही कलले पाहिजे
कृपा असो दीजे हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री. चैत्र शुद्ध २ शके १७१६,
ता. १७४।१७९४ |
विज्ञापना यैसीजे, नवाबाची प्रकृत बेंदरास आलियापासुन ठीक नाहीं. शरीराची भावना हैदराबादेस होती त्यापेक्षां बहुत क्षीण, शरीर फार रोड जाले. वृद्धापकाळ पहिल्या प्रों भक्षणही होत नाही. दरबार करुन बसतात शिकार करतात हे सर्व शोभार्थ लौकिक. हवा येथील मानत नाहीं. मनांत हुरहुर फार, चित्त येक ठिकाणी लागत नाहीं. दौलाचे आग्रहामुळे आजपयँत राहिले. अलीकडे प्रकृतीस क्रोध बहुत जाला आहे. हैदराबादेस जायें हे मनांत भरले. बेगम आदिकरून सर्वांनी निकड केली, चित्त उदास जालें. तेव्हां निश्चय केला की हैदराबादेस रमजानचा महिना जाला ह्मणजे जावें. दौलांनीं येक दोन वेळ अर्ज केला की कुलयांत बिघडती. याजकरितां च्यार महिने छावणी येथेच व्हावी. त्यास झिडकारुन उत्तर केले की “ माझी कुलयात बिघडावयाची नाही. माझी मी संभाळून घेईन. रुकनुदौलापासून जी दोस्ती त्याची बेहदी आमची आहेच. तुह्मांस अदल जो जातीचे येऊन पडेल त्यास मदारुल महाला व तुह्मी उभयत समजाऊन घेणे व बेदरास राहणे असल्यास राहावे. तुम्ही आपलें साठी आमचे कुलयातीत खलेल करणे मुनासब नाहीं. आम्ही हैदराबादेस जाउं.' या प्रों दोन वेळ बो( ५ ) त्यावरून दौला बोलले की ' हजरती वेगळ मी कवडीचा माल, मला कोण पुसतो ? जैसी मर्जी असेल तसेच करीन.' या प्रों बालणे उभयतांचें जालें, मध्ये असीला जवळ होत्या, त्यांनी मात्र हे वर्तमान यैकलें. कारखानेदार यास तयारीची ताकीदही जाली. त्यावरुन गोष्ट फायद्यांत आली. छ १३ तेरखेस मुषरुलुक नवाबाकडे गेले होते. खलबतही जाले. काही प्रकारच्या गोष्टी । सांगून मर्जी हम ( ला) वर करुन हैदराबादचे जाण्याचे राहविले. कारखाने चराईस जावे अशी वार्ता निघाली त्यास शहरास जाण्याचा गुल फार जाला हे मसलतीस ठीक नाहीं, जाण्याची मर्जी असल्यास जावे. परंतु षौहरत आली ही मौडेल पैसे समजाऊन रहावयाची घोहरत मात्र घातली हा येक प्रकार दुसरा प्रकार छावणी येथेच करावी हा निछय. दोहातून कोणता प्रकार निश्चयाची हे समजल्यावर मागाहुन लिहीन. राा छ १६ रमजान हे विज्ञापना,
रा. छ १७ खानी टपालावरून.
