Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १५८ श्री १६०१ चैत्र वद्य ११
श्रीसकलगुणगणअलंकृत अखंडितलक्षुमी अलंकरण राजमान्ये राजश्री येसाजी मलाहार देशाधिकारी व देशलेखक वर्तमानी व भावी प्रा। पा। वाई गोसावी यास पोष्ये मोरेस्वर पंडीतराय कृतानेक नमस्कार शके ५ सिधार्थी नाम संवछरे चैत्र बहुल एकादसी भार्गव वासरे सु॥ तिसा सबैन अलफ धर्मा(र्थ) वेदमुहुर्ती नरसीभट रगनाथभ(ट) मूलपुरूस वा। क्षेत्र एशट यास पुरातन व्रती इनाम जमी(न) मौजे बेरलेखल जमीन चावर .॥.
मौजे पसर्णी जमीन .॥ एकून इनाम
जमीन चावर १ एक होता ऐसीयास वेदमुहूर्ती परम थोर योग्य अनुत्पन कुटुबवछाल पाहुनु यांस धर्मादाय दिल्हे बि॥
नरसींभट बिन रंगभट परमयोग्य कासीभट रंगभट चित्राव यास
अनुत्पन यास गला गला कौली धर्मादाये गला कैली कोठी मापे
कोठी मापे १ खंडी कैली खंडी १
चिंतामणीभट बिन नरसींभट गला लग ०
कैली कोठीमाप खंडी १
येकून गला कैली कोठी मापे खडी ३ तीन दिल्हे व प्रसूता गाई दरएकास एकीपासून च्यारी गाईचे करभार सोडिला जोवरी वेदमुहूर्ती क्षेम आहेत तोवरी देत जाणे नूतन पत्राचे अक्षेप न करणे मुख्या पत्राचे प्रती घेऊनु मुख्यपत्र वेदमुहूर्तीपासी देणे छ २५ माहे सफर हे१ विज्ञप्ति
बार सुद पौ छ २५ सफर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
चैत्र शु. ८ सोमवार शके १७१६.
विनंति विज्ञापना, बहलोलखान नवाबाची रुखसत व मध्यस्तीचा निरोप घेऊन आह्मांकडे छ. १० रमजानी आले. घरोब्याचे मार्गे खान मार यांचे बोलणें कीं, आजपर्यंत अलजपुरचे सुभ्याचे काम मजकडे होते भोंसलें सेना साहेब मुभा यांसी दोस्ती व येक + ( पुढील दोन पृष्ठे गहाळ ). + + पृष्ठं ३६१. वस्त्रे दिल्हीं:-
६ खान मार यांस---
५ पोषागसनगें
१ दस्तार
१ ज्यामेवार
१ पटका
१ दुषाला
१ किमखाब
-----
५
१ जवाहिर सिरपेंच.
-----
६
२ अषफजंग कारभारी यांस
(मुसलमानी मृगसालही संपत आलें आहे. सरासरी वर्षाची पत्रें छापून झाली. ह्याप्रमाणें आणखी ५ वर्षांची आहेत. कधी योग येईल तो खरा.
सं. महाराष्ट्र इतिहास )
१ पागोटें
१ दुषाला
---
२
६ पैषकार व वकील असाम्यांत
३ पागोटी ३ षालफर्द
----
३ (? ६)
सदरहुप्रमाणे दिल्हे. रा छ १३ रमजान हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
चैत्र शु. ८ सोमवार शके १७१६.
विनंति विज्ञापना. बाहलोलखान इसमाइलखान यांचे पुत्र यांजकडे अलजपुरची सुभेदारीचे काम आहे. सांप्रत छ. ४ रमजानी नबाबांनी अलजपुरची रुखसत खानमार यास दस्तबंद जोडी वे पानदान दिल्हें. अषफजंग त्यांचे कारभारी यांस मोत्यांची कैटी दिल्ही. त्याजवर औरंगाबादचे सुभेदारीचें व पैठण वगैरे तालुक्याचे काम बहलोलखान यांसीं बोलणे होऊन टरलें. फकरुदौला व चिमणीराजे यांची तगीरी होऊन बाहलोलखान यास सनदांपत्रे व खिलत छ ९ रमजान जाला. दौलाचा निरोप घेऊन या उ. परी खानमार कुच करून जाणार. राा छ १३ रमजान हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
चैत्र शु. ८ सोमवार शके १७१६.
