चैत्र शुद्ध १४ शके १७१६,
ता. १४ एप्रील १७९५ ईसवी.
विनंती विज्ञापना. दौलाचे बोलण्यांत आलें कीं " येलदगल, वरंगळ, नलगुंडा वगैरे तालुकयाचे काम ईसामियां यांस सांगोन तालुक्याचे बंदोबस्ताकरिता त्यांस तेथे पाठविल्या पासोन तालुक्याची लावणी व आकार ईसामियाने खातरखा केला. परंतु जमी' वगैरे मुफसद फार आहेत त्यांची तब होऊन तालुका निर्वेध जाला : '. याजकरितां इंग्रजी दोन पलटणे कडपे प्रांती गंजीकोथ्यापासीं होतीं ....गजेंद्रगडचे बंदोबस्तास रवाना केली होत. ती पलटणे येलगंदलाकडे आणवून ठविली आहेत. येक हजारा सवाराचीही जमियत आहे. या उपरी मुफसदाचा खलल न होतां तालुक्याचा बंदोबस्त होईल'' याप्रा यांचे बोलण्यांत आलें, आणी बोलले की, 'देवगड चादेंही तेथून जवळ आहे.' म्हणोन हसत हसत बोलले. यांतील तात्पर्य तिकडील रुखावर दबाब. ॥ छ २३ रमजान हे विज्ञापना