श्रीमंत रावसाहेबसि छ, १७ च्या डांकेनें हवाल्याचे पत्र.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री. चैत्र शुद्ध २ शके १७१६,
ता. १७७४।१७९४
विज्ञापना यैसीजे: नवाबाकडुन ( न ) साहेब याचे षादी समर्थे पत्रे सरकारांत आली, याची उत्तरें पोहचवून स्वारी न येण्याचा भाव समजला ह्मणजे नबाब बौरचीस जाणार, तेथून हैदराबादेस जावें यैसी परभारें बातमी समजली. त्यास बहुतकरून हैदराबादेस जाणार नाहीत असे असतांही । जावयाचा निश्चय पूर्णपणे जाला असे समजलियावरून बाबासी व दौलासी तुह्मीं बोलावें. जे अजमासे बेदरास येणें जालें यांत सरकारचे लढे जुज यातीचे उगऊन परस्परं भेटी होणे चांगलें. यास्तव ही गोष्ट करुन हैदराबादेस जाणे हे सलाह या प्रों वेलणें हें कीं यावर जातील जावोत ह्मणेन आज्ञा त्यास प्रस्तुत येथे फार घौहरत जाली की नबाब रमजानची महिना जालियावर हैदराबादेस जाणार यात ( त ) था नाहीं. जनान्यांतलंही बातनी (मी) या प्रकारचीच तेव्हां मुषरुलमुलुक यांस पुसावयास पाठविलें की हैदराबादेस जाण्याची खबर फार प्रगटात आलेली आहे याचा काय निश्चय जाहला तेव्हां त्यांनी सांगितले की मी ही असेच लोकांचे बोलणे ऐकत. परंतु नबाब मसी अद्याप बोलले नाहीत आणि निश्चयही जाण्याचा दिसत । नाही. या प्रों त्याजकडील निरोप आला. याचा तपशील अलाहिदा लिहिला आहे, त्याजवरून ध्यानात येईल. जाण्याचा निश्चय असे खचित समजलें ह्मणजे स्वामीचे आज्ञे प्रों बोलण्यांत येऊन उत्तर होईल ते लिहीन, छ १६ रमजान हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री. चैत्र शुद्ध २ शके १७१६,
ता. १।४।१७९४
विज्ञापना म्हैसाजं. मुलील मुलुक ह्मणत होते की मदारुल'महाला यांस पहिल्याने कोणते गोष्टीचा नेट फार येत असतो. प्रस्तुत स्वस्थतेचा समय पाहून जुरत धरली. यखादा फंद उभा राहिला ह्मणजे सर्व विसरून नरम पडतात. आतां हुषार जाले. रावसिंदे यांचा काल जाला बखेडे पडतील. पाहावें. तिकडील पुरवणी करितां करितां पुरे होईल. त्यावेगळ घरांत ( घरांत ) दौलत आहे किती दिवस स्वस्थता राहील? नाना प्रकारचे अंदेषे येऊन वारद होतात, दक्षण आमची असे आम्ही ह्मणवीत असतां टिषु सुलतान याचा उत्कर्ष त परियंत आमची दक्षण अश्या ह्मणण्याचा भाव आह्मांस कोटें होता है ईश्वराचे कृपे करून त्याचे पारिपत्य जालियावर आमची दक्षण असे शब्द आतां तोंडावाटे निघु लागले. याचे उत्तर त्यांस दिलें कीं ‘श्रीमताचे दवलतीस हा दोष निवडून द्यावा असे नाही, याप्रत्वी ( पृथ्वी ) वर जे रिया, सत करतत. सर्वांवर ईश्वराची इच्छा गालब आहे. ईश्वर कोणते वेळेस काय करील हा भरंवसा कोणीच मनांत आणु नये हे खरे. या प्रों बोलणें जालें, रा, छ, १६ रजमान हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
चैत्र शुद्ध २ शके १७१६,
ता, १७॥४॥१७९४
विज्ञापना ऐसीजे, सरकारचे पत्रा अन्वयें मुषीरुलमुलुक यण बोलणे जालें ते वेळेस त्याचे बोलण्याचे उद्गार निघाले त्याचा तपसील:-
१ सरकारचे पत्रांतील मार यैकोन बोलिले की * आतांच इतके नेटानें कां लिहिलें ? होळकर यास बलावणी गेली. तें आलियावर नेट धरावयाचा होता'. याचे उत्तर दिले की “राब शिंदे असतांनाच होळ)करांस बोलावावें हा निश्चय ठरून पत्रे पूर्वीच गेली आहेत. नवाबाची श्रीमंताची दोस्ती जुज, यांत कुल. यांत वाजवी जाबसाल. यास दुस-या कोणाची दरकार नाहीं, दोस्तीचा जाबसाल यास हाळकराचे प्रतीक्षेचे कारण नाहीं.