विनंति विज्ञापना, नबाबाचे मनांत या उपर हैदराबादेस जायें: येथे राहू नये, याचप्रमाणे माहालांत वेगमा आदि करून सर्वांची सलाह. दौलाचे चित्तात हैदराबादेकडे तूर्त जाण्यांत कुल यातीस दुरुस्त नाही, याजकारता येथेच असावे. याप्रों त्याची सलाह. तथापि, आग्रहाने नवाब येथे न रा, हुतां हैदराबादेस जाणार, छ ५ शवालची तारीख कच करण्याची योजून ठेविली. याप्नों बारीक रीतीने वर्तमान समजण्यांत आले. होईल. त्याप्रमाणे विनंति लिहिण्यात येईल. अधिक बोझ बोंगमांकडील जौं आहेत तीरखाना करावीं ह्मणोन हुकुम जाला असे ऐकण्यात आले. याजउपरी आणखी काय निश्चय होईल तो लिहून पाठवीन, रा। छ १३ रम जान हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १६१ ] श्री. २९ नोव्हेंबर १७३८.
तालीक.
मा। अनाम देशमुख व देशपांड्ये ता। राजणगांव सरकारकून यासीः - बाजीराव बल्लाळ प्रधान सुमा तिसा सलासीन मया अलफ भगवतराव रामचंद्र व मोरेश्वर रामचंद्र व शिवराम रामचंद्र जोशी कुळकरणी मौजे तादळी ता। मजकूर यानीं पुण्याचे मुक्कामीं विनति केली की, मौजे मजकूरचें कुळकर्ण व जोशीपण हीं दोनही वतने शिवजी बिन जैतजी बेस मोकादम मौजे मजकूर याणे आपले वडील निळो सोनदेऊ व आबाजी सोनदेऊ आपले आजे यास खुशरजावदीनें विकत देऊन खरेदी खत करून दिल्हें त्यापासून आपण गुमास्ते ठेऊन दोनीं वतनें अनुभवीत आलो अलीकडे नारो दत्तो व यादो तुकदेऊ पानगे कोरेगांवकर मालुमाती कागद करोन गावांत सुखवस्तू राहत होते ते कजिया करितात तरी स्वामीनीं मनास आणून पारपत्य करावें ह्मणून त्यावरून नारो दत्तो व यादव तुकदेऊ पानगे यास हुजूर आणिले व गावचे मोकादम शिवाजी बिन भिकाजी व भिमजी बिन शिवजी पाटील व गोदजी चौगुला वगैरे बलुते हुजूर आणून करीना पुसिला त्याणी तकरारिया केल्या की , कुभभट ऋग्वेढी आपले गावीचा जोशी कुळकरणी पूर्वी होता त्याचें नकल झाले पानग्याचे वडील राघो दत्तो गावी सुखवस्तु राहात होता. त्याजकडून पाच सात वर्षें मुशारा देऊन कुलकर्ण लेहविलें त्या आधारावर मालुमाती कागद आणून दोनीं वतने आपली ह्मणतात हे कुंभभटाचे नव्हेत शिवाजी बिन जैतजी पा। याणें निळो सोनदेऊ व आबाजी सोनदेऊ यास जोशी पण व कुळकर्णपद दोनीं वतनें रजावदीने दिल्ही हें खरें आहे याप्रमाणें हकीगत आहे. ऐसियासी, पानगे कांही मजकूरचे वतनदार नव्हेत गावीं राहिल्यामुळें खेळ करून नडत होते ऐसें पांढरीच्या व मजालसीच्या विचारें खरे झाले पानग्यापाशीं पुरातन कागदपत्र दस्ताऐवजी नाहींत. यामुळे पानगे खोटे झाले. भगवंतराव रामचंद्र व मोरेश्वर रामचद्र व शिवराम रामचंद्र याचें वतन खरें झाले. त्याजवरून गांवकरी यांस व तुह्मास आज्ञापत्र सादर केलें असे. तरी जोसपण व कुळकर्ण हीं दोनीं वतनें भगवतराव रामचंद्र व मोरेश्वर रामचंद्र व शिवराम रामचंद्र याजकडे चालवून सुदामतपासून हक्क, आदा व इनाम असेल तें कुलकर्णी व ज्योतिषी यांजकडे चालवणे. या पत्राची प्रत लेहोन घेऊन हें पत्र भोगवाटियास परतोन देणें जाणिजे. छ २७ सावान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
चैत्र शु. ३ गुरुवार शके १७१६.
