श्री
चैत्र वद्य ९ शके १७१६.
ता. २४ एप्रिल १७९४ इ०.
विनंती विज्ञापना ऐसीजे. दौलाचे सांगितच्याप्रमाणे पुरवण्या स्वामीस लिहिल्या. याची उत्तरे समर्पक गोड आणि दाबाची लि। यावी. याचे कारण मला हे पुसतील की तुम्ही पत्रे लिहिली त्यांची काय उत्तरें आलीं ? तेव्हां मला पत्रे दाखवावी लागतील यास्तव विनंती लिहिली आहे. तर छ २३ रमजान हे विज्ञापना.