१ आणखी येक गोष्ट अशी आहे की ‘श्रीमंताचे नुकसान बंदगान अली यांस करणें नाही. तसेच, बंदगानअलाच नुकसान श्रीमंत करीत नाहीत, हा निश्चय, तेव्हां दौलतीस व उभयतां सरदार यांचे कांहीं होत नाही. मगर, मदारुल माहाला यांचा व माझा उभयता मझला याजमुळे इतका प्रकार त्यास हा निश्चय करून ठरविला आहे की मदारुलमहाला याचा गुरु तुटेल अथवा माझा उरु मोडेल, दोहींतून येक गोष्ट होईल, ईश्वर इच्छा. काय घडेल पहावे. याप्रों स्पष्ट बोलून हसले. मलाही हास्य येऊन बोललो की “आपले बुधीची हातवटा कोणास यावयाची नाहीं. मसलहत करण्याची जात विलक्षण पाहिली. ईश्वर आपल्यास सलामत राखो ? ६ व आय मनांत आलें ? ' ह्मणोन पुस लागले. तेव्हां बोलियों की * अंत:करणाची जात साफ, कांहीं मनांत ठेवावयाचे नाहीं. येक वेळ गोष्ट मनांत मनांत आली ह्मणजे तिचा जाहिराणा करून बोलत असावें. अशी छाती कोणाची आहे? बंदगान अलीचे कारभारी जे पूर्वी जाले. परंतु आपल्या मुकाबल्यास कोण येणार नाही, असे बोलल्यावर सणाले की, 'सिधांताची गोष्ट ध्यानांत आलीयावर काय भय ? आणि संकोच कश्यास ? दोन दोन हात हेही आहेत, असे बोलले. नंतर त्यांस #टलें कीं * आपले सारखे दाम येथ परियंत वाढु देणार नाहींत ही आह्मांस खातर जमा आहे.
----
२
सदरहू प्रों मार जाला, छ १६ रमजान हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १६४ ] श्री. १७४२.
श्रीराजा शाहूछत्रपति
हर्षनिधान । बाळाजी बाजी-
राव मुख्यप्रधान ।
राजश्री फत्तेसिग बावा गोसावी यासीः - सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलकृत राजमान्य
स्नेll बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित गेले पाहिजे विशेष मौजे साडेगाव व मौजे बोरी पा । आवढें हे दोन्ही गांव आपणाकडून मुकासे राजश्री कृष्णराव पंडित अमात्य याजकडे आहेत तरी पेशजीपासून चालत आल्याप्रमाणे चालवणें ह्मणून हरदु गावास आपली ताकीद पत्रे देऊन पंडित मानिलेकडे गाव सुरळीत चालत ते केले पाहिजे रा। छ १० सफर बहुत काय लिहिणें. लोभ असो दिल्हा पाहिजे हे विनति.
लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री. चैत्र शुद्ध २ शके १७१६,
ता. १७।४।१७९४
विज्ञापना ऐसिजे. नवाब निजामअली खानबहादुर यांचे सरकारांतुन व माहालाकडून स्वराज्याचे अमलाचे वगैरे फडशे बहुत होणे. करार मदार सर्व जाले. त्यास सालची साले लोटली. परंतु, येकही फडशा न जाला. तुह्मांस जाऊनहीं पांच वर्षे कमकसर होत आ. त्याजवर राजश्री गोविंदराव भगवत व रघोतम हैबतराव आले. त्यांनी तिकडील उत्तराची विनंती केली. त्यांत मागची व वाजवी फैसल्याची तन्हा न पाहिली, नंतर बाबाराव गोविंद हैदराबादेस। जाते समई कितेक बो (ल) ले. त्यावरुन आटफर्दा तुर्त तुह्यांकडे पाठविल्या होत्या, त्या तुह्मीं बाबाराव गोविंद यांस घेऊन मोइनुला यांस दाखविल्या त्याचे जाब मानिले समागमें आलें ते पाहतां गोविंद भगवंत व रघोत्तम हैबतराव या समागमें उत्तरे आली. त्या प्राच याचा जाबसाल पडला. तोंड पडावयासे नाही. मषरुलमुलुक यांण राजश्री बाळाजी जनार्दन यांचे पत्रांत लिहिले हो की जाबसाल ठराऊन उभयतांस लवकर खाना करावे, त्यास ठराव करणें तो कोणता? जागीर बाबत कांहीं लेस तिकडील नाहींत. स्वराज्य कैलासवासी यांचे कारकीर्दी प्रमाणे येणे, आणि ज्या जबाबी रकमा तितक्या करारा बमोजीब फर्दावर लिहुन पाठविल्या; मग निराळा ठराव ते काय होणे. असो वाजवी फडशे व्हावे हैं दोस्तास व स्नैहास चांगलें, यास्तव माझुदली यांचे लिहिल्याप्रमाणे सर्व