विनंती विज्ञापना. माहाबतजंगाचे कारभारी अनवरुदौली व हादीखान यांस घेऊन मुस्तकीमजंग खजीना वगैरे घेऊन आले. यांची विनंती पेशजी लिहिल्यावरुन ध्यानात येईल. दौलासी बोलणे होऊन यांची नावाची मुलाजमन जाली. नगदी व सोने रुपें जवाहीर + + + +-..... ( पृष्ट ३५९ ) + + + + + + + +
मामुली अखबार व हवाल्याचे पत्र.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
चैत्र शु. ३ गुरुवार शके १७१६.
विनंती विज्ञापना. कडपे प्रांती जमीदार मुफसदाचा हंगामा व टिपुक डील तीन च्यार जमियेन सरहादेवर आला. याचे वर्तमान नवाबाकडे आ. ल्यावरुन असद अलीखान यास फजसुधां कडप्याकडे जाण्याची रुखसत दिल्ही. याउपरी खानमार कुच करुन गेले ह्मणजे मागाहुन विनंती लिहिण्यांत येईल. रा।छ २ माहे रमजान हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १५७ श्रीशंकर १५९८ मार्गशीर्ष वद्य ८
अज दिवाण ठाणे सा। हवेली पा। वाई ता मोकदमानी मौजे पसर्णी सा। मा। सु॥ सबा सबैन अलफ वेदमूर्ती नरसींभट बिन रंगभट जुनारदार सा। का। मजकूर हुजूर येऊन ठाणा राजश्री एसाजी मल्हारी सुभेदार पा। मा। यांची सनद छ १४ सौवाल पौ। छ २१ मि॥ तेथे आज्ञा की नरसींभट बिन रंगभट इनामदार याचा इनाम सालाबाद कारकीर्दी (दर कारकीर्दी साल) गुदस्ता जैसे चालत आले असेल तैस तेणेप्रमाणे भोगवटा मनास आणून दुमाले करणे ह्मणौनु आज्ञापत्र तेणेप्रमाणे मौजे मा। वेदमूर्ती नरसींभट बिन रंगभट जुनारदार याचा इनाम चावर .॥. नीम जैसा सालाबाद चालत आले असेल तेणेप्रमाणे भो(ग)वटा रुजू पाहोन इनाम दुमाले करणे तालीक लेहून घेऊन असली परतून इनामदार मजकुरापासी देणे छ २१ सौवाल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १६० ] श्री. १७३८.
