श्री
चैत्र वद्य ९ शके १७१६.
ता. २४ एग्रील १७९४ ईसवी.
विनंती विज्ञापना ऐसीजे. पातषाहींतील मजकुर बोलत बोलत दौल, बोलिलें कीं पातघाहा इंग्रजाचे पुठ्यांत शेरावयास करतो. कारण काय त्यास कितेक दिवस इंग्रजापासीं बंगाल्यांत पातशाहाचे राहणे जालें होते ते वेळेस त्याचे मुदारातीचे सुखाचा अनुभव त्यास आहे. प्रस्तुत खाया खर्च वेगळ हैराणगत कैदे सारखा आहे. रडणें भेकणे नित्य चालले आहे त्यास पातशाईची थोडीच आशा आहे ? खायास खर्चास आराम इतके असले म्हणजे संतोष. याजकारतां येखादे वेळेस इंग्रजांनी लालुच दाखवली तर उठोन जाईल. ही येक कवाईतच आहे" म्हणोन बोलत होते.
छ रमजान हे विज्ञापना,