मारि बोलौने रघोतम हैबतराव गोविंद यांस नवाबाकडे जाण्याविस आज्ञा जाली. त्यांण विनंती केली की येक वेळ आह्मीं लेहुन पाठवतो. उत्तर आलें ह्मणजे जाऊ ये विसी नवाबास उभयतांनी लिहिले आहे. व तुह्मीं बोलून उभयतांस येण्याविसी पत्र पाठवणें मामलती फार तटल्या. या उपर फैसलें होणे चांगलें. उत्तर लवकर पाठवणे, दिवसगत न लावणे, ह्मणन आज्ञा, त्यास आज्ञेप्रमाणे दौलाकडे जाऊन बेलणे झालें. बोलिले की, रघौतमराव व बाबाराव यांनी येथे येऊन विशेष काय सांगावयाचे आहे. पत्रांत माार लिहिला आहे तोच समक्ष बोलतील. इकडून सेवटचे प्रकार ताडीचे जे सांगावयाचे ते पूर्वी । गोविंदराव भगवंत व रघतम हैबतराव याजबरोबर सर्व सांगून पाठविले आहेत, बाबाराव यांसही त्याच अन्वयें सांगून पाठविले. याज परती राजवटा तो कोणती आहे? जे वेळेस बोलणें पडेल तेव्हां तेच आमचे बोलणें जाप श्रीमंताचे व मदारुलमहाल याचे चित्तास न येई तरी ती गोष्ट अलाहिदा आहे. खुद श्रीमंतांनी बमैफोज पंढरपुर अथवा पंढरपुरचे घाटापर्यंत इरादा केला तरी आमचे बोलणे वाजवी असेच बोलत जाऊ. पुढे ईश्वर इच्छा. याप्रमाणे बोलियावर त्यास झटले की “आपण असे उत्तर की करितां ? | हे वाजवी उत्तर नव्हे. याची दरयात्फी करून बोलावे. श्रीमंतांकडून आठ फर्दा मुजकर होऊन आल्या त्यात काय गैरवाजवी लिहिले आहे? दही सरकारची दोस्ती याजकरितां याजवी असतां इतके दिवस मुरवती करिता लोटले, आतां किती दिवस प्रतीक्षा करावी. बेदरचे स्वराज्य मामुळ पासून घेत आली. त्यात तुह्मीच दिकत काढुन घ्याहारुम तकुव ठेवावे असफ ज्याची रुजुवात करुन त्या अन्वये पुढे चालावे असे तुमचे बोलण्यांत. आह्मांस किफायत नसतां मुरवतीकरितां महक करुन रुजुवातीचा न्येम दोन वर्षाचा ठरला. आमचे सरकारांतून अमीन रुजुवातीकरितां मुकरर करुन पाठविले असता वर्षानवर्षे गुजरली. अद्याप ठिकाणच नाहीं. च्याहारुम वजा करून ठेवताही नुकसानहीं कशी कबुल होईल ? तेव्हां बोलिले की रुजुवात अमीन जाऊन होत नाहीं. योजकरिता माहालाचा मामुल ओख असफज्याचे वेळचा तुह्मीं आपले दत्फरचा काढुन आह्मांस सांगावा, त्या आंखाप्रााणे अमल देऊ, तह कीकात देवऊन वाजवी आख ज्या माहलची आह्मीं शाबीत करून देऊ. तेव्हां त्याप्नों पुढे अंमल ज्यारी राहिल. अथवा आह्मीं जा ( 7 ) रक्कम सांगु त्या प्रों प्रस्तुत अमले तुह्मीं सरकारांत घ्यावा. या आखास ज्याजती आख असल्यास आह्मांस शाबीत करुन घ्यावे. ते वेळेस त्याप्रमाणे अमल देऊ ही तोड ठरवावी? याचे उत्तर त्यास दिले की आम्हीं येक आख सांगावा अधवा तुह्मीं सांगाल त्या प्रा ज्यारी करावें, च्याहारुम आज परिवंत ठेऊन घेतलं. पुढे आणिक ठेवावे. तहकीकातही करणे बाकीच आहे. हे कसे पुरवेल १ वाजवी करावेसें ह्म(ण)णे ते हेच की काय? नवाबाचे सरकारची किफायत पाहावी आणि श्रीमंताचे सरकारची नुकसान होणें हें मनांतच येऊ नये. हेच दोस्तीस लाजम की काय ? च्याहारुम ठेऊन घेतल्यावर रुजुवाती आपणास काय कलकल ? जर नुकसान होईल तरी कलकल असावी. त्यापक्षीं राव, पंत, प्रधान आपली नुकसानी कशी कबुल करतील? करणार नाहींत. आपणही वाजवी मनांत आणून पहावे." याजवर बोलले कीं, * कैसवासी माधवरावसाहेब यांचे वेळचे अमलाप्रमाणे अमल घेतां, तेव्हा यांत नुकसान नाहीं. तहकीकात जाल्यावरही यास अधिक होणार नाहीं. बरोबरच होईल, कदाचित एखादे माहालास तोटा येईल. " * तेव्हा बौलिलै ( ल ?) की 4 माधवरावसाहेब यांचे वेळचे अमलाप्रमाणे ह्मणत यांतही संदेहच आहे, तथापि तुह्या ज्या हारुम वजा करिता हे कोठला ?