राजश्री जानोजीराव निंबाळकर गोसावी यासीः -अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। बाजीराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत गेलें पाहिजे विशेष राजश्री भगवंतराऊ रामचद्र व मोरेश्वर रामचंद्र व शिवराऊ रामचद्र यांचें कुळकर्ण व ज्योतिषपण पुरातन वतन मौजे तादळी ता। राजंणगांव येथईल असता, नारो दत्तो व यादो तुकदेव पानगे कुलकर्णास व जोमपणास नडले होते, आणि कजिया करीत होते त्यावरून मौजे मजकूरचे मोकदम व समाकुल पांढरी बलुते हुजूर आणून, इनसाफ मनास आणिता, पडितमशारनिले वतन कुळकर्ण व जोसपणे खरें होऊन पानगे खोटे जाले त्यावरून मशारनिलेचें वतनपत्र अलाहिदा करून दिल्हें आहे तर, तुह्मीं आपल्याकडील अंमलदारास ताकीद करून कुळकर्ण व जोसपणाचें वतन सुरळीत चालें तें केलें पाहिजे पानगियासी वतन नाहीं कजिया कटकट करावयासी सबंध नाहीं. त्यानीं यजितखत लेहून दिल्हें आहे तर पंडितमशारनिल्हेचें वतन सुरळीत चालवणें ह्मणोन अमिलास पत्र दिल्हें पाहिजे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
श्री. विनंती विज्ञापना. सरकारने खरीतापत्र नबाबास माहादजी सिंदे यांचा काल जाला त्याचे दौलतीवर दौलतराव शिंदे यांची बाहाली सर्फराजी या प्रकण पेशा आलें तें नवावास प्रविष्ट जाल्याची विनंती पेशजी लिहि. यांत आली. सांप्रत सरकारचे पत्राचा जवाब नवावांनी थैली पत्र दिले ते नेवेसीं रवाना केले आहे. राजश्री गोविंदराव भगवंत प्रविष्ट करतील. अवलोकेन मंजकर यानांत येईल. छ माह पाबान के विज्ञापना.
फारसपत्र व अनुवाद.
दर जवाब बनाम श्रीमंत राव पंडित प्रधान शहामत व बसालत में तंबत उबहुत मंझलत मनाउइशान बलामकान् बरखुरदार सतूदे अतवारदर हि फझ् बाशंद.
मकतूबे इत्तिहाद असलूब चहरये वसूल कशूद. व केफियते इतिकाले राव सिंधिया वहादर व परदाते अहवाले राव दौलतराव सिंधिया बहादर नझर वर मदार जे रुसूख व वसूके फिदवित व दौलत रवाहीये मुतवफका मझकूर मुफस्सेल व बुझुह अजामीद. व मरासमे कदीम परवरी व मुख्तार नमूदने रावे मझकूर वतनसीके भाहलाते हिंदुस्तान बजा व अझ आइने सरदारी व बाअसे इतिझामे उमेरे रियासत मुतसव्वर शुद, व इत्तिलाये इनमानी । व माबदौलत व मुकतझाहा इत्तिहाद व अकजाहेती मबजेह व खुशतर नमूद, पयवस्ते आफियतहा पिदाते व इसाले रकाइमे इत्तिहाद हमोझमाईम मसहर मुशाहेबत शुद. झियादे अग्याम बकाम बाद.
( सदर पत्राचा मराठीत अनुवाद. )
श्रीमंत राव पंडित प्रधान शहामत यांस जबाब आपलें कुशल असो. आपले ऐक्योत्तेजक पत्र पोंचलें, सिंदे यांचे निधन व तदनुषंगिक गोष्टींची बातमी, तसेच राव दौलतराव शिंदे यांचे ठायी असलेला आपला विश्वास व कैलास्वामी शिंदे यांची राजनिष्ठा वगैरे गोष्टी सविस्तर ( लिहून आलेल्या ) मुमजल्या. जुने कायम ठेवणे व उत्तराहंदुस्थानांतील बंदोबस्त मागीले पुरुषाचे वारसास देण्याचा आपला संकल्प फार चांगला आहे. विशेषेकरून त्यांचे अंगी अमलेले राज्यकर्तृत्व व राजकारणपटुत्व आपल्या विश्वासाला पुष्टि आणितात. यावरून ( आपल्या ) ऐक्याची व सलोग्ल्याची कल्पना करिता येते. वरचेवर प्रकृतीचें मान येत असावे व ऐक्य व कुशल कळवीत असावे वहुत काय लिहिणे ?