आमचा अंमल आजपरियेत ज्यारी होता. त्यांत तुह्मी ध्याहारूम केला तेव्हा तेव्हां किती नुकसान जाली ही समजावी याजकरितां श्रीमंताचें ह्मण हचे आहे की ' याजउपर व्याहारुम तकुब राहणार नाही. आपण ज्या क. रावे. नंतर रुजुवात करणे तसी सुखरुस करावी ' हे श्रीमंतांचे ले (ण) में वाजवी आहे. कोणीही ऐकिल्यास या गोष्टीस गैरवाजवी ह्म(ण)णार नाही! आपणही वाढू नये ? या प्रों बोलणें जाालयावर बोलले की १६ फडच्या करावा असे मनांत आलियावर दिवसगते लागावयाची नाहीं, तोंड पडले नाहीं. नाही तर समजलेच आहे. गोविंदराव भगवंत यांस पत्रे गेली ते श्रीमंतांची मर्जी घेऊन काय लिहितात ते समजौन बोलण्यास येईल. ' या प्रो उत्तर जालें, रा।. छ १६ रमजान हे विज्ञापना,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
चैत्र शुद्ध ३ शके १७१६, ।
ता. १७।४।१७९४,
श्रीमंत राजश्री--------------------रावसाहेब
स्वामीचे सेवेसीं-
विनंती सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक साष्टांग नमस्कार विनती वि. ज्ञापना ताा छाा १६ माहे रमजान मु॥ बेदर येथे स्वामीचे कृपावलोकने सेवकाचे वर्तमान यथास्थित असो विशेष, स्वामी छ २० माहे पाबानचे आज्ञापत्र पाठविलें तें छ १ माहे रमजान पावलें. " स्वराज्य प्रकण नवा बाकडून फडचे व्हावयाचे या विषई राजश्री रघोत्तमराव व बाबाराव त्याजकडील उत्तरे बोलले. परंतु फडच्याची सुरत दिसत नाहीं, याजकरितां त्यास नवाबाकडे जाण्याविस आज्ञा केली. त्यांनी नवा(बा) चे परवानगीची उजर केला. पर्ने हो त्यांनी लिहिली आहेत. तुह्मीं नवाब मुषीरुलमुलुक यांसीं बोलोन यांस बलाउन घेणे ह्मणन आज्ञा त्यास आज्ञेप्रों दौलासी सर्व मारि बोलण्यांत आला. त्याची उत्तरे यांनी सांगितली ती अलाहिदा पुरवणींत लिहिली आहेत. अवलोकने ध्यानांत येईल सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री. चैत्र शुद्ध १४ शके १७१६,
ता. १४ एप्रील १७९४ ईसुवी.
विनती विज्ञापना, छ २० माहे षाबानचे सरकारचे पत्र सादर जालें तें छ १ माहे रमजानी पावले. त्यांत नवाबाकडुन स्वराज्य प्रकर्णी जावसालाचे फैसलै होणे येविषई राजश्री रघौतमराव व बाबाराव यांस आज्ञा जाली की दाह। वर्ष जाबसाल होतच आहे. हल्ली तुह्मीं नवावाकडे जाऊन सरकारचे जा(ब) सालाचे फडचे होत ते करणे, याप्रों आज्ञा जाली. उभयतांनीं नवाबाकडील परावनगी येण्याची विनंती केली. त्यास परवानगी पाठविण्याावसी। आज्ञा येसीयास या प्रकर्णी सरकार आज्ञेप्रमाणे मुषीरुलमुलुक यांसी बोलणे जालें त्या प्रकर्णी पत्रे लिहून रवानगी करितो. रा छा १३ रमजान है। विज्ञापना.
र।। छ १६ माहे रमजान रवानगी डाकेवरुन.